ब्रम्हांड पुराणात १२००० श्लोक आहेत तर पूर्व, मध्य आणि उत्तर असे तीन भाग आहेत. अशी मान्यता आहे की अध्यात्म रामायण आधी ब्रम्हांड पुराणाचाच एक अंश होते जो आता एक स्वतंत्र ग्रंथ आहे. या पुराणात ब्रम्हांडातील ग्रहांच्या बाबतीत वर्णन करण्यात आलेले आहे. तसेच या पुराणात अनेक चंद्रवंशी आणि सूर्यवंशी राजांचा इतिहास देखील संकलित आहे. सृष्टीच्या उत्पत्तीपासून आजपर्यंत सात मनोवंतर (काळ) व्यतीत झाला आहे ज्यांचे विस्तारित वर्णन या ग्रंथात करण्यात आलेले आहे. परशुरामाची कथा देखील या पुराणात सांगण्यात आलेली आहे. या ग्रंथाला विश्वाचे प्रथम खगोल शास्त्र म्हटले जाऊ शकते. भारतातील ऋषी या पुराणातील ज्ञानाला इंडोनेशियामध्ये देखील घेऊन गेले होते आणि या गोष्टीचे प्रमाण इंडोनेशियाच्या भाषेत मिळते.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.