http://timesofindia.indiatimes.com/photo/47403515.cms

हिंदू धर्माप्रमाणे प्रभू श्रीराम विष्णूंचे अवतार मानले जातात. श्रीरामाने नीती, धर्म, चरित्र आणि आचरण यांच्यातून असे आदर्श स्थापन केले की ते मर्यादा पुरुशात्तम या नावाने पूजनीय झाले. पुराणांनुसार प्रभू श्रीराम सूर्यवंशी राजा दशरथ यांचे पुत्र होते.
सामान्यतः धर्मावलंबी प्रभू श्रीरामांचा वंश आणि कुळ यासोबत त्यांचे दोन पुत्र लव आणि कुश यांच्याबाबत जाणतात, परंतु अनेक लोकांना त्यांचे भाऊ लक्ष्मण, भरत, आणि शत्रुघ्न यांचे पुत्र तसेच लव - कुश यांच्या पुत्र-पौत्रांच्या बाबतीत माहिती नाहीये.
हिंदू धर्माप्रमाणे रामाला विष्णूचा सातवा अवतार मानले जाते. वैवस्वत मनुचे दहा पुत्र होते. इल, इक्ष्वाकु, कुशनाम, अरिष्ट, धृष्ट, नरिष्यन्त, करुष, महाबली, शर्याति आणि पृषध. रामाचा जन्म यापैकी इक्ष्वाकू कुळात झाला होता. जैन धर्माचे तीर्थंकर निमी देखील याच कुळातले होते.
मनु चे दुसरे पुत्र इक्ष्वाकू यांना विकुक्षि, निमि आणि दण्डक हे पुत्र झाले. अशा प्रकारे ही वंशपरंपरा चालत चालत हरिश्चन्द्र रोहित, वृष, बाहु आणि सगर पर्यंत पोचली. इक्ष्वाकू हे प्राचीन कौशल देशाचे राजा होते आणि त्यांची राजधानी अयोध्या होती.
रामायणाच्या बालकांडामध्ये गुरु वसिष्ठ यांच्या द्वारे रामाच्या कुळाचे वर्णन करण्यात आले आहे जे अशा प्रकारे आहे : ब्रम्हदेवापासून मरीची चा जन्म झाला. मरीची यांचे पुत्र कश्यप. कश्यप यांना विवस्वान आणि वैवस्वतमनु हे पुत्र झाले. वैवस्वतमनु च्या वेळी जलप्रलय झाला होता. वैवस्वतमनुच्या दहा पुत्रांपैकी एका पुत्राचे नाव इक्ष्वाकू होते. इक्ष्वाकूने अयोध्येला आपली राजधानी बनवले आणि अशा प्रकारे इक्ष्वाकू कुळाची स्थापना केली. इक्ष्वाकून कुक्षी नावाचा पुत्र झाला. कुक्षीच्या पुत्राचे नाव विकुक्षी होते. विकुक्षीचा पुत्र बाण आणि बाणाचा पुत्र अनरण्य. अनरण्य पासून पृथु आणि पृथु पासून त्रिशंकचा जन्म झाला. त्रिशंकूचे पुत्र धुंधुमार, धुंधुमार चे पुत्र युवनाश्व. युवनाश्व चा पुत्र मान्धाता आणि मान्धाता पासून सुसंधीचा जन्म झाला. सुसंधीला दोन पुत्र झाले - धृवसंधी आणि प्रसेनजीत. धृवसंधीला पुत्र झाला भरत.
भरत चा पुत्र असित आणि असितचा पुत्र सगर. सगर हे अयोध्येचे खूप प्रतापी राजा होते. सगरच्या पुत्राचे नाव असमंज होते. असमंज चा पुत्र अंशुमान आणि अंशुमान चा पुत्र दिलीप. दिलीपचा पुत्र भगीरथ. भगीरथानेच गंगेला पृथ्वीवर आणले होते. भगीरथ चा पुत्र ककुत्स्थ आणि ककुत्स्थ चा पुत्र रघु. रघु हा अत्यंत तेजस्वी आणि पराक्रमी नरेश असल्याने त्याच्यानंतर या वंशाचे नाव रघुवंश किंवा रघुकुल झाले. त्यामुळेच रामाच्या कुळाला रघुकुल म्हटले जाते.
रघुचा पुत्र प्रवृद्ध. प्रवृद्धचा पुत्र शंखण आणि शंखण चा पुत्र सुदर्शन. सुदर्शनच्या पुत्राचे नाव अग्निवर्ण होते. अग्निवर्ण चा पुत्र शीघ्रग आणि शीघ्रग चे पुत्र मरू. मरु चा पुत्र प्रशुश्रुक आणि प्रशुश्रुक चा पुत्र अंबरीष. अंबरीश च्या पुत्राचे नाव नहुष होते. नहुष चा पुत्र ययाति आणि ययाति चा पुत्र नाभाग. नाभाग च्या पुत्राचे नाव अज होते. अज चा पुत्र दशरार्थ आणि दशरथाचे हे चार पुत्र राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न आहेत. वाल्मिकी रामायण - || १-५९ ते ७२||

- प्रभू श्रीरामांचा भाऊ भरत चे दोन पुत्र तार्क्ष आणि पुष्कर.
- लक्ष्मणाचे पुत्र चित्रांगद आणि चन्द्रकेतू.
- शत्रुघ्न चे पुत्र सुबाहु आणि शूरसेन

याच प्रकारे रामाचा पुत्र कुश याचा वंश अशा प्रकारे पुढे चालला -

कुश - अतिथि - निषध - नल - नभ - पुण्डरीक - क्षेमन्धवा - देवानीक - अहीनक - रुरु - पारियात्र - दल - छल - उक्थ - वज्रनाभ - गण - उषिताश्व - विश्वसह - हिरण्यनाभ - पुष्पक - ध्रुवसन्धि - सुदर्शन - अग्रिवर्ण - पद्मवर्ण - शीघ्र - मरु - सुश्रुत - उदावसु - नन्दिवर्धन - सकेतु - देवरात - बृहदुक्थ - महावीर्य - सुधृति - धृष्टकेतु - हर्यव - मरु - प्रतीन्धक - कुतिरथ - देवमीढ़ - विबुध - महाधृति - कीर्तिरात - महारोमा - स्वर्णरोमा - ह्रस्वरोमा - सीरध्वज.
कुश वंशाचा राजा सीरध्वज याला सीता नावाची एक कन्या झाली. सुर्यवंश याच्या पुढेही चालला, ज्यामध्ये कृती नावाच्या राजाचा पुत्र जनक झाला, ज्याने योगमार्ग अवलंबला होता.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel