तुला लढावेच लागेल

(सध्या गेल्या काही दिवसांपासून मी कोरोनाशी झुंज देतोय.15 दिवसांपासून बरडे हॉस्पिटल ला ऍडमिट आहे,
परंतु तातडीने उपचार,सकारात्मक विचारसरणी, सर्वांचे प्रेम,स्नेह,शुभेच्छा यामुळे out of control आहे. ...ह्या पार्श्वभूमीवर लिहलेली एक कविता)

तुला लढावेच लागेल
उभे राहावेच लागेल

तुला लढावेच लागेल
उभे राहवेच लागेल
कठीण काळाच्या
कसोटीवर
तावून सुलाखून निघावेच लागेल

खूप झालंय आता..
स्वतःच्या अस्तित्वावर
एका छोट्याशा व्हायरस
ची जीवघेणी दहशत

ही दहशत
तुला तुझ्या विचारांनीच
ठेचावी लागणार आहे.

जिकडे तिकडे खच पडलाय..
मृत्यूचे तांडव...
जवळच्या माणसांचं अवेळी सोडून जाणं...
स्मशानभूमीतील जळते निखारे..
कुणाच्या तोंडचा घास जातोय
तर कुणाचा बाप,कुणाचा मुलगा..
काय आहे,हे कळत नाही..
अरे कुठे गेली मर्दुमकी?

निसर्गाच्या अमोघ वरदानाचा
वारसा तुज प्राप्त आहे
वैश्विक व भारतीय उज्वल
संस्कृतीचा महानतम
वारसा तुझ्यात दडून आहे.

परतावूनी लावले आहेस माणसा
असे कित्येक हजार हल्ले तू
जिंकण्याचे बाळकडू
तुझ्यात जन्मतःच आहे

तुझ्या उज्वल अध्यात्मिक
संस्काराची आण माणसा घे

ह्या संकटाला  नष्ट
करण्याचे सामर्थ्य
 जे तुझ्यात दडलंय
ते परत आण माणसा..

तुला लढावेच लागेल
उभे रहावेच लागेल

कठीण काळाच्या कसोटीवर
तावून सुलाखून निघावेच लागेल

कवी:सुभाष पवार
क.का. वाघ.हायस्कूल,धोदंबे ता.चांदवड