पद्म पुराणात ५५००० श्लोक आहेत आणि हा ग्रंथ ५ खंडांमध्ये विभाजित आहे ज्यांची नावे आहेत सृष्टीखण्ड, स्वर्गखण्ड, उत्तरखण्ड, भूमीखंड आणि पाताळखण्ड. या ग्रंथामध्ये पृथ्वी, आकाश आणि नक्षत्रांच्या उत्पत्तीच्या बद्दल उल्लेख केलेला आहे. चार प्रकारे जीवांची उत्पत्ती होते ज्यांना उदिभज, स्वेदज, अणडज आणि जरायुज या श्रेणीत मोडलेले आहे. हे वर्गीकरण संपूर्णपणे वैज्ञानिक आहे. भारतातील सर्व पर्वत आणि नद्या यांच्या बद्दल देखील विस्तृत वर्णन आहे. या पुराणात शकुंतला दुष्यंत पासून प्रभू श्रीरामापर्यंत यांच्या अनेक पूर्वजांचा इतिहास आहे. शकुंतला दिश्यंत यांचा पुत्र भरत याच्या नावावरूनच आपल्या देशाचे नाव जम्बूद्वीप पासून भरतखंड आणि नंतर भारत असे पडले.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.