शब्दात थोडा बदल फरक न म्हणता भेद म्हणणे योग्यच
कारण
धर्मिक व अध्यात्मिक या नाण्याच्या दोन बाजू आहेत असे माझे मत तेच मी मांडण्याचा केलेला प्रयत्न
धार्मिक म्हणजे धर्माचे पालन करणारा.तर अध्यात्मिकतेत अध्यात्म म्हणजे स्वतःला, स्वतःच्या खऱ्या स्वरूपाला जाणणे होय.आंतरिक विकास जो भावना मन बुद्धी श्रद्धा या चतुसुत्रीवर आधारित ...
भगवत गीतेप्रमाणे आपल्या कर्तव्याचे पालन करणे म्हणजे धर्म.
मात्र सर्वसामान्य सामान्य धार्मिक या शब्दाचा अर्थ असा की देवाची पूजा करणारा, व्रत, उपवास वगैरे करणारा असा होतो.
उदाहरणार्थ श्रीकृष्ण अर्जुनाला आपली कर्तव्ये पार पाडायला सांगतो व यालाच स्वयंम श्रीकृष्णाने धर्म म्हटले आहे. ज्याने अध्यात्माने स्वतःला जाणले त्यासाठी आता त्याची कर्म म्हणजे त्याचे कर्तव्य निष्काम भावनेने करणे धार्मिक असणं तो अध्यात्माचाच भाग आहे
म्हणून धार्मिक व आध्यात्मिक हा फरक नसून भेद मानला तर एकाच नाण्याच्या दोन बाजूच हे विधान मनात आले.
अजून सांगता येईल कि बघा हं ...
सण उत्सव या रुढी -पिढीनुसार पुढे -पुढे आपला वारसा जोपासत जातात पण काही परिस्थितीत ते अशक्य आसेल तर हा विचारही स्वागतार्हच असावा
धार्मिक व अध्यात्मिक म्हणताना
• सणावारांस परंपरांचा मान राखून त्यांस तुम्ही पाळत असाल तर तुम्ही धार्मिक आहात व त्यांच्या हेतुपुर्वक अंतःकरणातून त्यांस जोपासत असाल तर तुम्ही आध्यात्मिक आहात.वटपौर्णिमा उदाहरण देता येईल..सहृज उपलब्ध वटवृक्षाचे पूजन नमस्कार करत ती परंपरा जोपासली जाते कारण भावना ही अध्यात्मवादीकृतीच म्हणता येईल.
• जर तुम्ही तुमचे सुख इतरांत शोधत असाल तर तुम्ही धार्मिक आहात व जर तुम्ही तुमचे सुख इतरांत पाहत असाल तर तुम्ही आध्यात्मिक आहात.
*धर्मकार्य व धर्मग्रंथ यांवर अतिश्रद्ध असाल तर तुम्ही धार्मिक आहात व त्यांची कालयोग्यता जाणून मनन करत असाल तर तुम्ही आध्यात्मिक आहात.
*विज्ञानाने नाकारलेला धार्मिक संदेश जर तुम्हाला क्वचितप्रसंगी द्वेषकारक दुःख देत असेल तर तुम्ही धार्मिक आहात व जर त्या वैज्ञानिकतेचे स्वागत करून वैज्ञानिक श्रद्धेस वंदन करत असाल तर तुम्ही आध्यात्मिक आहात.
उदाहरणार्थ ....कोरोना लस जी सध्या गरजेची हे संशोधन वैज्ञानिक असले तरी श्रद्धा मानून ते आपण गरज म्हणून ही स्वीकारले विज्ञानाचे स्वागत केले म्हणून आपण अध्यात्मवादीच.
* संतसाहित्याचे चिंतन, मननाव्यतिरिक्त भजन, पुजन, किर्तन करत असाल तर तुम्ही धार्मिक आहात व जप, तप, अनुष्ठानास वेळेनुसार ठेवत असाल पणा आंतरिक भाव प्रामाण्य मानत असाल तर तुम्ही आध्यात्मिक आहात.
उदाहरणार्थ नामस्मरण आणि नामजपाचे विचारात घेतले तर नामजप करावा लागतो ही धार्मिकता तर नामस्मरण होत राहतं नकळत ही आध्यात्मिकता ...नामजाप ही कृती आहे तर नामस्मरण ही स्थिती धार्मिक असणं हा कृतीपुरस्कृत भाग तर त्यानुसार आचरण होत राहणं म्हणजे अध्यात्मिक असणं असंही म्हणता येईल
माझ्या मनात आलेले मी सांगितलेले सहजच मांडले हे माझे मत ... अर्थात व्यक्ती सापेक्षता आदरच
श्रावणोत्सवाच्या शुभेच्छा!!
©मधुरा धायगुडे