गुरु वसे गाणगापुरीं । तेथें काय लीला करी । असें विप्रें पुसतां बरीं । लीला सारी सांगे सिद्ध ॥१॥

मी तो कः पदार्थ येथ । वर्णावया सर्व चरित । होती ब्रह्मादि कुंठित । तेव्हां संक्षिप्त सांगतों ॥२॥

अमेय कीर्ति गुरु आले । भीमामरजासंगमीं भले । गाणगापुरी राहिले । बैसले अश्वत्थीं तें ॥३॥

हो यद्गत्या गृह पावन । तो विप्रगृहीं येऊन । वांझमहिषी पाहून । ब्राह्मणस्त्रीतें बोले ॥४॥

सु सत्वा तूं दे क्षीरपान । ब्राह्मणी बोले वचन । वांझ म्हैंस हे दुभे न । गुरु दोहून दावीं म्हणे ॥५॥

मानून ती दोही क्षीर । दोन धडे दोहिलें क्षीर । गुरु पिऊनीं देती वर । हो दारिद्र दूर म्हणूनी ॥६॥

इति श्री०प०प०वा०स०वि० सारे वंध्यामहिषीदोहनं नाम द्वाविंशो०

 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel