एक न उमलणारी कळी....

अगदी दोन तिन दिवसांपुर्वी माझ्या बागेतील गुलाबाला तिन कळ्या आल्या..त्यातील दोन कळ्या उमलल्या पण एक कळी खुलली च नाही. मी वाट पाहिली आणखी एक दिवस पण तरीही ति कळी नाही उमलली.

का कोणास ठाऊक पण मला जरा वाईट वाटलं कारण कळी येऊन तिच्या पाकळ्या उमलून फ़ुल होताना पाहयच होत मला.............            ती न उमलनारी कळी मला काहितरी सांगायचा प्रयत्न करत होती आणि खरोखरच एक आवाज आला नाजूक, केविलवाणा ...

अगं एकतियेस का मी तिच कळी जिला तु पाहतियेस या क्षणी. तुला प्रश्न पडलाय ना की मी उमलत का नाहिये... तर मग ऐक.

कोणत्याही गोष्टीचीएक अचूक वेळ असते. प्रत्येकाचा काळ उमलण्याचा   तसा माझा ही आहे. वेळेच्या आधी काहीच होत नसत तोपर्यंत आपण आपले प्रयत्न चालू ठेवायचे. तुला सांगु का मी ना या कळी असलेल्या अवस्थेतच जास्त खुश असते कारण माझ्याकडे एका उमलणरया कळी कडे पाहून तुम्हाला नविन आशा येते आणि त्याचा मला जास्त हेवा वाटतो. मी जेव्हा कळी असते तो क्षण मी भरभरून जगते उमलल्या नंतर मी हे नाही अनुभवु शकत....

एक कळी ते फ़ुल होणे हा प्रवास जास्त सुंदर नाही का? हे झाड म्हणजे माझे शक्ती स्थान आहे ते पूरवेल त्या पोषक तत्वांमधुन मी उमलते..ते झाड माझे सर्वस्व आहे ते माझ्या प्रयत्नांना यश देते अगदी एक अदभुत शक्ती ज्याप्रमाणे सर्व जीवांना सांभाळते तसेच...अग फुलाजवळ कीती कीटक मधू गोळा करायला येतात आणि दुखवत ते बिचार फ़ुल पण माझ्याजवळ कोणीही येत नाही कारण मी कळी असल्यामुळे हा माझा कळी असण्याचा फायदा.

फक्त एवढंच सांगते की मी माझ्यातील छान गुण पाहते त्रुटी नाही म्हणून तुही माझ्या कडे आशे ने च पाहा. तु सुद्धा कळी मधे असणारे आयुष्य जगुन फुलाप्रमाने उमल.

आणि अचानक हा एकतर्फी सवांद थांबला...आणि मी गहिवरून गेले. एवढा छोटासा जीव मला जीवनातल कीती मोठ सत्य सांगुन गेला...

मी त्या कळी जवळ जाऊन स्मितहास्य केलं आणि एक पाकळी माझ्या हातावर पडली..मी तिला मनापासुन thanks म्हणाले कारण ती कळी जरी उमलली नव्हती तरी ती माझे विचार फ़ुलवून गेली........मनाला स्पंदुन गेली........