सत्पात्री दान

दान करायचा संस्कार

जेव्हा गरजवंताला अत्यंत गरज असते त्यावेळी आपल्या कडचे देणे हे खरे सत्पात्री दान. 

आपल्या काही कामाच नाही व त्याला कामी येईल हे फक्त दान. जर घेणाऱ्याने त्याचा भलताच उपयोग केला व भयंकर घडल तर त्याला आपण जबाबदार असाल हे लक्षात ठेवा. 

आपल्या राज्यात भुकेला राहू नये हे राजाने पाहिल पाहिजे.  आपल्या राज्यात   भुकेल्याला अन्न देण हे राजाचे कर्तव्य. पण हेर नागरीक भुकेल्याला अन्न देत असेल तर ते सत्पात्री दान. आताचा काळात निवडून आलेल्या नेत्यांना आम्ही राजा म्हणू शकत नाही. पण या नेत्यानी आपल्या परीसरात अर्धपोटी भुकेने व्याकूळ  कोणी रहात नाही हे पाहिले पाहिजे व त्याना अन्न देण्याची व्यवस्था करणे नेत्याचे कर्तव्य आहे.  

ब्राह्मणाला पान वाढणे हि आमची परंपरा, संस्कार आहे. पण हे आताच्या काळात सत्पात्री दान समजणे चुकीचे. 'एका गावात एक गरीब ब्राह्मण रहात होता' त्या काळात ब्राह्मणाला शिधो देणे, पान वाढणे सत्पात्री असेल, आता नाही. 
शिक्षण घेण्यास आपल्या गावात, परिसरात रहाणारा आणि माधुकरी मागत अन्न मिळविणाऱ्या अशा विद्यार्थास पान वाढण हे सत्पात्री दान. 
रस्यावर बेकार बसून भीक मागतो त्याला दान देणे म्हणजे फार वाईट. दान कोणाला दिल पाहिजे हे परिश्रम पुर्वक  शोधल पाहिजे. असाच रस्तावर बसलेलो एखादा खरच गरजवंत असेलही. अशांचा शोध घ्यावा आणि दान दिल गेल पाहिजे. न मिळाल्यास न दिलेल बरे.

दान देण्याची सवय माणसान बाळगली पाहिजे.

माणूस मेल्यावर  जी संपत्ती पाठिमागे ठेवतो त्याचीही योग्य व्यवस्था  या जन्मी योग्य  वेळी करावी.
आम्ही पुनरजन्म मानणारे आहोत.  
जसे झोपी जाण्यासाठी आड पडतो तेव्हा  दिवसभर केलेली कर्माची खाडकन आठवण होते, अस्वस्थ होत, झोप पडत नाही तसेच आमचा आत्मा शरीर सोडल्याबरोबर जीवंतपणी  जी कर्म केली ती त्याची पाठ सोडीत नाही. एकेक कर्म डोंगर कसे आड येत रहाते, आत्मा अस्वस्थ रहातो.  आपण जे मिळविले, कमाई केली ते जर आपल्या पुढच्या पिढीने बरबाद केले तर त्या बद्दल आपणही जबाबदार ठरतो. आपल्या आत्मालाही बाधा पोहोचते. 

दान करण्याची सवय लावू घ्यावी. ज्याला आपण देतो तोही आपल दान चांगल्या प्रकारे वापरात आणेल हे हि पाहिल पाहिजे.  एकदा का दान दिल कि त्याची मालकी दान घेणाऱ्याची. आपली भावना कठोरपणे तोडावी. पण दान घेणाऱ्याने ते दान वाईट कामासाठी वापरू लागला तर त्याची बाधा आपल्यालाही लागू होते. 

आपल्या मालमत्तेची वारसात चांगल्या प्रकारे केली पाहिजे. जो नालायक आहे त्याला न दिलेली बरी. (घालू दे धिंगाणो. आपण कठोर भुमीका घेतली पाहिजे.)

धार्मीक कार्य करणे आणि धर्माचे रक्षण ही प्रमूख जबाबदारी देवस्थानांची. त्याच बरोबर कला, संस्कृती, क्रिडा यानांही प्रोत्साहन देणे कर्तव्य देवस्थानांचे.  देवस्थानांची जेवढी वार्षिक कमाई होते त्यातील ९०% त्याच वर्षी उपयोगात आणली पाहिजे.  पण बरीच देवस्थान थोडोच खर्च करतात आणि बराच भाग न उपयोगात आणता राशीवर राशी जमा करतात.  जी देवस्थान त्याच वर्षी वर नमूद केलेल्या  कामासाठी अधिकतर दान वापरतात त्यांना  दान देणे हे सत्पात्री दान समजावे. 
अशा सामाजिक संस्था ज्या समाजातल्या निराधार, दुर्बल घटकांना मदत करतात यांना  दान  हे सत्पात्री दान आहे. 
सामाजिक संस्था ज्या कला, क्रीडा स्पर्धा भरवितात, वेगवेगळे अभ्यासवर्ग घेतात आणि अशीच बेरीच समाजिक  कार्ये करतात यांना दान करणे हे सत्पात्री दान. 
आपल्याला वाटते की हा अमूक व्यक्ती राजकारणात गेलो तर  सामाजाचे बरे काम करेल. आणि त्याला निवडून आणण्यासाठी त्याचा निवडणूक खर्चासाठी दान देणे हे सत्पात्री दान. (भले तो दडपून हरला.)

आपूण जे दान देतो ते बऱ्या कामात उपयोगी आल पाहिजे. जर ते वाईट कामासाठी वापरले गेल तर त्या वाईट कामामुळे जे होईल तर त्याची जबाबदारी आपलीही आहे हे ध्यानात ठेवा. 

(आपण जर एका मुलाला भला वाटला म्हणून दान देऊ लागलो आणि तो व्यसनी झाला तर ती जबाबदारी आपलीही हे समजून घ्या.)
भरपूर पैसो मिळवा, जे मिळविले ते सगळे या जन्मातच बऱ्या कामासाठी खर्च करा. पुढचा जन्म बरा मिळेल, मोक्ष लवकर मिळेल. 

श्रीकांत बर्वै, ताळगाव गोवा.  युगाब्द ५१२३