३१.निरभ्र आकाशाचे हे स्वप्न अपराधी माणसाने पाहिल्यास- त्या अप्रध्याची भीतीपासून मुक्तता होईल.
३२.स्वप्नात आकाशातून नक्षत्रे पडत आहेत असे पाहिल्यास- हे पाहणाऱ्सायाठी मृत्युकारक ठरू शकते.
३३.स्वप्नात तारे आपल्या राहत्या घरावर पडले असे पाहिल्यास- आपल्याला रोग उत्पन्न होतो किंवा घर सोडावे लागू शकते.
३४.आपण पूर्वेला इंद्रधनुष्य पाहिल्यास- सधन व्यक्तीला वाईट दिवस येतील आणि निर्धन व्यक्तीला चांगले दिवस येतील.
३५.स्वप्नात आपण पश्चिमेला इंद्रधनुष्य पाहिल्यास- सधन व्यक्तींना चांगले दिवस येतील व निर्धनांना वाईट दिवस येतील.
३६.स्वप्नात आपण आकाशात उडतो आहोत असे पाहिल्यास- आपले कार्यसिद्धीला जाईल.
३७.आकाशात विजांचा कडकडाट पाहिल्यास- नेहमीच चांगले होते.
३८.स्वप्नात विजेच्या पडण्याने कुणाला अपय झालेला पाहिल्यास- आपल्यासाठी किंवा ज्या मनुष्याला आपण स्वप्नात पहिले आहे त्या मनुष्यासाठी वाईट, विपत्तिकाल प्राप्त होईल.
३९.स्वप्नामध्ये आपल्यावर वीज पडताना आपण बाजूला सरकून ती चुकवल्याचे दिसल्यास- आपल्यावरचा विपत्तिकाल निघून जाईल आणि आनंद प्राप्त होईल.
४०.स्वप्नामध्ये वीज आपल्या जवळच पडली आहे असे दिसल्यास- जे कुणी पाहते त्याला परदेशगमन प्राप्त होईल आणि सौख्य होईल.
४१.आकाशात ढग आके असून विज अचानक चमकली असे पाहिल्यास- स्वप्न पाहणाऱ्यास चांगले. हेच व्यापारी, शेतकरी आणि नोकरदार लोकांनी पाहिल्यास त्यांना त्यांच्या कामात लाभ होईल. पाहणाऱ्याला तंट्यात यश मिळेल. इतर कुणी पाहिल्यास आपल्या नातेवाईकांकडून काहीतरी लाभ होईल असे समजावे.