बाजीराव बल्लाळ ( बालाजी ) ( १८ ऑगस्ट, १७०० - २८ एप्रिल, १७४०), पहिले बाजीराव या नावाने हि ओळखले जाणारे , नावाजलेले सेनापती ज्यांनी मराठा पेशवा (प्रधान मंत्री ) म्हणून मराठा साम्राज्याचे चौथे छत्रपती (सम्राट) छत्रपती शाहू राजे भोसले यांच्या अखत्यारीत १७२० पासून मृत्यू पर्यंत सेवा केली. त्यांना थोरले बाजीराव म्हणून हि ओळखले जात. 'राऊ' या टोपण नावाने हि ते लोकप्रिय होते.

बाजीरावांनी ४१ युद्धे लढली आणि त्यातले एक हि ते हरले नाहीत.

मराठा साम्राज्य वाढवण्याचे श्रेय बाजीरावांना दिले जाते , विशेषतः उत्तरेमध्ये , ज्यामुळे बाजीरावांच्या मृत्यू च्या वीस वर्षा नंतर हि  , त्यांच्या मुलाच्या कारकीर्दीमध्ये कळस गाठण्यास मोठे योगदान मिळाले.  नऊ मराठा पेशाव्यांपैकी बाजीराव हे सर्वात जास्त प्रभावी व्यक्तिमत्वाचे पेशवे म्हणून ओळखले जातात. असे म्हटले जाते कि ते "हिंदू पद पादशाही " (हिंदू साम्राज्य ) च्या स्थापनेसाठी लढले.

बाजीरावांचा जन्म , छत्रपती शाहू चे पहिले पेशवा असणाऱ्या , बालाजी विश्वनाथ यांचा मुलगा म्हणून , मराठी चित्पावन ब्राह्मण घरामध्ये झाला. पेशवा पदासाठी जास्त अनुभवी आणि वयस्कर दावेदार असतानाही , वडिलांच्या मृत्युनंतर , वयाच्या विसाव्या वर्षी , शाहुंनि ,  बाजीरावांची पेशवा म्हणून नियुक्ती केली. या नियुक्ती मुळे ,पोरसवद्या वयातील बाजीरावांना पेशवा पद देणे म्हणजे शाहुना बाजीरावांच्या कमी वयातच त्यांच्या प्रतिभेची झालेली जाणीव होती हे स्पष्टपणे कळून येते. बाजीराव त्यांच्या सैनिकांमध्ये हि लोकप्रिय होते आणि आज हि त्यांचे नाव सन्मानपूर्वक घेतले जाते.

१७६० मध्ये मराठा साम्राज्याच्या अमलाखाली असलेला प्रदेश ( पिवळा ), जहागीरदारी शिवाय.

आख्यायीकांमध्ये असे सांगितले जाते कि , शाहू महाराज आणि दरबारी समोर , उंच , संयमी आणि आत्मविश्वासाने उभे ठाकलेल्या बाजीरावांच्या शब्दांनी गर्जना केली ,
"चला, दक्खनेच्या पलीकडे जाउन मध्य भारतावर विजय मिळवूया. बायकांच्या आणि दारूच्या नशेमध्ये मुघल निष्क्रीय झालेले आहेत. उत्तरेच्या तहखान्यांमध्ये शतकांपासून  जमा असलेली संपत्ती आपली होऊ शकते. वेळ आलेली आहे कि या पवित्र भारतवर्षा मधून आचारशुन्य  लोकांना बाहेर काढण्याची.  ते जिथून आले आहेत त्यांना त्या हिमालयामध्ये परत धाडूया. मराठा साम्राज्याचा ध्वज कृष्णे पासून सिंधू पर्यंत फडकायलाच हवा. हिंदुस्थान आपला आहे ."

त्यांनी आपली नजर शाहू महाराजांवर रोखली आणि ते म्हणाले,
    "घाव, घाव घालायचे बुंध्यावर म्हणजे त्याच्या फांद्या आपोआप खाली पडतील. ऐका, मी काय म्हणतो आहे ते, मराठा साम्राज्याचा केसरी अटकेवर फडकविन!
    शाहू अतिशय प्रभावित झाले आणि उद्गारले ,"तुम्ही तो स्वर्गातीत हिमालयावर हि फडकवताल"


या कथेमधून बाजीरावांची असामान्य दृष्टी आणि या तरूणा वरचा शाहू महाराजांचा गाढ विश्वास दिसून येतो. बाजीरावांची प्रतिभा ओळखून आणि मुघल - मराठा विरुद्ध झालेलि लढाई जिचा शेवट १७०७ मध्ये झाला , त्यामध्ये विजय प्राप्त करून मिळालेल्या शाही सैन्याचा विश्वास त्यांच्या वर टाकून शाहू महाराजांनी तरुण वयामध्येच बाजीरावांची पेशवा पदी नेमणूक केली. बाजीरावांचा मोठेपणा इथेच दिसून येतो, आपल्या स्वामीच्या व्यक्तव्व्याला  खरेपणा देत आणि अनुभवी सैन्याची व्यवस्था लावत, त्यांनी मराठा लष्करासोबत भारताच्या उपखंडावर विजय प्राप्त करून दहशत बसविली. १७५८ मध्ये झालेल्या, अटक लढाई मध्ये , अखेरीस सिंधू नदीच्या काठावर वसलेल्या अटक वरती १७५८ मध्ये च मराठ्यांनी विजय मिळविला.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel