जीवनाचा जीवनावर भार मित्रा
मुक्त होण्याला न कुठले दार मित्रा
कोणत्या बंधात मी फसलो असा की
जन्म म्रुत्योचेच नुसते वार मित्रा
फक्त आई या जगी आहे जिचे मी
शक्य नाही फेडणे उपकार मित्रा
वाट पाहत जीव देतो पावसाची
त्या बळीचा कोण रे आधार मित्रा
शॊधण्या जावे स्वत:ला वाटते पण
खेचतो मागे मला संसार मित्रा
मुक्त होण्याला न कुठले दार मित्रा
कोणत्या बंधात मी फसलो असा की
जन्म म्रुत्योचेच नुसते वार मित्रा
फक्त आई या जगी आहे जिचे मी
शक्य नाही फेडणे उपकार मित्रा
वाट पाहत जीव देतो पावसाची
त्या बळीचा कोण रे आधार मित्रा
शॊधण्या जावे स्वत:ला वाटते पण
खेचतो मागे मला संसार मित्रा
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.