महात्मा गांधी

१८६९ साली जन्मलेले
स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते , 
' महात्मा गांधी ' म्हणून ओळखले 
जे आज भारतभर जाते.

रवींद्रनाथ टागोर यांनी ज्यांना
दिली ' महात्मा ' ही उपाधी, 
असे आपले महान 
मोहनदास करमचंद गांधी.

सुभाषचंद्र बोस यांनी ज्यांना
' राष्ट्रपिता ' म्हणून संबोधले, 
इंग्रजांविरुद्ध त्यांनीच 
'भारत छोडो आंदोलन ' केले.

सत्य, अहिंसा व असहकार
ही त्यांची तत्त्व होते, 
ते करमचंद व पुतळीबाई गांधी 
यांचे चौथे अपत्य होते.

तेराव्या वर्षी त्यांचे कस्तुरबा
यांच्याशी लग्न झाले, 
इंग्रजाविरुद्ध त्यांनीच 
भारतात सत्याग्रह केले.

हरीलाल, मणिलाल, रामदास व
देवदास ही त्यांची अपत्ये, 
'करो या मरो', 'सत्य ही ईश्वर'
ही त्यांचीच वाक्ये.

वयाच्या २२व्या वर्षी 
ते बॅरिस्टर झाले , 
इंग्रजाविरुद्ध चळवळी व 
आंदोलन करुन यश मिळवले.

वकील,राजकीय नीतिशास्त्रज्ञ ते
तेच वसाहतवाद विरोधी , 
असे आपले ' बापू ' 
बॅरिस्टर महात्मा गांधी . 

श्रध्दा शिवाजी बरदाडे