मला आज ही हे माहीत नाही की कार्तिकचा तो मेसेज वाचून तारा का अस्वस्थ झाली होती.
कार्तिक आणि तारा टिंडर वर भेटले. दोन दिवस फक्त फोन वर च बोलणे झाले, पण तिसर्याच दिवशी कार्तिक ने तारा ला कॉफी साठी विचारले, तारा ही लगेच नाही म्हणाली. तारा फक्त एकवीस वर्षांची होती, ग्रॅजुयेशन झल्या वर ची पहिलीच नोकरी होती, नवीन शहर होते, नातेवाईक कोणही नव्हते. जेमतेम चार महिने झाले होते, नोकरी वरुन आल्या वर तिला कंटाळा येत असे. म्हणून ती मग टिंडर वर आली आणि कार्तिक ला भेटली.
कार्तिक त्याच शहरातला, आई वडीलांन बरोबर राहणारा. तेवीस वर्षाचा, रुंद खांदे असणारा, नुकतीच दाढी मिशा ठेवायची सवय, कार्तिक ने सरळ तारा ला त्याचा मोबाइल नंबर दिला. आपण पाच मिनिट कुठे ही एका केफे मध्ये भेटू असा म्हटला. तारा ला तो बरा वाटला होता, पण एकदम भेटण्याचे तिला दडपण आले होते.
ते एका आठवड्या नंतर भेटले, तारा अबोल होती, त्यातच तिने आपल्या बद्दल काही बोलाचेय नाही असे ठरवले होते. कार्तिक ही अबोल होता पण कार्तिक ने खूप प्रश्न विचारले. काय आवडते, काय करतेस, शहर आवडले का आणि बरच काही. मग तारा ने पण भरपूर गप्पा मारल्या. तिची कॉफी थंड होऊन गेली पण गप्पा नाही संपल्या.
संध्याकाली घरी परत येताना आपण खूप दिवसांनी बरच बोललो असे तिला वाटले, कार्तिक ही तिला चांगला वाटला पण परत भेटायला नको असे तिने ठरवले, पण तिच्या लक्षात आले की कार्तिक बद्दल आपण काहीच विचारले नाही.
तिने लगेच कार्तिक ला फोन केला "मी तुला फोन करणारच होतो" कार्तिक म्हटला. "हो का? मग का नाही केलास?" तारा ने विचारले. हे ऐकून कार्तिक हसला.
"ऐ ऎक ना, तू काय करतोयस मी विचारलेच नाही"
"फायनली तुझ्या लक्षात आले तर" कार्तिक हसत म्हटला.
"ऐ सांग ना" तारा ने परत विचारले.
मी सिविल इंजिनियर आहे, आधी जॉब करत होतो, आता नवीन जॉब शोधतोय" कार्तिक ने सांगितले.
"मला वाटले तू जॉब करतोयस" तारा ला आश्चर्य वाटले.
"आधी होता, मग काढून टाकले, बघ ना तुझ्या कंपनी मध्ये माझ्यासाठी एखादी नोकरी" कार्तिक ने अगदी सहज विचारले.
तारा एकदम गप्प झाली. तिने तिच्या कंपनाचे नाव हीं खोटे सांगितले होते. एकदम कोणा वर जास्त विश्वास ठेवायचा नाही हे ती मीरा कडून शिकली होती, मीरा तिची मोठी बहीण होती.
मीरा ने बाबांच्या विरोधात जाऊन ध्रुव शी लग्न केले होते.
"परत घरी येऊ नकोस" असे बाबांनी तिला सुनावले होते.
ती ताराला ही घराबाहेर च भेटायची. तारा ला ध्रुव आणि मीरा चा हेवा वाटत असे. आपल्याला ही ध्रुव भाऊजीं सारखे कोणी भेटावे असे तिला नेहमी वाटत असे. पण ध्रुवला जर्मनी मध्ये नोकरी मिळाली आणि तो जो तिकडे गेला तो परत आलाच नाही. तारा ला फोन करणे ही त्याने कमी केले, थोड्या दिवसांनी कळले की त्याने तिथे दुसरा संसार सुरु केला आहे. घटस्फोट देण्यासाठी ही परत येत नव्हता. अशात मीराची दोन वर्ष वाया गेली, ती परत तारा आणि बाबांच्या कडे राहायला आली. "परत लग्न कर" हा बाबांचा सल्ला ही तिने ऎकला नाही. ताराला तिची अवस्था बघवत नसे. आपल्या ताईचा विश्वासघात करून हा माणूस तिथे आरामात राहतोय याचा तिला खूप राग येत असे.
