२६८ लोकांचा मृत्यू झाला आणि ३५९ लोक जखमी झाले जेव्हा अवध – आसाम एक्स्प्रेस आणि ब्रम्हपुत्र मेल यांची कटिहार जिल्ह्यातील गैसल भागात टक्कर झाली. ही घटना भारतातील सर्वांत मोठ्या आणि भयानक रेल्वे दुर्घटनांपैकी एक आहे.
ब्रम्हपुत्र मेल मधून भारतीय सैनिक आसाम पासून सीमेवर चालले होते तर अवध – आसाम एक्स्प्रेस गुवाहाटीला जात होती आणि गैसल जवळ थांबलेली होती. सिग्नल यंत्रणा खराब झाल्यामुळे ब्रम्हपुत्र मेलला देखील त्याच मार्गावरून जाण्याची परवानगी देण्यात आली. तिने रात्री १.३० वाजता अवध – आसाम एक्स्प्रेसला समोरून टक्कर मारली. अवध – आसाम एक्स्प्रेसचे इंजिन हवेत उडाले आणि झालेल्या भयंकर स्फोटाच्या ताकदीने दोन्ही गाड्यांतील प्रवासी आजूबाजूच्या इमारती आणि शेतात जाऊन पडले.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.