स्टिफन फोन ठेवतो. थोड्याच वेळाने सागरचा मेल येतो. स्टिफन तो मेल त्याच्या ड्रायव्हरला दाखवतो. ड्रायव्हर त्याला प्रसादच्या घराच्या दिशेने घेऊन जातो. विचारांच्या सहवासात स्टिफन पुन्हा बदमाश ग्रुपच्या भुतकाळाचा विचार करतो.
सगळं तर व्यवस्थितच चाललं होतं. अभिजीत, प्रसाद आणि अजय सगळं चांगलंच सांभाळत होते. त्यांना वृषाली, गौरी, शरद आणि अशोकची चांगली साथ तर होती. पुढे काय झालं असावं? सुवर्णाचं पुढे काय झालं असेल? ईश्वर करो, प्रसादच्या घरी मला सर्व प्रश्नांची उत्तरं मिळो. अंतर हळूहळू कमी होत जातं. तो ठाण्याला पोहोचतो, प्रसादच्या घरापासून काही मिनिटांच्या अंतरावर होता तो, आणि प्रसादच्या घरी, शरद आणि अशोक बाहेर गाडीच्या टपावर झोपून मोबाईलमधून फेसबूकवर स्टेटस पाहत असतात.
अशोक, "हे बघ, शिवाजी महाराजांनी ३०० किल्ले जिंकले होते."
शरद, "तू काय करतोस?"
अशोक, "मी लाईक करतोय."
इतक्यात त्यांच्या जवळपास राहणारा एक लहान मुलगा धावत धावत त्यांच्याजवळ आला, "अशोक दादा... अशोक दादा..."
शरद, "चड्डी वर कर आधी."
तो मुलगा नाक पुसत त्या दोघांना म्हणतो, "तिथे एक अमेरिकन माणूस आलाय. प्रसाद काकांचं घर विचारतोय."
अशोक, "कोण आलंय?"
मुलगा, "तिथे नाक्यावर गाडी थांबवलीये त्यांनी."
अशोक, "चल रे शरद."
तिघेही नाक्यावर पोहोचतात. नाक्याजवळ एक गाडी उभी असते. स्टिफन गाडीबाहेर उभा असतो. आणि नाक्यावरची सगळी माणसं आपापली कामं बाजूला ठेवून त्याच्याकडेच एकटक पाहत असतात.
अशोक आणि शरदला घेऊन आलेला मुलगा धावत जाऊन स्टिफनच्या ड्रायव्हरला म्हणतो, "ओ अंकल, दस रुपिया दो. ये देखो उस अंकलके घरवालोंको ले के आया।"
शरद, "ए शेंबड्या, आम्ही त्याच्या घरवाले दिसतो का?"
स्टिफन लगेचच पुढे येतो. शरद आणि अशोकला पाहून म्हणतो, "You are Ashok. And you are Sharad. Right?"
दोघेही दचकतात आणि ‘हो’ म्हणतात. स्टिफन त्या दोघांनाही गाडीमध्ये बसून घरी घेऊन जायला सांगतो. एकदम गोंधळ झाल्याने दोघांना काहीही सूचत नाही. दोघे शांतपणे त्याच्या गाडीमध्ये बसतात. घर येईपर्यंत कोणीही काहीही बोलत नाही. शरद तेवढा ड्रायव्हरला रस्ता सांगत असतो. गाडीच्या मागच्या सीटवर,
अशोक, "You Police Sir."
स्टिफन, "No… No… I am Steafen. I am not Police."
शरद, "आ गये हम।"
खिडकीतून डोकावून स्टिफन ते घर पाहतो. युध्द जिंकलेल्या सेनापतीप्रमाणे भाव चेहऱ्यावर आणून तो अशोककडे वळून बघतो. काही सूचत नसलेला अशोक जास्तीत जास्त गाल वर करुन हलकेच हसू शकत होता. गाडीचा दरवाजा उघडून तिघेही घरात शिरतात.
शरद, "वहिनी... वहिनी..."
मिनाक्षी, "काय झालं? (स्टिफनला पाहून) अगं बाई? आता हे कोण?"
शरद, "माहित नाही. नाक्यावर सापडला. आपलं घर शोधत होता."
मिनाक्षी, "बसा तुम्ही. मी पाणी आणते."
अशोक प्रसादला फोन करुन बोलावतो. अनामिका आणि काजलला घेऊन प्रसाद बाहेर गेला होता. अशोकचा फोन आल्यानंतर तो दहा मिनिटांत घरी पोहोचतो.
अशोक, "पॅडी हा बघ, हाच तो अमेरिकन माणूस, स्टिफन कंपनीमधून आलाय."
प्रसाद काजलला अनामिकाला घेऊन किचनमध्ये जायला सांगतो. इंग्रजीचा प्रॉब्लेम असल्याने सगळे शांत बसलेले असतात. अशोक आणि शरद सोफ्यावर बसून स्टिफनकडे पाहत असतात, तर मिनाक्षी, काजल किचनमधून. प्रसाद त्याच्या समोर बसून हाताची बोटं मोडत शांतपणे स्मितहास्य देत असतो. स्टिफन मात्र या सर्वांकडे कोळशाच्या खाणीमधून निघालेल्या हिऱ्यासारखं पुन्हा पुन्हा पाहत असतो. किचनमधून मिनाक्षी अशोकला ‘काहीतरी बोल’ असं सांगते.
अशोक, "You need extra drinking water?"
स्टिफन, "No. Thanks."
अशोक, "How are you coming Thane?"
स्टिफन, "Sorry? I can’t understand, whatever you say."
शरद, "Any Problem sir?"
स्टिफन, "I wan’t to go to bathroom."
शरद, "Yes… Yes… Sure… Come with me. I will follow you." शरद त्याला वॉशरुममध्ये घेऊन जातो आणि इथे,
मिनाक्षी, "कोण आहे तो?"
अशोक, "काहीतरी स्टिफन कंपनीमधून आलाय."
काजल, "ही कसली कंपनी?"
अशोक, "कदाचीत अमेरिकेच्या पोलिस चौकीचं नाव असेल. स्टिफन चौक."
काजल, "इथे का आलाय तो?"
अशोक, "आपली प्रॉपर्टी पाहिजे असेल त्याला."
मिनाक्षी, "अहो, काही करा ना!"
काजल, "वहिनी, याच्या बोलण्याकडे काय लक्ष देतेस? न्यूज चॅनेलवाला असेल तो."
प्रसाद, "शांत बसा जरा. मी बोलतो त्याच्याशी."
शरद आणि स्टिफन वॉशरुममधून येतात.
शरद, "You swing wrong Nal. It throws warm water from upside taki. We use only Bucket water." स्टिफन पुन्हा येऊन सोफ्यावर बसतो. मिनाक्षी आणि काजल पुन्हा किचनमध्ये जातात.
प्रसाद, "Who are you sir?"
स्टिफन, "Steafen. Steafen from Australia. You’re Prasad, he is Ashok & hey you. You are Sharad. Prasad, your sister’s name is Kajol, right?"
अशोक, "बघा, मी म्हणालो होतो ना! हा अमेरिकन पोलिस आहे ते. सगळ्यांची नावं माहिती आहेत याला."
प्रसाद, "गप्प बस रे. ऑस्ट्रेलियामधून आलाय बोलला ना तो!"
शरद, "आता ऑस्ट्रेलियामधून हा आपल्याकडे का येईल? इथे समोरच्या बिल्डींगमधली मुलगी सुध्दा आपल्याकडे येत नाही."
किचनमधून हळूच आवाज देत काजल प्रसादला सांगते, "दादा, अभिजीत आणि गौरी..."
प्रसादच्या लगेच ते लक्षात येतं, "Yes Sir, what we wan’t to do for you?"
स्टिफन, "I am coming from Australia. टास्मानिया इथे राहतो. मला बदमाश ग्रुपबद्दल माहिती हवी होती."
प्रसाद, "Tasmaniya, means you know Abhijeet & Gauri."
स्टिफन तिथे उपस्थित सर्वांना त्याच्या आणि अभिजीतच्या मैत्रीबद्दल पूर्णपणे सांगतो. मग तो बदमाश ग्रुपची पाश्र्वभूमी आणि भारतात येण्याचं कारण त्या सर्वांना सांगतो. बोलता बोलता तो मराठी शब्दांचा वापर देखील करतो. त्याच्या मराठी बोलण्यामुळे मिनाक्षी आणि काजलला देखील धीर येतो. त्या दोघी समोरच्या रुममध्ये येतात. संध्याकाळ होत होती. प्रसाद त्याला घेऊन जवळ असलेल्या उद्यानात जातो. अशोक आणि शरद सोबतच असतात. उद्यानात असलेल्या बाकावर चौघेही बसतात. वयस्कर मंडळी अधूनमधून त्यांच्याकडे पाहत असतात, त्यांचा चौघांवर काही परिणाम होत नाही.
प्रसाद, "खूप खूश असेल ना तो? त्याच्या आवडीचा जॉब होता तो."
स्टिफन, "तो तुमच्यासोबत असताना जास्त खूश होता, असं मला वाटतंय."
प्रसाद, "तिथे काही प्रॉब्लेम आहे का?"
स्टिफन, "मला तुमच्या ग्रुपबद्दल सांगा जरा."
प्रसाद, "मी, अजय आणि अभिजीत लहानपणापासून एकत्र...."
स्टिफन, "ते सर्व माहित आहे मला. सुवर्णा आल्यानंतर काय झालं?"
अशोक, "तुम्ही लोक खूपच अॅडव्हान्स असतात. चैकशी करायला आले आणि अर्धी माहिती तुम्ही स्वतः आम्हाला सांगितलीत."
प्रसाद, "सुवर्णाबद्दल काय माहित आहे तुम्हाला?"
स्टिफन, "तिची आणि अभिजीतची पहिली भेट तिचा त्या ऑफिसमधला शेवटचा दिवस होता. पुढे काय झालं ते मला माहित नाही."
प्रसाद, "सुरुवातीला आम्ही तिला ओळखू शकलो नाही. गौरीच्या घराजवळ राहायची म्हणून तिने सुवर्णाला नोकरीवर घेतलं होतं. सुवर्णाच्या घरची परिस्थिती बरी नव्हती. तिचे दोन्ही भाऊ गावी राहत होते. अधूनमधून ते मुंबईला सुध्दा यायचे. घरच्यांची ती लाडकी होती, पण ती अभिजीतसाठी योग्य नव्हती."
स्टिफन, "म्हणजे?"
प्रसाद, "गौरीचं अभिजीतवर आणि अभिजीतचं सुवर्णावर प्रेम होतं. गौरीने त्या दोघांच्या पहिल्याच भेटीत हे ओळखलं होतं. म्हणून तिने सुवर्णाला नोकरीवरुन काढलं. सुरुवातीला आम्हाला हे माहित नव्हतं. पण हळूहळू कळू लागलं, तो आमच्यापासून काही ना काही लपवू लागला होता. त्या वाईट मुलीमुळे अभिजीत आमच्यापासून लांब जात होता."
सहा वर्षांपूर्वी,
अभिजीत, "Come on Boyz… I wanna loud…"
स्टेजसमोर उभे सगळे प्रेक्षक मोठ्याने ओरडतात, "बदमाश... बदमाश... बदमाश..."
अभिजीत, "Guys… That’s for my Love… in Western Style…
तूच माझी प्रेयसी... तूच माझी प्रीत गं...
वेडा मी वेडा वेडा तुझ्याच मागे वेडा... हो तू...
वेडा मी वेडा वेडा तुझ्याच मागे वेडा...
अप्सराच तू गोरी अशी कशी तू....
जिथे जातो तिथे तिथे येते कशी तू....
तू जिथे तू... जिथे मी तिथे तू.... बोल...
काय करु मी...
मला हवी आहे तू... माझी झाली पाहिजे तू....
तुझ्या ओठांवरचं हसूऽऽऽ... तुझ्या ओठांवरचं हसू... करतं मला वेडा....
वेडा मी वेडा वेडा तुझ्याच मागे वेडा... बोला...
वेडा मी वेडा वेडा तुझ्याच मागे वेडा...
दिवसाढवळ्या दिसते तू माझ्या स्वप्नी येते तू...
तुझ्या माझ्या प्रेमाला गं पूर्ण करु शकते तू....
माझं तुझं तुझं माझं... तुझं माझं तुझं प्रेम...
अगं दुनिया तुझ्या मागे माझा विचार कर ना थोडा... वेडे...
वेडा मी वेडा वेडा तुझ्याच मागे वेडा...
जीव आहे तू माझं प्रेम आहे तू...
जीव काय प्रेम माझा श्वास आहे तू...
माझ्या श्वासामध्ये तू... तुझ्या श्वासामध्ये तू...
श्वासाश्वासामध्ये मी... माझ्या श्वासामध्ये तू...
घेऊन जाईन तुला वेडे... खूश ठेवेन तूला... कारण..."
प्रेक्षक, "वेडा तू वेडा वेडा तिच्यामागे वेडा..."
कार्यक्रम हाऊसफुल्ल असतो. पत्रकार परिषदेची तयारी सुरु असते. सगळे पत्रकार येऊन बसलेले असतात. अजय आणि शरद आतमधून धावत येतात.
प्रसाद, "काय झालं? चेहऱ्यावर बारा का वाजवलेत?"
अजय, "अभी आजसुध्दा न सांगता पळाला."
प्रसाद, "काय नाटकी सुरु झालीयेत याची, काहीच कळत नाही मला. सलग नऊ वेळा गेलाय तो असा न सांगता."
शरद, "त्याचं सोडा आता. या वेळी काय कारण द्यायचं?"
अजय, "आजारी आहे असं सांग."
प्रसाद, "नाही रे, ते कारण मागच्या वेळी सांगितलं होतं."
स्टिफन प्रसादला मध्येच अडवतो, "तो असा का वागत होता?"
प्रसाद, "खूप विचित्र वागू लागला होता तो. काहीही न मागणारा माणूस एकाएकी अचानक उपवास करु लागला की, समजावं की ह्याचाही उपेक्षेशी परिचय झालाच. काही कमावलं की नाही आठवत पण, काही गमावलं की आम्हाला हातावरच्या आणि कपाळावरच्या रेषा आठवतात. खापर फोडायला यांच्याहून चांगला पर्याय सापडणारच नाही. कारण त्या उलटून उत्तर देत नाही. प्रत्येक वेळी स्टेज शो झाल्यानंतर न सांगता निघून जायचा. कधी कधी येत सुध्दा नव्हता. शेवटी एक दिवस अजयने त्याचा पाठलाग केला. अभिजीत सुवर्णाला भेटायला गेला होता. आम्हा सर्वांपासून लपून तो तिला भेटू लागला होता. त्या दोघांना आम्ही काही बोललो नसतो, पण त्या मुलीचं कॅरेक्टर बरोबर नव्हतं. अभिजीतकडे पैसा होता, तो मोठा होऊ लागला होता. तिचा त्याच्या पैशावर डोळा होता. आम्ही त्याला खूप समजावलं, अजयने तर त्याला मारलं सुध्दा होतं. पण त्याच्यावर काही फरक पडला नाही. मग तिच्या घरी त्या दोघांबद्दल कळलं. तिचे आईवडिल तिला गावी घेऊन जात होते. तिने काही ऐकलं नाही आणि स्वतःची नस कापून घेतली. तिने जेवण वगैरे सगळं सोडलं होतं. डॉक्टरांना उपचार करू देत नव्हती. खूप अशक्त झाली होती ती. तो सगळ्यांना विरोध करुन तिला भेटायला गेला. ती शेवटचे श्वास घेत होती. तिचे आईवडिल त्याला खूप वाईट बोलत होते. त्याच्यामुळे तिचा मृत्यू झाला. नंतर कळलं तिला त्याच्याकडून दिवस गेले होते. पोलिस त्याला पकडायला गेले तेव्हा तो सात ते आठ बाटल्या बियर प्यायला होता. त्याने पोलिसांना सुध्दा मारहाण केली. त्याला आत टाकण्यात आलं. नंतर गौरीने त्याला सोडवलं. त्याच्या अशा वागण्यामुळे आमच्यापैकी कोणीही त्याच्याशी बोलत नव्हतं. फक्त गौरीच त्याच्याशी बोलत होती. त्याच्या अशा वागण्याचा परिणाम आमच्या पूर्ण ग्रुपवर झाला. वृषाली ग्रुप सोडून निघून गेली. अजय आणि नम्रताच्या लग्नाची धावपळ चालली होती. नम्रताच्या वडिलांनी त्याला एका अटीवर लग्नासाठी परवानगी दिली. त्याला ग्रुप सोडायला सांगितला. अभिजीतसारख्या मित्रांची संगत असेल तर त्यांच्या मुलीचंही असंच काहीतरी वाईट होईल असं त्यांचं म्हणणं होतं. असं करता करता आमच्या ग्रुपमधून एक एक करुन अभिजीत, गौरी, वृषाली, अजय निघून गेले. राहिलो फक्त मी, अशोक आणि शरद. एकदमच सगळं वाईट झालं होतं म्हणून आमच्या ऑर्डर्स बंद झाल्या. आमची ट्रस्ट सुध्दा बंद झाली. मी माझ्या स्वतःच्या हाताने त्या ऑफिसला टाळं लावलं. मी अजयला थांबवण्याचा प्रयत्न केला होता. पण त्याचंही काही आयुष्य होतं. मी त्याला थांबवू शकलो नाही. माझ्या आयुष्यात सुध्दा खूप काही वाईट झालं. माझं मूल मी...." प्रसाद एकदम गप्प होतो आणि दोन्ही हात तोंडावर घेऊन मान खाली घालून रडू लागतो.
स्टिफन, "Hey Buddy. Don’t cry. मी तुझं दुःख समजू शकतो. पण आतासुध्दा तुला त्या चौघांची आठवण येत नाही का?"
अशोक, "खूप आठवण येते. त्या चौघांना परत आणन्यासाठीच तर आम्ही तिघांनी खोटा स्टेज शो ठेवला होता. त्याचा उपयोग झालाच. अजय परत आला."
स्टिफन, "म्हणजे, अजय तुमच्यासोबतच आहे का?"
अशोक, "कालपर्यंत होता तो. नम्रता सुध्दा आलेली. दोघेही आमच्यासोबत व्यवस्थित बोलले. मागच्या गोष्टी सोडून जुन्या मैत्रीची सुरुवात आम्ही नव्याने केली."
स्टिफन, "मग आता तुमची काय इच्छा आहे? सगळ्यांनी सोबत यावं का?"
तिथे असलेल्या बदमाश ग्रुपच्या अंगात वेगळाच जोश येतो, लगेचच तिघेही एकसुरात म्हणतात, "हो."
स्टिफन, "वृषाली तुमच्यासोबत येणार नाही."
अशोक, "तुम्ही भेटलात का तिला?"
स्टिफन, "हो. पण तिची इच्छा नाहिये तुमच्यापैकी कुणालाही भेटण्याची. बहूतेक तिला मैत्रीची ती ओढ सतावत नाहीये जी तुम्हा सर्वांना आणि आमच्याकडे अभिजीतला सतावते."
शरद, "अभिजीतला आमची आठवण येते?"
स्टिफन, "हो. म्हणजे मला तरी असं वाटतं."
प्रसाद, "काजू किती खूश होईल ना हे ऐकूनं?" तो स्टिफनसमोर हात जोडतो, "सर, तुम्ही किती मोठे आहात हे आम्हाला माहित नाही. पण फक्त तुमच्यामुळे आमचे दोन मित्र आम्हाला परत भेटतील याच्या आशा वाढल्यात."
स्टिफन प्रसादचे जोडलेले हात पकडतो आणि त्या दोघांना पुन्हा भारतात आणण्याचं वचन देतो. त्या रात्री स्टिफन अनामिकासोबत बराच वेळ खेळतो. प्रसाद अजयला फोन करुन स्टिफन आणि अजयचं बोलणं घडवतो. मिनाक्षी आणि काजल स्टिफनसोबत फोटो काढतात. त्या रात्री कोणीही झोपत नाही. एका अर्थाने स्टिफन दोन रात्री भारतात राहिला होता आणि दोन्ही रात्री त्याने कुणालाही झोपू दिलं नव्हतं. पण त्याच्या चांगुलपणाने बदमाश ग्रुप पुन्हा एकदा जन्म घेत होता.
दुसऱ्या दिवशी स्टिफन ऑस्ट्रेलियाला रवाना होतो. त्याला विमानतळावर सोडण्यासाठी अर्धा बदमाश ग्रुप गेला होता. जाण्याअगोदर त्याने अजय आणि सागर यांच्यासोबत फोनवर ‘पुन्हा आलो तर नक्कीच भेटेन.’ असा निरोप दिला होता.
भारतात दोन दिवस राहून त्याने अनेक वेगवेगळ्या गोष्टी पाहिल्या, अनुभवल्या होत्या. मैत्रीसाठी करियर बदलणारा अभिजीत, मैत्रीसाठी जगणारे अशोक, शरद आणि प्रसाद, मैत्रीसाठी घर सोडायला तयार होणारा अजय, पतीवर जिवापाड प्रेम करणारी मिनाक्षी, खोडकळ पण संस्कारमय असलेली काजल, एक हॉटलमधला साधा हाऊसकिपर पण खरंच खूप जबाबदार व्यक्ती, तो ड्रायव्हर जो माझ्या प्रत्येक वळणावर बदलत जाणाऱ्या ठिकाणी कोणतीही तक्रार करत नव्हता, तर दुसरीकडे मैत्रीच्या चांगल्या नात्याची किंमत समजू न शकलेली वृषाली, पैसा मिळविण्यासाठी थोरपुरुषांचा भांडवल म्हणून वापर करणारा सागर, अनेक वेगवेगळ्या गोष्टी, भौगोलिक विविधता, जेवणाच्या पदार्थांमधील विविधता या सर्वांनी स्टिफन खूप भारावून गेला होता. विमान उडाल्यानंतर तो झोपतो ते ऑस्ट्रेलिया आल्यावरच उठतो.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.