रोहिदास डॉ. मेहता यांच्याकडे गेला आणि त्यांना काळजीच्या स्वरात विचारले,
“डॉ. मेहता,… तूम्ही ठीक आहात ना…?”
डॉ.मेहता नाराज होते हे स्पष्टपणे दिसत होते स्वतःवर ताबा ठेवत ते म्हणाले,
“काय? हो! हो. YES"
“आपण एकमेकांना नीट ओळखत नाही. पण आपण इथे एका टीमप्रमाणे काम करत आहोत. तुम्ही जरा चिंतेत आहात असे वाटते. सर्व काही ठीक आहे ना?" रोहिदास चिंतित स्वरात पुन्हा म्हणाला.
रोहिदासने केलेल्या चौकशी मुळे त्यांना आराम वाटला आणि ते याच्या कानात कुजबुजले,
"अरे हा माणूस तासाभरातच उठला."
"म्हणजे?" रोहिदासला काही समजले नाही.
"हे कसं शक्य आहे?" डॉ मेहता आश्चर्याने डोळे विस्फारत म्हणाले.
"शक्य नाही कसं? तुम्हाला काय म्हणायचं आहे? आम्ही सर्वांनी त्याला उठताना इतक्यातच पाहिलय..” रोहिदासने निरागसपणे विचारले.
"तेच तर! तेच मला त्रास देतंय. रोहिदास. अरे त्या औषधाचा फक्त एक डोस माणसाला चार ते पाच तास झोपवतो.
तुला माहीत आहे का? पहिल्या डोसपासून तो साधा मूर्च्छित हि झाला नाही. मग मी त्याला नेहमीच्या दुप्पट डोस दिला. तर थोडावेळ तो झोपी गेला, पण जरा शुद्धीत होता. मी त्याला तोच डोस पुन्हा दिला.
एवढा डोस एखाद्या व्यक्तीला मारण्यासाठी पुरेसा आहे आणि तो मनुष्य अवघ्या तासाभरात पुन्हा शुद्धीवर आला."
डॉ.मेहता यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले.
"हे म्हणजे माझ्या ज्ञानावर आणि कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. हे कसं घडलं हे मला शोधून काढावे लागेल?"
डॉ मेहता ठामपणे म्हणाले.डॉ. मेहता जे काही बोलले ते रोहिदासच्या समजण्यापलीकडचे होते. म्हणून ते टाळण्यासाठी त्याने विचारले,
"हे तुम्ही डॉ. चंदावरकरांना सांगितले होते का?"
“हो, मी सांगितलं. पण कदाचित डॉ. चंदावरकरांना अनंतबद्दल अशा काही गोष्टी माहित आहे ज्या आपल्याला माहिती नाहीत. अनंत महाकाल याने डॉ. चंदावरकरांना डोळे उघडून पाहिले तेव्हा त्यांनी त्यांना ‘अण्णा’ या टोपण नावाने हाक मारली!” ,
"हो ना.,,त्याला कसं कळलं?" रोहिदासला आश्चर्य वाटले.
"तोच तर मुद्दा आहे. त्याला हे सगळं कसं माहित? डॉ. चंदावरकरांचे आडनाव माहीत असलेली आणि स्वतःचे नाव माहित नसल्याचा दावा करणारी व्यक्ती!" डॉ. मेहता
"तू मिशनवर आहेस का?" डॉ.सोनाली पर्रीकर पुन्हा सावध होऊन बसल्या.
"होय." अनंत महाकालने मान हलवत उत्तर दिले.
सगळ्यांच्या चेहऱ्याचा रंग उडाला.
डॉ.चंदावरकर यांच्या चेहऱ्यावरील भाव त्यांच्या मनातील संभ्रम प्रकट करत होत्या.
