महालक्ष्मीचे एक रूप गजलक्ष्मी देखील आहे आणि ती या रुपात ऐरावत हत्तीवर विराजमान दिसते. लक्ष्मीच्या ऐरावत हत्तीचे प्रिय खाद्य म्हणजे ऊस आहे. दिवाळीच्या दिवशी पूजेत ऊस ठेवल्याने ऐरावत प्रसन्न होतो आणि त्याच्या प्रसन्नतेमुळे महालक्ष्मी देखील प्रसन्न होते. पूजा पूर्ण झाल्यावर प्रसाद म्हणून उसाचे सेवन देखील केले जाते. यामागील भाव असा आहे की ज्या प्रकारे उसात गोडवा असतो, अगदी त्याचप्रकारे आपल्या वाणीत आणि वागणुकीत गोडवा ठेवला पाहिजे. जर आपण वाणीत गोडवा ठेवला तर घर-परिवारात सुख-समृद्धी नांदते.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.