या मंदिरातील दगडान्वारील नक्षीकाम, मूर्तीकला प्राचीन भारतातील प्रगत कलेचे अद्भुत उदाहरण आहे. ते आपल्या पायापासून जवळ जवळ १६ मीटर उंच आहे. या मंदिराचा कळस उत्तर भारतातील मंदिरान्सारखा दिसतो. अशाच एक प्रकारचे मंदिर बुद्धगया इथे आहे. इथे आपल्याला अकेंच थाटातील निर्मिती दिसते. मंदिराच्या जवळ तीन मुख्य गुहा आहेत. या गुहा मंदिराच्या जवळ पेयजल उपलब्ध करून देतात. काही अंतरावर काशीतीर्थ नावाचे आणखी एक मंसीर आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य असे की एक मंदिर एक अखंड पहाड खोदून निर्माण करण्यात आले. इथे चारही बाजूला प्रवेशद्वार आहेत. मुख्य प्रवेश द्वारावर चेहेऱ्यांच्या मूर्ती आहेत. हे मंदिराच्या रक्षकांचे चेहेरे आहेत. प्रवेश द्वाराच्या डाव्या बाजूला देवनागरी शिलालेख, संत चांगदेव यांच्या बाबत लिहिलेले आहे.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.