http://www.indianetzone.com/photos_gallery/33/MuhammadGhori_22929.jpg

मुहम्मद बिन कासिम नंतर महमूद गजनवी आणि त्याच्या नंतर महम्मद घोरीने भारतावर आक्रमण कसून अंधाधुंद कत्तल आणि लुटालूट चालवली. त्याचे पूर्ण नाव शिहाबुद्दीन उर्फ मुईजुद्दीन महम्मद घोरी होते. भारतात तुर्क साम्राज्याची स्थापना करण्याचे श्रेय महम्मद घोरीलाच जाते.
त्याने भारतावर पहिले आक्रमण इ.स. ११७५ मध्ये मुलतान वर केले, दुसरे आक्रमण इ.स. ११७८ मध्ये गुजरात वर केले. यानंतर इ.स. ११७९ - ८६ च्या दरम्यान त्याने पंजाब वर विजय मिळवला. त्यानंतर त्याने इ.स. ११७९ मध्ये पेशावर आणि ११८५ मध्ये सियालकोट आपल्या ताब्यात घेतले. इ.स. ११९१ मध्ये त्याचे युद्ध पृथ्वीराज चौहान याच्याशी झाले. या युद्धात घोरी फार वाईट प्रकारे पराभूत झाला. या युद्धात त्याला बंदी बनवण्यात आले परंतु क्षमायाचना केल्यावर आणि पुन्हा आक्रमण न करण्याचे वाचन दिल्यावर पृथ्वीराज चौहानाने त्याला सोडून दिले. असे अनेक वेळा झाले. या युद्धाला तराइनचे प्रथम युद्ध म्हटले जात असे.
यानंतर घोरीने अधिक ताकद एकवटून पृथ्वीराज चौहानावर आक्रमण केले. तराइनचे हे दुसरे युद्ध इ.स.११९२ मध्ये झाले होते. या युद्धात मात्र पृथ्वीराज चौहान पराभूत झाला आणि त्याला बंदी बनवण्यात आले. अये मानले जाते की पुढे त्याला गजनी इथे नेऊन मारण्यात आले. यानंतर घोरीने कन्नौज चा राजा जयचंद याला पराभूतकेले ज्याला चंदावरचे युद्ध म्हटले जाते. असे मानले जाते की तराइनच्या दुसऱ्या युद्धात कन्नौज राजा जयचंद याच्या मदतीनेच घोरीने पृथ्वीराजाला हरवल होते. मग त्याने जयचंदला पण धोका दिला. घोरी भारतात गुलाम वंशाचे शासन स्थापन करून पुन्हा आपल्या राज्यात परत गेला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel