अनावृत्त पत्र म्हणजे काय Anavrutt Patra.

अनावृत्त पत्र म्हणजे काय असा प्रश्न कुणी तरी विचारला. अनावृत्त पत्राला इंग्रजीत open letter असे म्हणतात. जुन्या काळी पत्रव्यवहार फार होत असे. तुम्हाला कुणाशी काही व्यथा किंवा तक्रार मांडायची असेल तर त्या व्यक्तीला विशेषतः नेते मंडळींना तुम्ही पत्र लिहून आपले म्हणणे सांगू शकत असत. पण त्याचे वेळी हा पत्रव्यवहार गुप्त राहत असे. तुम्ही कुणाला काय सांगितले आहे जे जगजाहीर होत नसे. 

तेंव्हा अनावृत्त पत्र हि संकल्पना आली. पत्र लिहायचे एखाद्या व्यक्तीला पण ते पात्र आपणहून जाहीर सुद्धा करायचे म्हणजे तुम्ही नक्की काय लिहिले आहे ते जगाला समजते आणि ज्याला लिहिले आहे त्या व्यक्तीवर दबाव पडतो.   त्या व्यक्तीने त्याला उत्तर दिले नाही तरी चालते कारण इतर व्यक्ती त्या पत्रातील मजकूर वाचू शकतात आणि त्यावर चर्चा करतात. कधी कधी पत्रे हि मृत किंवा अमानवीय गोष्टींना सुद्धा लिहिली जातात. उदाहरणार्थ स्त्रीजातीला अनावृत्त पत्र किंवा माझ्या धडधडत्या हृदयाला पत्र इत्यादी. 

तुम्हाला अश्याच प्रकारच्या अनावृत्त पत्राचे उदाहरण हवे असेल तर हे वाचू शकता