कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर
कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर (नोव्हेंबर २५, १८७२ - ऑगस्ट २६, १९४८) हे ख्यातनाम मराठी नाटककार, पत्रकार होते.
संगीत विद्याहरण

कचाने दैत्यगुरू शुक्राचार्यांकडून संजीवनी विद्या कशी मिळविली, याचे यथार्थ वर्णन या नाटकातून प्रभावीपणे जाणवते.

संगीत स्वयंवर

श्री रूक्मिणीस्वयंवराच्या सर्वश्रुत कथानकातील, श्रीकृष्ण व रूक्मिणी यांच्या चरित्रातील उदात्त तत्वे श्री कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांनी नाटकाद्वारे प्रेक्षकांपुढे मांडली.