या निर्जन बेटावर एका गुप्त इमारतीत विविध क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट लोकांना एकत्र जमवून एका दहशतवाद्याची चौकशी करून त्याला नको इतकं महत्त्व देण्यात येत असल्याचा विचार KGB च्या मनात आला आणि ती तणावग्रस्त झाली. डॉ. सोनाली पर्रीकर देखील घाबरल्या होत्या.
"मला माहीत होतं! हा पाकिस्तानी आहे. तो अतिरेकी दिसतो. ISI चा माणूस दिसतोय” अभिषेक म्हणाला.
अभिषेकच्या बिनबुडाच्या स्टेटमेंटकडे सोनाली पर्रीकरने त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि पुढे विचारले.
"तुझा नक्की उद्देश काय आहे?"
"गुप्तता बाळगणे आणि गुप्त राहणे." अनंत म्हणाला.
"काय गुप्त ठेवायचं?"
"माझ्या वस्तु."
"तू त्या कुठे लपवून ठेवतोस?"
"माझ्या आठवणीत...आणि माझ्या लॉकरमध्ये."
"तू कोणासाठी त्याचं संरक्षण करतोस?"
"समस्त मानवजातीसाठी." अनंत दिव्य स्मितहास्य करत म्हणाला.
कोणताही प्रश्न न करता ओम म्हणाला, "नाही, मी दहशतवादी नाही."
आता डॉ. सोनाली पर्रीकर यांचा संयम सुटला. त्या मागे वळल्या आणि त्यांना जाणवले की ते सर्व संभ्रमात आहेत.
डॉ.चंदावरकर फोनवर कोणाशी तरी बोलत होते. डॉ. सोनाली पर्रीकर यांचा चेहरा पाहताच त्यांनी फोन ठेवला आणि विचारलं
“काय झालं?”
“त्याने मला असा कोणताही प्रश्न न विचारता उत्तर दिलं. त्याला दहशतवादी असल्याबद्दल कोणी विचारले? आश्चर्यचकित होऊन सोनाली पर्रीकर यांनी टीमला विचारले.
"कृतिका गुरुनाथ भोसले." अनंतने उत्तर दिले.
“मी रोहिदासशी तो दहशतवादी असण्याच्या शक्यतेबद्दल बोलत होते; पण मी खूप हळू बोलले.” KGB म्हणाली
रोहिदासने यावर होकारार्थी मान हलवली.
"पण ह्याला तुझे बोलणे कसे ऐकू आले आणि मला नाही आले?" डॉ. सोनाली पर्रीकर यांना टेन्शन आले. "अगं पण मी तर त्याच्यापेक्षा तुझ्या जवळ बसले आहे."
KGB ला काय बोलावे ते कळेना, म्हणून ती गप्पच राहिली.
दुपारची वेळ झाली होती आणि अनंत महाकालने पुन्हा एकदा आपल्या जागृत अवस्थेची जाणीव करून दिली.
रणधीरने त्याच्या घड्याळाकडे पाहिले दुपारचे २.०० वाजले होते. तो गार्डसना पाहण्यासाठी खोलीबाहेर गेला.
यादरम्यान अनंतने डॉ. सोनाली पर्रीकर यांच्या भयभीत नजरेकडे पाहिले आणि जणू काही वडील आपल्या मुलीला सांगत आहेत अशा स्वरात,
“तुम्हाला तुमची उत्तरे मिळविण्यासाठी हे करण्याची गरज नाही. मी सध्या तुमच्या ताब्यात आहे. तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही माझ्याशी वागू शकता. कोणतीही भीती न बाळगता पुढे जा. मी कोणाचेही नुकसान करणार नाही. मी कधी केले नाही. माझ्यावर विश्वास ठेवा, मी तुम्हाला मदत करेन.”
यावर सोनाली पर्रीकर काहीच बोलू शकल्या नाहीत.
डॉ. मेहता खोलीतून डॉ. चंदावरकरांकडे गेले आणि म्हणाले,
"ह्याला तपासण्यासाठी मला तुमची परवानगी हवी आहे." ते खूप उत्साहात होते.
चंदावरकरांनी डॉ.मेहता यांना मदत करण्याचे कष्ट घेतले नाहीत. ते त्यांच्या कामात मग्न राहिले.
सोनाली पर्रिकर अनंतला सोडून इतरांकडे वळल्या. डॉ. पर्रीकर त्यांच्याकडे येताना पाहून डॉ.चंदावरकरांनी विचारले.
"येस, डॉ. पर्रीकर?"
"सर, मला वाटतं की आपण कोणतीही औषधे किंवा संमोहन यांचा प्रयोग न करता त्याची चौकशी करण्याचा प्रयत्न करायला हवा." डॉ.सोनाली पर्रीकर यांनी आपला विचार मांडला.
डॉ.मेहता यांना सोनाली पर्रीकर यांचे विधान हास्यास्पद वाटले, पण ते गप्प राहिले.
“आपण ते करू शकतो, पण त्याच्या शब्दांच्या सत्यतेची जबाबदारी कोण घेणार? आणि तो खरं बोलतोय हे आपल्याला कसं कळणार?” डॉ.चंदावरकर म्हणाले.
"पण हे आता जे चालू आहे त्याचाही काही फायदा दिसत नाहीये." डॉ. सोनाली पर्रीकर म्हणाल्या.
“सर प्लीज. कृपया मला एकदा त्याची तपासणी करू द्या सर. मला त्याच्या रक्ताच्या नमुन्याची गरज आहे.” डॉ. मेहता यांनी पुन्हा रिक्वेस्ट केली.
“तो कोणी गिनी पिग नाही ज्यावर तुम्ही संशोधन कराल, डॉ. मेहता! मी तुम्हाला हा विशेषाधिकार देऊ शकत नाही.” हे एकच उत्तर डॉ. मेहता यांना मिळाले.
डॉ.मेहता आणि डॉ.सोनाली पर्रीकर यांनी एकमेकांकडे पाहिलं. दीर्घ श्वास घेऊन डॉ. सोनाली पर्रीकर म्हणाल्या,
"ठीक आहे, सर, मग आता काय करायचं?"
इतक्यात डॉ.चंदावरकरांचा फोन वाजला. त्यांनी खिशातून फोन काढला आणि फोन करणाऱ्याचे नाव पाहून ते अस्वस्थ झाले.
"तुम्ही सर्वजण जरा ब्रेक घ्या आणि नंतर पुढील सेशनची तयारी करा." चंदावरकर घाईघाईने फोन उचलण्यापूर्वी म्हणाले. ते खोलीबाहेर गेले.
डॉ.चंदावरकर निघून जाताच वातावरणात काहीसे निवळले. KGB च्या चेहऱ्यावर अचानक हसू उमटले. रोहिदासने अभिषेककडे पहिले आणि नंतर KGB कडे पाहिले.
डॉ.मेहता यांच्याकडे प्रश्नांची उत्तरे नसल्याने ते चिंतेत होते.त्याचप्रमाणे डॉ. सोनाली पर्रीकर यांची नजर अनंत महाकालवर स्थिर होती, जो त्याच्या आजूबाजूच्या गोष्टी आणि लोकांचं कुतूहलाने निरीक्षण करत होता. डॉ. सोनाली पर्रीकर यांच्याकडे नजर टाकताच त्यांनी दुसरीकडे नजर फिरवली.
त्याचवेळी सुरक्षा प्रमुख रणधीर इतर दोन रक्षकांसह खोलीत आले. ते म्हणाले
"सर्वजण कृपया बाहेर थांबा." त्यांनी हाताने दरवाजाकडे इशारा केला. सर्वांना बाहेर जायला काही क्षण लागले.
रणधीर आणि अनंत महाकाल हे दोघेच आता तासभर खोलीत राहाणार होते.
क्रमश: