आयुष्याचे इंगित

प्रत्येकाच्या भावात जाऊन ज्याला त्याला ओळखणं खूप कठीण असत 

आपल्या ओळखीचं काय म्हणा शेवटी ज्याचं त्यालाच निभवायचं असत 

तुमच्या आमच्यातले सगळे भरडले जातात आणि निःपक्षपणाचा आव आणून मन आळवावी लागतात 

प्रतिसंबंधाचा शोध तो हातून नाही सुटायचा 
आपलं आपलं म्हणत कधीही ना आत्मसन्मान गळवायचा 

आपल्यासारखे आम्हीच म्हणत वेळ मारून न्यायची
 संयोगितेतला 'स' काढत वेगळा काढत सह्योगीतेला पाठिंबा द्यायचा 

बांधिलकी म्हणत आसवं आपली आपणच मुठीत धरायची आणि कसली गैरसोय नको म्हणून सगळी कर्तव्य आपली आपणच निभवायची 

आपल्या वाट्यालाच हे सगळं म्हणून स्वतःलाच हिणवत राहायचं 
शेवटी हाताची घडी आणि तोंडावर बोट धरून मूग गिळून गप्प बसायचं 

आपल्यातली मायेची ओढ  कधीही ना संपू द्यायची विषयातली सगळी गणित सोडवून बाकी शून्य कधीही ना उरवयाची 

प्रेमसंबंधाचे नाते हे असेच टिकवून ठेवायचे आणि हसत हसतच परिस्थितीशी दोन हात करायचे

कधीही 'नाही' हा शब्द उच्चरायचा उच्चारायचा नाही पण  
'हो' म्हणूनही आपला शब्द खाली पडू द्यायचा नाही
आपला शब्द खाली पडू द्यायचा नाही

श्रुती कुलकर्णी
राहणार :- डोंबिवली