तिने तेव्हा च ठरवेल होते, कधी कोणावर जास्त विश्वास ठेवायचा नाही.
ताराला मीरा ची आठवण आली, तिने लगेच तिला फोन केला.
"काय अजून झोपली नाहीस?" मीरा ने विचारले.
"झोपणारच होते, सहजच फोन केला" तारा म्हटली.
थोडे बोलून तारा ही झोपून गेली.
कार्तिक रोज फोन करत असे. रोज सकाळी आणि रात्री झोपण्या आधी, ताराला ही त्याच्या बरोबर गप्पा मारायला आवडत असे. "आज भेटणार का?" कार्तिक हे रोज ताराला विचारात असे, ताराला ही नाही म्हणता येत नसे.
"तुझ्या ऑफिस जवळ आपण भेटू" कार्तिक असे ठरवत असे, पण कार्तिकला ताराचे ऑफिस कुठे आहे हे ही माहीत नव्हते. तारा ने ती कुठे राहते हे सांगितले नव्हते. कार्तिक ने कधी जास्त विचारले नाही पण कार्तिक त्याच्या बद्दल सगळे सांगत असे. त्याने मीरा ला घरी ही बोलावले होते, त्याच्या घरी असे एकदम कसे जायचे, त्याचा आई वडिलानां कसे भेटायचे, मीरा त्याचे दडपण वाटले, त्यामुळे ती कधी त्याच्या घरी गेली नाही.
आणि जे होणार होते तेच झाले, दोघे ही एकमेकांच्या प्रेमात पडले. तारा ला हे माहीत होते कि कार्तिक स्वतःहून विचारणार नाही आणि मीरा ला ही त्याची मैत्री गमवायची नव्हती.पण एक दिवस मीराला राहवले नाही आणि तिने कार्तिक ला "मिस यु" असा मेसेज केला, कार्तिक ने त्याला हि "मिस यु टू" असे लगेच उत्तर दिले.
तारा साठी कार्तिक हे पहिले प्रेम होते, कार्तिक ला ही मीरा शिवाय करमत नसे.
कार्तिक मीरा ला प्रेमाने "बॉस" असे म्हणत असे. "तू माझी बॉस आहेस, तू जे सांगशील ते मी करीन" कार्तिक असे म्हणत असे. मीराला त्याचे असे बोलणे आवडत असे.
"तू फेसबुक वरचे रेलेशनशिप स्टेटस बदलेस का" एकदा ताराने कार्तिक ला विचारले.
"मी फेसबुक वर नाहीये" कार्तिक शांतपणे म्हणाला.
"का?" ताराला आश्चर्य वाटले.
"माझ्या सगळ्या मित्रांना चांगली नोकरी आहे, त्यांचे अपडेट्स बघून, मला पण कंटाळा आला होता आणि माझ्या कडे साधी नोकरी नाही. मग एकदिवस अकाउंट डिलिट केले.
"भारी, मी पण नाहीये फेसबुक वर" तारा ने सांगितले
आता कार्तिक ला आश्चर्य वाटले.
"अरे मी आणि मीरा ने फेसबुक वर खूप फोटो अपलोड केले होते, पण कोणीतरी बाबांना एका दिवशी फोटो दाखवले. बाबा चिडले आणि सगळे फोटो डिलिट करायला लावले आणि मग अकॉउंट ही डिलिट करायला लावले. मग आम्ही ही कधी नवीन अकॉउंट सुरु केले नाही"
"तू टिंडर वरचे अकाउंट डिलिट केलेस का?" कार्तिक ने विचारले.
"तू केले नाहीस का" तारा ने खोट्या रागात विचारले.
"आपण जेव्हा पहिल्यांदा भेटलो तेव्हाच डिलिट केले" कार्तिक म्हणाला.
"मी पण" तारा पण लाजत म्हणाली.
दोघही प्रेमात होते, एकमेकांचे होते, सगळे चांगले सुरु असताना एक दिवस ताराचे बाबा तिच्या कडे राहायला आले. बाबांचे असे अचानक येण्याचे कारण तारा ला माहिते होते. मीरा नेच सांगितले होते.
मी तारा ला फोटो वरूनच पसंत केले होते. फेसबुक वर पण शोधले पण तिचे प्रोफाइल काही सापडले नाही. मी तिला भेटायला तयार होतो पण ती तयार नव्हती, शेवटीच बाबांनी खूप विनवण्या केल्या तेव्हा कुठे ती परत घरी आली.
पण हे सगळे तिला कार्तिक ला सांगता आले नाही. बाबां समोर तिला कार्तिक ला फोन करता आला नाही, व्हाट्सअप वर तिने मेसेज केला पण त्यावर काही नीट बोलता आले नाही. कार्तिकला ही ती अचानक का गेली हे कळाले नाही. कार्तिक राग आला, ती अशी कशी गेली, मला का नाही सांगितले, असे त्याला राहून वाटले.
घरी पोहचल्यावर तारा ने लगेच कार्तिक ला फोन केला.
"मग तू कधी लग्न करणार आहेस" कार्तिक चा अजून राग गेला नव्हता.
"अरे मी त्याला अजून भेटले पण नाही, मला भेटाचेय पण नाहीये" कार्तिक चा राग आता तारा पर्यंत पोहचला होता.
"जर भेटाचेय नाहीये तर मग का गेलीस" कार्तिकने उलट विचारले.
"बाबां साठी घरी आली आहे, मला ताईला ही भेटाचेय होते" तारा ने समजावण्या चा प्रयत्न केला.
"परत कधी येणार आहेस?"
"अरे येईल दोन दिवसात, एवढीच जर आठवण येत असेल तर ये इकडे"
"मला नोकरी मिळू दे, मी तुझ्या बाबांना लगेच भेटतो"
"मला आहे ना नोकरी, तू ये इकडे, मला नाही त्या मुलाला भेटाचेय"
"तारा थोडे दिवस थांबू" आता कार्तिक ताराला समजावत होता
"तुला माझ्याशी लग्नच नाही करायच, नाही तर तू आता आला असतास" तारा एक्दम रडकुंडी ला आली होती
"तारा..काहीही बोलू नकोस, मला नोकरी मिळू दे, मग येतो"
पण तारा ला त्याचा विश्वास बसत नव्हता, तारा रडायला लागली, तिने फोन बंद केला, कार्तिक ने खूप फोन केले, मेसेज केले पण तारा ने उत्तर दिले नाही, तारा चे पहिले प्रेम होते, पहिले भांडणे होते, तिला काय करावे कळत नव्हते.
मीरा हे सगळे बघत होती, कधीतरी ती ही या परिस्थीती मधून गेली होती. तारा अंधारात बसली होती, तारा ला ही फार काळ तिचे दुःख लपवता आले नाही. कार्तिक बद्दल तिने सगळे मीरा ला सांगितले. मीरा ने ही कार्तिक ची बाजू घेतली. "असा पटकन निर्णय घेऊ नकोस" असा सल्ला ही तिला दिला.
तारा ला आश्चर्य वाटले. मीरा या सगळ्याला विरोध करेल असे तिला वाटले होते, पण मीराचा याला पाठींबा होता.
"त्या नंदन ला भेटून घे, नकार दे, बाबांना मी समजावते" मीरा ने समजावले, तारा रडतच मीरा ला बिलगली.
"आता रडू नकोस, मी तुझ्या साठी नवीन पर्स घेतली आहे, ती घेऊन जा"
ताराच्या मना वरचा डोंगर दूर झाला होता. तिने पटकन आवरले आणि मला फोन केला. मी ताराच्या फोन ची वाटच बघत होतो. आम्ही ताराच्या घर जवळच्या कॅफे मध्ये भेटायचे ठरवले.
पावसाळ्याचे दिवस होते, त्या संध्याकाळी पाऊस होता, मी कॅफे मध्ये आधी पोहचलो, तारा अर्धा तास उशिरा आली, पूर्ण भिजली होती.
मी ताराशी बोलण्याचा बराच प्रयत्न केला, पण तिने हो नाही अशीच उत्तर दिली.
मग बराच वेळ झाला, आम्ही काही बोललो नाही.
ताराला ला फोन आला, तिचा मोबाइल पर्स मध्ये होता, तिला कळालेच नाही. मी ही सांगितले नाही, मला वाटले तारा ला तो कॉल घ्यायचा नाहीये.पण परत कॉल आला.
"तुला फोन येतोय" मी म्हटले.
मी काय म्हटले ताराला कळलेच नाही, तिचे लक्षच नव्हते. मी पर्स कडे खुणावले, तिला कळाले, तिने लगेच पर्सउघडली, पर्स पावसाच्या पाण्याने ओली झाली होती, पण फोन वाजत होता, कोणी "कार्तिक हनी" चा फोन होता, मला तेवढे दिसले. तिने फोन उचला, पण कॉल कनेक्ट झाला नाही. फोन मध्ये पाणी गेले होते.
"कार्तिक हनी" चा एक एसेमेस आला, पण मला तो मेसेज वाचता आला नाही. पण तो एसेमेस वाचून ताराच्या चेहर्यावरचे सारे रंगच उडाले.
