ट्रेनच्या प्रवासात उभ्या उभ्या जागा ऍडजस्ट करण्यातच संपूर्ण प्रवास संपतो आणि त्यातच काही शब्द ऍडजस्ट करता करताच कविताही घडते... "वाचा थोडं ऍडजस्ट करूनच"
सकाळच्या चहापासून तर रात्रीच्या जेवणापर्यंत,
आता सर्वच गोष्टी,
ऍडजस्ट करून घ्याव्या लागतात..
मग दिवसभराचे कार्यक्रमही,
याला अपवाद नाही.
कोणत्याही गोष्टीशी संबंध जोडला तरी,
त्यात काही वाद नाही.

यामधात येणाऱ्या सर्व गोष्टी,
आता ऍडजस्टच कराव्या लागतात.
कोण जाणे का तर,
मात्र प्रत्येकजण तसेच वागतात...
यात प्रवासही वेगळा नाही,
ट्रेनच्या गर्दीपासून, बसच्या सीटपर्यंत,
आता सर्वच गोष्टी ऍडजस्ट कराव्या लागतात.

दिवसाच्या सुरुवातीपासून,
त्याच्या संपेपर्यंत सर्व ऍडजस्टच..
मित्रही बनवावे लागतात ऍडजस्ट करूनच,
नातेही जपावे लागतात ऍडजस्ट करूनच,
शेवटी,
मित्रांना वेळही  द्यावा लागतो...
तोही ऍडजस्ट करूनच.

नुसतीच इकडेतिकडे धावपळ आजकाल,
अनं तीही भर गर्दीतून,
अड्जस्टच करून करावी लागते..
ऍडजस्ट करूनच कामाचे ओझे,
मग कुठेतरी हलकं  होते.

कॉलेजला ऍडजस्ट, शाळेत ऍडजस्ट,
बंकही ऍडजस्ट, होमवर्कही ऍडजस्ट...
करूनच करावं लागतं.
पेपरला मार्कही ऍडजस्ट करूनच,
सेमिस्टर कित्येकांना क्लिअर करावं लागतं.

लोकांना समजून घेताना ऍडजस्ट,
लोक बोलतातही आता,
करून वेळ ऍडजस्ट.
सगळीकडे आता तीच ती एक बाब...
ऍडजस्टच्या फिलॉसॉफीचाच नुसता रुबाब.

तसं लिहायला खूप आहे या सब्जेक्टवर,
प्रत्येक गोष्टीत कराव्या लागतात ऍडजस्टवर.
पण शेवटी मला,
थांबावं लागणार इथूनच,
कारण मीही लिहितोय हे, थोडं ऍडजस्ट करूनच!!
थोडं ऍडजस्ट करूनच......
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel