३१.धर्मशाळेत राहिले आहोत असे दिसल्यास– दारिद्र्य येईल व कार्यहानी होईल, कारागृह भोगावा लागेल, रोग पुष्‍कळ दिवस राहील.
३२.कुठल्यातरी घरावर चढताना पाहिल्‍यास- उद्योगाला वृ‍द्धी आणि धनसमृद्धी होईल.
३३.दुस-यांना चढवताना दिसल्यास– शुभ बातमी समजेल समजेल. 
३४.कोणतीतरी वस्‍तू ओलांडत आहोत असे पाहिल्यास- संकटे नाहीशी होतील. 
३५.वरून वस्‍तू पडतांना पाहिल्यास- आपल्या हातून परोपकार घडतील.
३६.स्वतः झाडावर चढत आहोत असे पाहिल्यास- मेजवानीचे जेवण मिळेल, आरोग्‍य आणि धनलाभ होईल.
३७.पळस, कडुनिंब, या झाडावर चढलो आहोत असे असता-  विपत्ती प्राप्‍त होईल.
३८.अशोक, पळस या वृक्षांना फुले आली आहेत असे दिसल्यास– दुःख प्राप्त होते.
३९.स्‍वप्‍नांमध्‍ये चिखलात बुडालो आहोत असे पाहिल्यास- मृत्‍यु येतो.
४०.देवालय, राजगृह, पर्वताचे शिखर, औदुंबर, फळांनी लगडलेला वृक्ष यांच्‍यावर चढताना स्‍वप्‍नात पाहिल्यास- कार्यकिद्धी व द्रव्‍यलाभ होईल.
४१.रोग्‍याने वरील स्‍वप्‍न पाहिल्‍यास– रोग्याचे रोग दूर होतील. 
४२.पाय-या नसलेल्‍या डोंगरावर रांगताना स्‍वप्‍नात पाहिल्यास तर पुष्‍कळ संकटे येऊन शेवटी लोकांकडून मान मिळतो, कीर्ती आणि धनलाभा प्राप्‍ती होईल.
४३.ओल्‍या, भिजलेल्‍या अगर फोडलेल्‍या लहान भिंतीवर चालतो आहोत असे पाहिल्‍यास- कष्‍टप्राप्‍ती होते.
४४.भिंत भस्‍म झाली आहे असे दिसल्यास- मृत्‍यूची शंका असते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel