अमावस्येला चंद्राचा प्रकाश नसल्याने अंधाराचे सामराज्य पसरते काळरात्र असा उल्लेख काव्यातून ही बघायला मिळतो नकारात्मकता ही कायम दर्शवली जाते ती या तिथीने अमावस्या...

उलट अर्थ घेतला तर शून्याची उर्जा अमावस्या म्हणूयात
सकारात्मकतेने पुन्हा नव्याने चंद्र आपली गतीमान अवस्था घेतो त्याचे ध्येय खरे तर तो साध्य करत असतो एक एक  दिवस सूर्याजवळ जाण्याचे ध्येय या दिवशी खरे सिद्धीस जाते सूर्याच्या सानिध्धयात तो राहतो मग ही त्याची सकारात्मकताच यशप्राप्तीची अशी ही अमावस्या ..

..चांगल्याकडून वाईटाकडे वाईटाकडून चांगल्या कडे असे न म्हणता केवळ यशाकडेच पोहचवणारी ही अमावस्या तिथी...फिनिक्स पक्षाप्रमाणे उडण्याची पुन्हा सुरुवात ..या अशा कोरोना काळात अशा शून्य उर्जेतून बाहेर पडण्यास सकारात्मकता देईल असाच विचार घेतला तर अर्थात हा माझा विचार हे सिद्ध करायाला काही पुरावा नाही .पण शेवटी बघण्यचा दृष्टिकोन च....आता इतर संदर्भ ही आहेतच शास्त्रीय आधार ऋग्वेदात याचा उल्लेख आढळत नाही पण पण सूर्यग्रहण अमावस्येलाच होते आणि अनेक ज्योतिर्विदांच्या मते ग्रहणाचा उल्लेख ऋग्वेदात आहे. वेदातील  सूक्तात  अत्री ऋषींनी याचा शोध घेतला असे वाचनात आहे. . यावरून अत्रीने सूर्यग्रहणाचे ज्योतिषशास्त्रदृष्ट्या स्पष्टीकरण केले,.तेव्हा  अमावस्या ज्ञात असावी.

सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत असलेल्या अमावास्येला सिनीवाली अमावास्या म्हणातात.  सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंतच्या काळात अंशत: चतुर्दशी व अंशत: अमावास्या असेल तर त्या अमावास्येला दर्श अमावास्या, आणि अंशतः अमावास्या व अंशत: प्रतिपदा असेल तर कुहू अमावास्या म्हणतात.

सूर्य चंद्र सानिध्य ती सूर्याचन्द्रमसोर्य: पर: सन्निकर्ष: सामावास्या'..,अमावस्या अमा सह वस राहणे

पंचागातील तिसावी तिथी अमावस्या...

ज्यादिवशी पृथ्वीवरून, चंद्राचा प्रकाशित भाग न दिसता अप्रकाशित भाग दिसतो,

अमावस्यावर चंद्र दिसत नाही, म्हणजे क्षय आणि उदय होत नाही, त्याला अमावस्या म्हणतात, मग त्याला 'कुहू अमावस्या' देखील म्हणतात. अमावस्या हा सूर्य आणि चंद्राच्या मिलन कालावधी आहे. या दिवशी दोघेही एकाच राशीमध्ये राहतात.


शुक्ल आणि कृष्ण पक्ष, पौर्णिमा आणि अमावस्या ही मालिका अनादी काळापासून चालू आहे आणि सूर्य आणि चंद्रासह आकाशातील सर्व त्यांच्या वेगवान गतिमानतेमुळे होते. जेथे सूर्य दर महिन्यात सर्व 12 राशींचा प्रवास करतो, म्हणजेच संपूर्ण राशी, म्हणजेच, संपूर्ण 360-डिग्री  आणि त्याच वेळी, दीड ते दोन दिवसांच्या प्रमाणात एक महिन्यात सर्वात वेगवान चंद्र  फिरतो.  संपूर्ण राशीचा प्रवास करताना, चंद्र प्रत्येक महिन्यात अमावास्येला सूर्यापेक्षा 12 पट हळू असलेल्या सूर्याला मागे टाकून जास्तीत जास्त अंतरावर पोहोचतो आणि त्यानंतर त्याच्याकडे जाण्यास सुरुवात करतो. ग्रह नक्षत्रांच्या या खेळास वैदिक संस्कृतीत ज्योतिष असे म्हणतात, तर आधुनिक विज्ञान त्याला खगोलशास्त्र म्हणतात.

अमावस्या महिन्यातून एकदाच येते. याचा अर्थ असा की वर्षामध्ये 12 अमावस्या आहेत. शास्त्रात, पितृदेव अमावस्या तिथीचे स्वामी आहेत

सोमवारी येणाऱ्या अमावास्येला सोमवती अमावास्या म्हणतात.
शनिवारी येणाऱ्या अमावास्येला शनिश्चरी अमावास्या म्हणतात.
भावुका अमावास्या वैशाखात असते. त्यादिवशी शनी जयंती असते.

मुख्य अमावस्या म्हणजे सोमवती अमावस्या, भौमावती अमावस्या, मौनी अमावस्या, शनि अमावस्या, हरियाली अमावस्या, जी श्रावण महिन्यात येते दिवाळी अमावस्या, सर्वप्रतिमा अमावस्या इ.

सोमवती अमावस्या- सोमवारी पडणार्‍या अमावस्यास सोमवती अमावस्या म्हणतात. या दिवशी उपवास केल्याने चंद्राचा दोष दूर होतो.

भौमवती अमावस्या - भौम म्हणजे मंगळ. मंगळवारी पडणाऱ्या या अमावस्याला भौमवती अमावस्या म्हणतात.

मौनी अमावस्या- हा अमावस्या पौष हिंदू महिन्यात येते हा एक आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचा दिवस मानला जातो.

 शनि अमावस्या - शनि अमावस्या शनिवारी पाळला जातो. या दिवशी उपवास केल्याने शनीचे दोष दूर होतात

महालय अमावस्या- महालय अमावस्या यांना पितृक्षेचा सर्व पितामह पूर्वज अमावस्या असेही म्हणतात. या दिवशी धान्य आणि तर्पण इत्यादी दानांनी पूर्वजांना प्रसन्न केले जाते.भाद्रपद महिन्यात येते

 हरियाली अमावस्या -. तेलंगण आणि आंध्र प्रदेशातील चुकला आणि ओरिसामधील चितलगी यांना अमावस्या म्हणतात. या दिवशी रोपे लावणे महत्वाचे आहे.आपल्या कडे श्रावण महिन्यातील येणाऱ्या अमावस्येला पिठोरी अमावस्या म्हणतात याच दिवशी मातृदिन साजरा केला जातो तर त्याआधी आषाढ महिन्यात येणारी दिव्यांची अमावस्या दीपपूजन केले जाते.

दिवाळी अमावस्या लक्ष्मीपूजन - कार्तिक महिन्यातील अमावस्या दिवसाला दिवाळी अमावस्या म्हणतात. या अमावास्येला  दीपोत्सव साजरा केला जातो. असे म्हणतात की या दिवशी रात्री सर्वात जाड असते.  या दिवशी लक्ष्मीपूजनाचे महत्त्व  या दिवशी  देवींचा जन्म झाला होता.

कुशाग्रानी अमावस्या- कुशगणी अमावस्या असे म्हटले जाते कारण कुश गोळा केल्यामुळेच. पौराणिक ग्रंथांमध्ये याला कुशोत्पतिनी अमावस्या असेही म्हणतात. भाद्रपद हा भगवान श्रीकृष्णाच्या पूजेचा महिना आहे. या दिवसाला पिथोरा अमावस्या असेही म्हणतात. पिथौरा अमावस्येवर देवी दुर्गाची पूजा केली जाते.

सर्वपित्री अमावास्या भाद्रपदात येते.

मार्गशीर्ष अमावास्येला वेळा अमावस्या  हे नाव आहे.
मौनी अमावास्या पौषात येते.

उर्वरित अमावस्या दान व स्नानाला महत्त्व देतात.

अमावस्या आणि समुद्र लाटा यांचे ही नाते आहेच

नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे जायाला शिकवणारी शून्याची ही ऊर्जा पुन्हा नव्याने अपयश हे यशाची पायरीच असा दृष्टिकोन देणारी अमावस्या सूर्य चंद्राचे मिलन अनेक रोगांवरील औषोधोपचारासाठी संजीवनी सकारात्मकताच देते असा विचार तिथीचा सन्मान अमावस्या....शून्याची ऊर्जा .शरीरातील आँक्सिजनची पातळी ही कमी जास्त होणे हे विचारांवरच वाढते वा कमी होते असा विचार घेतला तर शून्याची ही ऊर्जा सकारात्मकता देते अशा अमावस्येकडून ही शिकता येतेच कि...ध्येय गाठता येते.!!!

©मधुरा धायगुडे

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel