सुंदरी - साक्षी शिंदे

 सुंदरी

नाकात नथ तुझ्या

पायांत पैंजण

दिसशी अशी गोड तू

जशी अंधाराची चांदणं

 

भुवई तुझी वेलापरी

डोळालागे मोत्यासम

समोरूनी जाता तूही

सुगंध येतो घम घम

 

रात्रीच्या अंधारात चंद्रासारखा 

चमकतो चेहरा तुझा

काय तुझं हे सौंदर्य

यापुढे जीव ही नाही हा माझा

 

कानी तुझ्या मोत्यांचे दागिने

नाकात गुंड सोन्याचा

कधीतरी ये माझ्या घरी

दिवस उजाडेल माझा धन्याचा

 

ओठ तुझे चिंचोळे 

जसे गुलाबांच्या कळ्या 

रोज तुझ्यासाठी 

माझ्या दारात रचतात रांगोळ्या

                                 

                                  - साक्षी शिंदे