आठवणीतील चाफा - मेधा दातार

रत्नागिरी जिल्ह्यातील सावर्डे एक छोटेसे गांव. त्या गावात गोडबोले कुटुंब राहत होते.तिथे त्यांचे लाल रंगाच्या विटांनी बांधलेल्या भिंती, वरती छताला कौले असलेले आणि खूप मोठे असे घर साधारण सात ते आठ खोल्या असलेले. हे घर कसं छान प्रशस्त वाटत होते.घरापुढे मोठे अंगण होते.घराच्या दरवाज्यातून जेवढी पाऊल वाट निघते जी पुढे रस्त्याला जाऊन मिळेल तेवढी ही पाऊल वाट होती.अगदी नागमोडी वळणा-वळणाची.आणि त्या अंगणात पाऊल वाटेच्या दूतर्फा खूप झाडे लावली होती.वाऱ्याच्या वेगानं मस्त डौलदार डोलणारी हिरवीगार झाडे बघायला छान वाटायचं.

अप्पांनी म्हणजेच अच्युत काकांनी थोडक्यात ते काका त्या घराचे मालक होते.ते पोस्टमसातर होते त्या गावातल्या पोस्ट ऑफिसचे.त्या काकांना दोन मुले होती.एक मोठी मुलगी आनंदी जी लग्न होऊन आता ती पुण्यात स्थायिक झालेली.धाकटा मुलगा अनिकेत जो मुंबईत असतो त्याचे ही लग्न झालेले.त्यामुळे घरात फक्त अप्पा आणि अर्चना वहिनी असायच्या.अर्चना वहिनी म्हणजे आप्पांची बायको.त्या दोघांचाही जीव तिथेच रामयचा.त्यांचा निसर्गाशी भरपूर सहवास होता.तिथे त्यांची आपुलकीची माणसे ही असायची आसपास. तिथे त्यांचा मजेत वेळ ही जायचा. त्यामुळे ते दोघेही कधी पुण्यात लेकीकडे किंवा मुबंईला लेकाकडे कारणाशिवाय जात नसे.तिथे त्यांचं मन ही रमत नव्हतं.... त्या गजबजलेल्या आणि गोंगाट असलेल्या शहरात.इथे कसं सगळीकडे शांत शांत असायचे.

असो,अप्पा आणि अर्चना वहिनींना झाडांची आवड भरपूर.त्यांनी अंगणात अनेक झाडे लावली होती.एका बाजूला फुलझाडे आणि दुसऱ्या बाजूला फळझाडे...फुल झाडे हा विभाग अर्चना वाहिनींनचा आणि अप्पांचा विभाग फळझाडांचा. अंगणात नारळाची चार झाडे, एक फणसाचे झाड,कलमी आंब्याचे दोन झाडे, पेरू आणि सीताफळ ह्यांची दोन दोन झाडे शिवाय करवंदाचा वेल. अशी अनेक झाडे आप्पांनी लावलेली होती अप्पा उत्तम त्यांची निगा राखत.

इकडे गुलाब दोन तीन रंगाचा, मोगरा, पारिजातक, झेंडू, जाई-जुई,शेवंती आणि सर्वच बायकांना आवडणारे फुल म्हणजे चाफा...जो खूप छान वास आणि हवाहवासा वाटणारा चाफा.ह्या चाफ्याबरोबर अर्चना वहिनींनची छान गट्टी जमली होती.चाफ्याच्या झाडाला रोज एक पाच सहा फुले लागलेलीच असायची.त्या चाफ्याबरोबर वाहिनींनचे रोज काहींना काही हितगुज चालायचे ते त्या झाडाला पाणी घालायच्या वेळेस.तिथे त्या तासनतास रामयच्या.

सर्व फुले गोळा करायची थोडया फुलांचा गाजरा करायचा आणि उरलेली फुले ही देवाला घालण्यासाठी.आणि वेळेला शेजाऱ्यांना ही देत असत पण चाफा सोडून.त्या चाफ्याची फुले गोळा करून 10 फुले झाली की त्या फुलांचा कधी गजरा करणार तर कधी आंबड्याला गोलाकार चक्र बनविणार.असे त्यांचे दिनक्रम चालू असायचे.सर्व झाडात त्या चाफ्याच्या झाडाला फार जपत. रोज सकाळी आणि संध्याकाळी त्या झाडांना पाणी घालत.ते ही न चुकता आणि अप्पा ही तिकडे फळ झाडांना पाणी घालत. कोकणात घर असल्याने पावसाळयात तर काय आनंदच असायचा नुसता.हिरवी गार झाडे बघत त्यांच्या विषयी चर्चा करत.पण तरीही वाहिनींनचे लक्ष्य हे चाफ्याकडेच. बाजूला पावसाळ्यात ओढा तुडुंब दुथडी भरून वाहायचा.हे सर्व निसर्गाची किमया बघायला मात्र फक्त हे दोघेच.

मे महिन्याच्या सुट्टीत मात्र त्यांची मुलगी आनंदी आणि तिची दोन मुले अर्णव आणि अर्पिता व सून अनुजा तिची दोन मुले अनीष आणि अन्वी आणि अनिकेत यायचे बाकी सर्व जण राहाचे.पण आनंदी आणि अनिकेत हे दोघे मात्र सुट्टी नसल्याने परत ऑफस वर्क साठी पुन्हा परतीच्या मार्गाला लागायचे.अनुजा मात्र तिथेच राहायची चांगली मुलांच्या शाळा सुरू होईपर्यत.तिची दोन्ही मुले आणि नणंदेची दोन मुले अशी चौघांना घेऊन तिथेच राहायची.त्यामुळे तिला ही आवड व्हायची त्या घरात राहायची. आज्जी आजोबा सून आणि नातवंडे असा परिवार व्हायचा.मज्जा यायची सगळ्यांना तिकडे.आज्जी मुलांना आंबा पोळी, तर कधी फणस पोळी करून घालायची.

सुनेला म्हणजे अनुजाला चाफ्याच्या फुलांचा गजरा करून देत असे आणि पण अनुजा असली की मग स्वतः नाही घालायच्या.अनुजालाच देत घालायला आणि म्हणायच्या की तू येतेस दिड-एक महिना एरव्ही मला असतोच की हा चाफ्याचा गजरा आणि अंबाडया साठी हे चक्र.तू असे पर्यंत मी तुला हे करून देणार...अनुजा ही खूश व्हायची तिच्या सासूबाईंचे बोलणे ऐकून.ती ही तिथे असे पर्यंत त्यांच्या कडून सारं शिकून घ्यायची. चाफ्याचा गजरा, ते चक्र शिवाय इतर फुलांच्या पासून ही गजरा, हार झेंडूच्या फुलापासून, गुलाबाच्या फुलापासून गुच्छ करायला हे सारे ती अर्चना वहिनींनकडून शिकून घेत.

इकडे चार ही नातवंडे म्हणजे मोठा नातू अर्णव आणि नात अर्पिता तसेच छोटा नातू अनीष आणि नात अन्वी ह्या चार ही जणांना अप्पा आंबे काढून देत, करवंदे काढून देत, फणस काढून त्यातील गरे काढून देत तर कधी पेरू आणि सीताफळ.मुले ही शिकली अप्पांसारखं झाडावर चढायला.फळे काढायला.मज्जा यायची त्यांनाही तिकडे.बाजूलाच एक हौद होता त्या हौदातून पंप लावून पाणी काढून पाईप लावून झाडांना पाणी घालायला मुले ही तयार असायची. अनुजा ही आप्पांची लाडकी सून होती.अप्पा तिला नेहमी सांगत शहरातल्या घराचं बघायला तुझी मुले मोठ्ठी झाले की बघतीलच त्यात शंका नाही पण...

इथल्या घराचं, मातीचं, झाडांचं शेवटी तुलाच बघावे लागेल तेव्हा त्यांच्या डोळ्यातील अश्रू मात्र आल्या शिवाय राहायचे नाहीत. अनुजा ही साधी आणि सरळ स्वभावाची असल्याने ती ही अप्पानां सांगायची की हो अप्पा मी बघेन सर्व.असं म्हणत ती अप्पांना मानसिक दिलासा देत.अप्पा म्हणायचे अर्चनाने मला साथ दिली हे सर्व सांभाळण्यासाठी तिने कधी ही कुरबुर नाही केली, अनिकेत ला सांगत होतो मी की तू सिव्हील इंजिनिअर झालास मोठा झालास इथेच राहून तुझ्या शिक्षणाचा उपयोग कर.आपलं हे घर पण अजून सजेल तुझ्या इथे असण्याने,पण नाही ऐकलं त्याने त्याच्या डोक्यात मुंबई होती.तेथील लाईफ स्टाईल त्याला जगायची होती.गावातील नाही.खूप वाईट वाटलं.पण तू अनिकेत रिटायर्ड झाला की तुम्ही दोघेही इथेच येऊन रहा.ह्या सर्व वैभवाची देखभाल करा अशी अपेक्षा करतो करण अनुजा तू समजूतदार आहेस तुला ही आवडतं इथे राहायला, पाहतोय की आता अनिकेत नसला इथे तरी मुलांना घेऊन इथे राहतेस दीड-एक महिना म्हणून मी तुला सांगतोय सुनबाई.असं म्हणत अप्पा चष्मा वर घेत डोळ्याच्या कडा पुसत नातवंडाशी पत्त्याच्या डावात रमून गेले.

अनुजा स्वयंपाक घरात गेली तर अर्चना वहिनी सुने साठी आणि नातवंडांसाठी भोपळ्याचे घारगे संध्याकाळ साठी करत होत्या.शिवाय आप्पांनी अंगणातील नारळाच्या झाडाचे नारळ फोडून दिले होते. ते नारळ खोवून त्याच्या ओल्या नारळाच्या वड्या ही करून ठेवल्या होत्या अर्चना वहिनींनी.अनुजा ला ही खूप कौतुक वाटतं होते ह्या ही वयात एवढ्या ऍक्टिव्ह पणे न थकता आनंदाने कसे काय करतात हे सर्व.करण सकाळी तर फणस पोळी केली होती वहिनींनी. अनुजा स्वयंपाक घरात आल्याचे बघून वहिनींनी अनुजा जवळ बोलवू लागल्या लागल्या ये गं अनुजा, तुला शिकवून ठेवते हे सारे कसे बनवायचे ते.अनुजाही लगेच तयार झालेली पाहून वहिनी म्हणल्या, मी आनंदी ला खूपदा म्हणायचे शिकून घे सारे.तर ऐकले नाही तिने.उलट म्हणायची मी कुठे इथे राहणारे तेव्हा आणि मला इथला नवरा ही नको कोकणातला.अगं अनुजा कोकणात येण्यासाठी इथे समुद्र सपाटी वर रमण्यासाठी, इथला निसर्ग बघण्यासाठी इथला रानमेवा खाण्यासाठी लोकं कुठून कुठुन येतात गं पण आनंदीच्या मनातील तारे काही वेगळेच.चांगली शिकली प्रोफेसर झाली आणि भुर्रकन उडून जावे अशी ती अविनाशरावांशी लग्न करून सुखी संसार करायला पुण्याला सासरी गेली.इकडे मात्र आम्ही दोघे म्हातारा-म्हातारी घर आणि ह्या घराचे वैभव आम्ही सांभाळत होतो.

आम्ही दुःखी झालो की हेच घर हेच फळ-फुलं झाडे आनंदाने डोलुन सांगायचे आम्हाला,'जरा धीर धरा...येतील मुले इथेच परत,आम्हा सर्वांची काळजी घ्यायला.'आणि ती आनंदाने डोलणारी झाडे आमची समजूत घालायची. अनुजा सर्व ऐकत होती.तिला आता वाटू लागले की आपण इथेच येऊन राहायचं.पण अनिकेत पुढे तिचं काही चालायचं नाही.वहिनींनीही ही काळजी अनुजा पुढे बोलून दाखवली...उद्या आम्ही जगात नसू तेव्हा ह्या बागेचं कसं होणार, माझी फुले विशेषतः माझा चाफा अबोल राहील त्याचं काय...अनुजा ने ही सांगितले येऊ आम्ही इथे काळजी करू नका. आम्ही आहोत हे सर्व बघायला, मी अनिकेत ला इथे आणेन म्हंटल्यावर वहिनी डोळ्यांतील अश्रू पुसून अनुजा कडून तसे वचन घेतात आणि अनुजाने वचन देते सुद्धा.

मामी मामी म्हणून अर्णव आणि अर्पिता अनुजाकडे आली.बाहेर अंगणात फिरायला ये म्हणत अनुजा जवळ येऊन बसली अनुजा ही त्यांना आपल्याच मुलांप्रमाणे सांभाळत होती दीड महिना.तोपर्यंत मागून लगेच अनीष आणि अन्वी ही आले.चार ही जणांना अनुजाने खायला दिले. शिवाय त्यांची स्वतःची  आंब्याची बाग ही होती आप्पांची.नातवंडे आणि सून आहेत म्हणून बागेतून हापूस आंबा घेऊन आले मनोसक्त सगळ्यांनी आंब्यावर ताव मारला.आधीच आनंदीच्या सासरी आनंदी बरोबर आंबा पाठवला होता.आणि अनिकेत जरी तिकडे एकटा राहिला मुंबईत थोडे दिवस तरी त्याच्या बरोबर त्याला म्हणून ही आंबा पाठवला होता.

मुलं,अनुजा आणि अप्पा त्यांच्या आंब्याच्या बागेत फिरायला गेली होती.मुले मजेत होती अप्पांबरोबर फिरायला ताठ होती,एन्जॉय करत होती.मनसोक्त बागडत होती.झाडावर चढत होती फांद्यांना लटकून खेळत होती.कच्या कैऱ्या पाडत होती.अनुजा गोळा करून घेत होती.सगळं झाल्यावर अनुजा पुढे आली घरी तिने त्या कैऱ्या तिच्या सासूबाईकडे दिल्या.त्यांनी लगेच त्याचे लोणचे घातले आणि अनुजालाही शिकवले.

