अफाट मोगली सैन्याशी धैर्याने आणि असामान्य शौर्याने लढा देणारा हा छत्रपती उत्तम साहित्यिक आणि संस्कृत चा उत्तम जाणकारही होता. संभाजी महाराजांनी बुधभूषण हा संस्कृत ग्रंथ, तर नायिकाभेद, नखशीख आणि सातसतक हे ब्रज भाषेतले ग्रंथ लिहिले. लहानपणीच कवी कलश,महाकवी भूषण,गागाभट्ट यांसारख्या विद्वानांच्या संपर्कात आल्याने तसेच आपले पिता शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी नेतृत्वाने प्रभावित होऊन त्यांनी हा राज्यानितीशास्त्रपर रचला असावा.ग्रंथाचा सुरुवातीला शहाजी राजे,शिवाजी राजे यांची स्तुती आहे.एकूण तीन अध्याय आहेत यात राजनीती,राज्य व्यवस्था,कर्तव्ये,मंत्रिमंडळ इत्यादी प्रकरणे आहेत.संभाजी राजांनी शंभूराज, नृपशंभू,शंभूवर्मन या नावानी साहित्य निर्मिती केली या महान छत्रपतींना अनेक भाषा बोलता आणि लिहिताही येत होत्या.त्यांचे संकृत दानपत्र प्रसिद्ध आहे,ब्रज भाषेतील सातसतक,नखशिख,नायिकाभेद हे ग्रंथ उपलब्ध आहेत.मुंबई विकत घेण्याच्या संबंधीचा पूर्ण व्यवहार हा इंग्रजीतून संभाजीराजांनी केलेला.
या ग्रंथाची निर्मिती शंभूराजांनी वयाच्या १४ व्या वर्षी केली.राजकारण धुरंधर संभाजी महाराज संस्क्रूतमध्ये ग्रंथ लिहितात यावरुनच ते सुसंस्क्रूत,उच्च शिक्षित होते हे स्पष्ट होते.सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिलेले ज्ञानेश्वर माहित आहे पण चौदाव्या वर्षी बुधभूषण लिहिणारा संभाजी राजा माहित नाही किती अज्ञान.
शिवाजीराजे स्तुती -
कलिकालभुजंगमावलीढं निखिलं धर्मवेक्ष्य विक्लवं य: । जगत: पतिरंशतोवतापो: (तीर्ण:) स शिवछत्रपतिजयत्यजेय: ॥ अर्थ-"कलिकालरूपी भुजंग घालितो विळखा,करितो धर्माचा ऱ्हास तारण्या वसुधा अवतरला जगत्पाल, त्या शिवप्रभूंची विजयदुंदुभी गर्जू दे खास ॥ "
शहाजी राजे स्तुती-
भृशबदान्वयसिन्धू सुधाकर: प्रथितकीर्तिरूदारपराक्रम:| अभवतर्थकलासु विशारदो जगति शाहनृप: क्षितिवासव: || अर्थ: सर्वशक्तिमान,सामर्थ्थवान असलेला पृथ्वीतलावरील सर्वश्रेष्ठ असा राजा किंवा प्रत्यक्ष शिवाचा अवतार असलेला उदार पराक्रमी आणि अर्थकारण व राजकारणातील धुरंदर अशा विविध गुणांचा संगम झालेला हा नृपथोर राजा गुणसागरातील चंद्राप्रमाणे शोभत होता. असे सिंधु सुधाकरासारखे प्रचंड पराक्रमी,कार्तिवान,उदार शहाजी राजे होऊन गेले.
श्रीशंभूराजे उर्फ संभाजीराजे यांचे सुबक (संभाजी राजे स्तुती) -
तस्यात्मज:शंभुरिति प्रसिद्ध:समस्तसामन्त शिरोवतंस:| य:काव्यसाहित्य पुराणगीतकोदण्डविद्यार्णव पारगामी || अर्थ: अशा त्या थोर शिवप्रभूंच्या समस्त मांडलिकामध्ये शिरोभूषण म्हणून शोभणारा आत्मज (आत्मन् चा अंश) शंभू(राजा)म्हणून प्रसिद्धीस आला.तो काव्य, साहित्य, संगीत,धनुर्विद्या इ.चा कलासागर पार केलेला होता.(पारंगतच झालेला होता.)
क्षत्रियकुलावतंस शिवछत्रपति यांचे सुबक-
येनाकर्णविकृष्टकार्मूकचलत्काण्डावलीकर्ति | प्रत्यर्थिक्षितीपालमौलिनिवहैरभ्यर्चि विश्वंभरा|| यस्यानेक वसुंधरा परिवृढ प्रोत्तुंग चूडामणे: | पुत्रत्त्वं समुपागत: शिव इति ख्यात पुराणो विभु: ||
अर्थ: ज्यांनी वैर करणाऱ्या महिपालांची (अनेक राजांची)गर्वोन्मत मस्तके (मुंडमाला) विश्वंभरास अर्पण केली,अशा वसुंधरेस गवसणी घालणाऱ्यांमध्ये,उत्तुंग व श्रेष्ठ असणाऱ्या,पुत्र 'शिव'म्हणून पुराणांतरींचा प्रभु(अंशावतार?)जन्मास आला.त्या शहाजीराजांना,महाशूर मुलखाचे धनी असलेले,लोकांना पर्वतासारखे(हिमालय)उत्तुंग म्होरके वाटणारे,पुराणातील पुरूषश्रेष्ठ,शिवासारखे राजे शिवाजी हे श्रेष्ठ पुत्र झाले.