नभ दाटून आले - अपर्णा स्वामी

नभ दाटून आले
सगळे आनंदमय झाले
गडगडाट चालू झाला,
थंडगार हवेने
तनास शहारा आला
ही धुंद हवा
मोहीली माझ्या मनाला
रिमझिम पावसाच्या सरींनी
आला श्रावण बहरुनी
कोंब फुटून आले
रान हिरवे झाले
नव्या ऋतूच्या आगमनाने
शेते बहरुनी आले
नभ दाटून आले
सगळे आनंदमय झाले....
नवी पालवी फुटली
नवी फुले उमलली
तापलेल्या धरणीला
शांतता लाभली
मातीच्या सुगंधाने 
मन प्रसन्न झाले
तहानलेल्या चातकाने
मन भरून पाणी पिले
कोकिळेचे गाणे खूप 
दिवसांनी ऐकले
नभ दाटून आले
सगळे आनंदमय झाले...

अपर्णा स्वामी
appsswami444@gmail.com