अश्या खूप साऱ्या आठवणी घेऊन अनुजा आता निघणार होती कारण मुलांच्या शाळा सुरू होणार होत्या.मुलांचा ही जीव तिथे गुंतला होता.पण नाईलाजाने त्यांनाही निघावं लागणार होतं. अप्पा त्यांना स्टँडवर सोडायला गेले. अर्चना वहिनी आणि अप्पनच्या डोळ्यात पाणी उभारलं.आनंदीची मुले अनिकेत कडे जाऊन मग पुण्या ला येणार होती.

अनुजा मात्र अजूनही मनाने कोकणात होती.तिने मनाशी पक्कं ठरवलं काही झाले तरी आपण तिकडे जायचे.आनंदी ची मुले आता पुण्याला गेली.आणि अनीष आणि अन्वी पण आता शाळा सुरू झाल्याने पुन्हा गुंतली...दिवस भर भर पळत होते.मुले मोठ्ठी झाली आपापल्या मार्गाला लागली.तिकडे आनंदी ची मुले ही एव्हाना मोठी होऊन आपापल्या मार्गाला लागली.सगळे आता सेट झाले होते.अनिकेत ही रिटायर्ड झाला होता...

खूप प्रयत्नांनी अनुजाने त्याचे मन गावाकडच्या घराकडे वळवलं. आता मुंबईत अनीष राहत होता आणि गावाकडच्या घरात अनिकेत राहत होता.अनिकेतने त्याच घरावर अजून एक मजला बांधला.करण नुसती त्यांची दोन मुले च नाहीत तर अनुजाने आनंदी च्या मुलांसाठी ही येऊन राहण्यासाठी हक्काची सोय केली होती.कारण तिला चार ही मुले सारखीच होती.ती ही मुले आनंदाने मामा-मामी साठी गावाकडच्या घरी जात होती. तिकडे आता अप्पा आणि वहिनी नव्हते.त्यांना जाऊन पाच वर्षे झाली होती.सततच्या सहवासाने अनुजा ला तिकडची सर्व माहिती अनिकेत पेक्षा ही जास्त होती.

हे सर्व तिने अनिकेतला सांगितले.अप्पा काय काय करायचे ते तिने सर्व अनिकेतला शिकवले,आणि स्वतःही अर्चना वहिनींप्रमाणे सर्व पदार्थ करत होती.अनीष,अन्वी आणि अगदी आनंदी ची मुले जरी आली तरीही.अनुजा,आनंदी जरी माहेरपणाला आली तरीही तिचं माहेरपण ती आनंदाने करत.अनिकेत ही आता त्या घरात रुळला होता.सगळं रुटीन कसं छान बसलं होतं. अनिकेतला ही आता अनुजाचा अधीपेक्षा ही जास्त अभिमान वाटत होता कारण अनिकेतनं  तिच्या मुळे हे घर आणि हा निसर्ग त्याने आपलसं केलं होतं.

आज दोघे ही झाडाला पाणी घालत होते अप्पांप्रमाणे अनिकेत फळ झाडाला आणि अर्चना वहिनींनप्रमाणे अनुजा फुलझाडांना पाणी घालत होती.जेव्हा पाणी घालत चाफ्याच्या झाडापाशी अनुजा आली तेव्हा तिला तिच्या सासूबाईंची आठवण झाली होती.त्यांनी बनवलेला तिच्यासाठी चाफ्याचा गजरा असो किंवा चाफ्याचे ते गोल चक्र असो...आणि तिने सासूबाईंना आणि अप्पानां दिलेले वाचन आठवते.ते पूर्ण झालेल्याचे तिला सार्थक वाटत होते. एवढ्यात अनिकेत ने अनुजाला हाक मारली आणि विचारात गुंतलेली अनुजा भानावर येऊन अनिकेतला ओ म्हणत त्याच्या कडे गेली तर पाहते तर तिचा लाडका मुलगा अनीष आणि त्याची बायको अनुष्का आले होते.बरोबर आरव ही होता.आरव हा अनुजा आणि अनिकेतचा नातू. तसेच आरोही ही होती सोबत.आरोही अन्वीची मुलगी.ह्या दोन नातवंडांना बघून अनिकेत आणि अनुजा खूश झाले.

लगेच स्वयंपाक घरात गेलेली अनुजा तिच्या नातवंडांसाठी ओल्या नारळाच्या वड्या आणि आंबा पोळी करायला गेली.आणि फ्रीज मध्ये ठेवलेला चाफ्याचा गजरा जो तिने स्वतःसाठी केलेला तो स्वतः न घालता तिच्या सुनेला म्हणजे अनुष्काला दिला...आणि चाफ्याच्या गाजऱ्याची परंपरा तिने गावाकडच्या घरात पुढे तशीच चालू ठेवली स्वतःच्या सासूबाईंसारखीच...

समाप्ती,
मेधा