देवळाच्या दारात झाड निंबाच हिरवं
दुपारच्या शाळेला गोळा होती पाखरं
किलबिल न्यारी त्यांची शिकतात बाराखडी
आनंदाने पोरं पोरी उड्या मारती फांद्यावरी
सावलीत डुलक्या घेती गावातील वृद्ध सारी
झुळूक वाऱ्याची येता झोका रंगतो फांद्यावरी
आला गेला पाहुणा क्षणभर विसावतो
चिमण्या पिल्लांना उगीच हुसकावतो
जिर्णोधार देवळाचा गाव झालं वेड
एका रात्रीत त्यांनी तोडलं हिरव झाडं
देवळातला देव तेव्हा मनातच रे रडला
कोवळ्या पक्षांचा हा संसार का हो मोडला
पाखरं झाली परागंदा पाऊस कधी ना पडतो
देवळातला गाव आता आभाळाकडे पाहतो
दुपारच्या शाळेला गोळा होती पाखरं
किलबिल न्यारी त्यांची शिकतात बाराखडी
आनंदाने पोरं पोरी उड्या मारती फांद्यावरी
सावलीत डुलक्या घेती गावातील वृद्ध सारी
झुळूक वाऱ्याची येता झोका रंगतो फांद्यावरी
आला गेला पाहुणा क्षणभर विसावतो
चिमण्या पिल्लांना उगीच हुसकावतो
जिर्णोधार देवळाचा गाव झालं वेड
एका रात्रीत त्यांनी तोडलं हिरव झाडं
देवळातला देव तेव्हा मनातच रे रडला
कोवळ्या पक्षांचा हा संसार का हो मोडला
पाखरं झाली परागंदा पाऊस कधी ना पडतो
देवळातला गाव आता आभाळाकडे पाहतो
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.