तारा उठून कॅफे च्या बाहेर गेली, मी ही तिच्या मागे गेलो. तिने फोन करायचा बराच प्रयत्न केला, पण शेवटी फोन बंद झाला.
मी लगेच माझा फोन तिला दिला. तिने नंबर डायल केला, फोन लागला, पण तो रॉन्ग नंबर होता. तारा ने परत नंबर आठवला, परत डायल केला, पण तोही रॉन्ग नंबरच होता. त्या ऐसेमेस मुळे तारा अस्वस्थ झाली, मला तो एसेमेस काय होता ते कळाले नाही. मी तारा ही विचारले नाही.
आम्ही पटकन जवळच्या एका मोबाइल दुरुस्ती शॉप मध्ये गेलो. त्याने मोबाइल बघूनच, 'वॉटर डॅमेज' आहे दुरुस्त होणार नाही असे सांगितले.
मी पटकन एक हजारची नोट त्याला दिली, "लवकरात लवकर दुरुस्त करून द्या" अशी विनंती वजा सूचना केली. "पैश्याची काळजी करू नका" असे ही सांगितले.
त्याने उद्या सकाळी या असे सांगितले, ,
"आज रात्री बघतो आणि रिपेअर झाला तर उद्या सकाळी देतो" तो माणूस आम्हाला म्हटला. "लगेच नाही होणार का?" तारा ने विचारले. त्याने मानेनेच नाही म्हणून सांगितले.
आम्ही शॉप च्या बाहेर आलो, तारा काही बोलण्याच्या स्थिती मध्ये नव्हती, मग मी ही तिचा निरोप घेतला आणि घरी आलो.
मी सकाळी परत त्या शॉप कडे गेलो, माझ्या आधी तारा आली होती, ती रात्रभर झोपली नसणार, एवढे मला तिच्या कडे बघून कळाले. आम्ही साहजिकच काही बोललो नाही. थोड्या वेळाने तो माणूस आला.
त्याने पाच हजार मागितले, तारा ने ऐटीएम मधून पैसे काढले, माझे कालचे पैसे मला परत केले.
"सिम कार्ड्स डॅमेज झाली आहेत. मोबाइल फॉरमॅट केला आहे, पण काँटॅक्टसचा बॅकउप घेऊन ठेवला होता" तो माणूस आमच्याकडे फोन देत म्हटला.
हे ऐकून ताराच्या जीवात जीव आला. तारा ने काही न बोलता, "कार्तिक हनी" ला फोन लावला, सिम कार्ड डॅमेज होते तर फोन लागत नव्हता.
मी माझा फोन तारा ला दिला, माझ्या फोन वरून तिने कार्तिक चा नंबर डायल केला.
फोन ची रिंग वाजत होती.
पण त्या कॉलला काही उत्तर आले नाही.
ताराने परत फोन केला, परत रिंग वाजली, पण परत उत्तर मिळाले नाही.
तारा ने व्हाट्सएप वर मेसेज केले, ऐसेमेस केले.
मला तर ती विसरून गेली होती, मला ही ऑफिस ला जायचे होते, मी ताराला बाय केले आणि निघालो.
या नंतर मी तारा ला बरेच महिने भेटलो नाही .मला माझे उत्तर मिळाले होते. "कार्तिक हनी" बरोबर आता ती सुखी असेल, म्हणून मी ही परत कॉल केला नाही.
या गोष्टीला जेमतेम सहा महिने झाले असतील, पण एका दिवशी अचानक, ताराच्या वडिलांचा फोन आला. "तुमचे कुठे ठरले नसेल तर ताराला परत भेटा" अशी विनंती केली.
मला आश्चर्य वाटले, कार्तिक आणि तारा चे काय झाले, हे मला कळाले नाही.
पण जेव्हा आम्ही परत भेटलो तेव्हा तिने ही कार्तिकचा विषय काढला नाही. मी ही काही विचारले नाही. जर ती कार्तिक बरोबर असती तर तिने कधी माझ्या बरोबर लग्न केले नसते.
पण मला आज ही हे माहीत नाही की कार्तिक चा तो मेसेज वाचून तारा का अस्वस्थ झाली होती.
आज ही ती कार्तिक च्या नंबर वर फोन करते, व्हाट्सएप वर मेसेज करते, ऐसेमेस करते.
आणि जेव्हा ती कार्तिक च्या नंबर वर फोन करते तेव्हा, माझ्या कपाटातल्या ड्रॉवर मधला फोन व्हायब्रेट होतो.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.