भविष्य पुराणात १२९ अध्याय आणि २८००० श्लोक आहेत. या ग्रंथामध्ये सूर्याचे महत्त्व, वर्षाच्या १२ महिन्यांची निर्मिती, भारताची सामाजिक, धार्मिक आणि शैक्षणिक विधाने इत्यादी अनेक विषयांवर चर्चा आहे. या पुराणात सापांची ओळख, विष आणि विषारी दंश यांच्या संबंधी महत्वपूर्ण माहिती देखील दिलेली आहे. या पुराणातील अनेक कथांचे बायबल मधील कथांशी साधर्म्य आहे.या पुराणात प्राचीन राजवंशाच्या माहिती व्यतिरिक्त भविष्यात येणारे नंद वंश, मौर्य वंश, मुघल वंश, छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी व्हिक्टोरिया पर्यंतचा वृत्तांत दिलेला आहे. ईसाचे भारतात आगमन तसेच मोहम्मद आणि कुतुबुद्दीन ऐबक यांचा उल्लेख देखील या पुराणात केलेला आहे. याव्यतिरिक्त विक्रम – वेताळ आणि वेताळ पंचाविसिच्या कथांचे विवरण देखील आहे. सत्य नारायणाची कथा देखील याच पुराणातून घेतलेली आहे.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.