घराघरात प्रत्येक मुलांना यायलाच हवे असे वाणी शुद्ध करणारे बुद्धी स्थिर मनाची एकाग्रता वाढवणारे हे गणपती अथर्वशीर्ष अर्थासहित मांडण्याचा प्रयत्न 

श्री गणेश अथर्वशीर्ष चा उल्लेख अथर्ववेदात मिळतो हे एक उपनिषद आहे .यात गणेशाची स्तुती वर्णन केली आहे .गणपती अथर्वशीर्ष सर्वपरिचितच दिवसाची सुरुवात अशा गणेश स्तुतीने प्रत्येक घरातच होत आसते.मग अथर्वशीर्ष म्हणजे ...

अथर्व म्हणजे शांती आणि शीर्ष म्हणजे मस्तक. ज्याच्या पुरश्चरणाने मस्तकास शांती प्राप्त होते ते अथर्वशीर्ष होय. भगवान जैमिनीऋषींचे सामवेदीय शाखेतील शिष्य मुद्गलऋषी यांनी साममुद्गल गणेशसूक्त लिहिले. त्यानंतर त्यांचे शिष्य गणकऋषी यांनी श्री गणपति अथर्वशीर्ष लिहिले.

अथर्वशीर्षात स्तुती प्रथम तर ध्यान नंतर आहे हे या स्त्राचे एक वैशिष्ट्य कारण बहुतेक अंशी ध्यान आधी व स्तुती नंतर असा प्रघात असतो.

अथर्वशीर्षाचे तीन प्रमुख भाग

१. शांतीमंत्र

सुरुवातीला ॐ भद्रं कर्णेभिः आणि स्वस्तिनः इंद्रा….. हे मंत्र आणि शेवटी सह नाववतु ।…… हे मंत्र

२. ध्यानविधी

ॐ नमस्ते गणपतये येथपासून ते वरदमूर्तये नमः येथपर्यंतचे दहा मंत्र

३. फलश्रुती

एतदथर्वशीर्ष योऽधीते इत्यादी चार मंत्र

 फलश्रुतीमधे आत्मज्ञानसंपन्न ऋषीमुनींना हे वाङ्मय परावाणीतून स्फुरत असल्याने आणि फलश्रुतीमागे त्यांचा संकल्प असल्याने, स्तोत्र पठण करणार्याला फळ फलश्रुतीमुळे मिळते.असे म्हणतात.यामुळे 

 स्तोत्र पठण करणार्याच्या भोवती संरक्षक कवच निर्माण होते.म्हणून अथर्वशीर्षाच्या पठणाने वाईट शक्तीच्या त्रासापासून रक्षण होते.फलश्रुतीशिवाय ते पूर्ण होत नाही 

१ शांतीमंत्र

ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः ।

भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः ।

स्थिरैरङ्गैस्तुष्टुवागँसस्तनूभिः ।

व्यशेम देवहितं यदायूः ।

स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः ।

स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः ।

स्वस्ति नस्ताक्षर्यो अरिष्टनेमिः ।

स्वस्ति नो वृहस्पतिर्दधातु ॥

ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः 


२ ध्यान

ॐ नमस्ते गणपतये। 

त्वमेव प्रत्यक्षं तत्वमसि 

त्वमेव केवलं कर्ताऽसि 

त्वमेव केवलं धर्ताऽसि

त्वमेव केवलं हर्ताऽसि 

त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि 

त्व साक्षादात्माऽसि नित्यम्।।1।। 

(बा, तूचि धर्ताहि केवल। तूचि केवल संहर्ता, तूचि ब्रह्महि सर्वहे। तू साक्षात् नित्य तो आत्मा॥१॥)

ऋतं वच्मि। सत्यं वच्मि।।2।। 

(ऋत मी सत्य मी वदे ॥२॥)

अव त्व मां। अव वक्तारं। 

अव श्रोतारं। अव दातारं। 

अव धातारं। अवानूचानमव शिष्यं। 

अव पश्चातात। अव पुरस्तात।

अवोत्तरात्तात। अव दक्षिणात्तात्। 

अवचोर्ध्वात्तात्।। अवाधरात्तात्।।

सर्वतो माँ पाहि-पाहि समंतात्।।3।। 

(करी रक्षण तू माझे, वक्त्या-श्रोत्यांस रक्ष तू। दात्या-घेत्यांस तू रक्ष, गुरु - शिष्यांस रक्ष तू। मागुनी पुढुनी डाव्या, उजव्या बाजूने पण वरुनी खालुनी माझे, सर्वथा कर रक्षण॥३॥)

त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मय:। 

त्वमानंदमसयस्त्वं ब्रह्ममय:। 

त्वं सच्चिदानंदाद्वितीयोऽषि। 

त्वं प्रत्यक्षं ब्रह्माषि। 

त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽषि।।4।। 

(जसा वाङ्मय आहेस, तू चिन्मयहि बा तसा। जसा आनन्दमय तू, तू ब्रह्ममयही तसा। देवा तू सच्चिदानन्द, अद्वितीयहि तू तसा। प्रत्यक्ष ब्रह्म तू, ज्ञान-विज्ञान-मयही तसा ॥४॥)

सर्वं जगदिदं त्वत्तो जायते। 

सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति। 

सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति। 

सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति। 

त्वं भूमिरापोऽनलोऽनिलो नभ:। 

त्वं चत्वारिकाकूपदानि।।5।। 

(सर्व हे जग उत्पन्न, तुझ्यापासुनि होतसे। त्याची स्थिती तुझ्यायोगे, विलयेल तुझ्यात ते। भासते ते तुझ्या ठायी, तू भूमि जल अग्नि तू। तूचि वायु नि आकाश, वाणी स्थाने ही चार तू ॥५॥)

त्वं गुणत्रयातीत: त्वमवस्थात्रयातीत:। 

त्वं देहत्रयातीत:। त्वं कालत्रयातीत:। 

त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं। 

त्वं शक्तित्रयात्मक:। 

त्वां योगिनो ध्यायंति नित्यं।

त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं 

रूद्रस्त्वं इंद्रस्त्वं अग्निस्त्वं 

वायुस्त्वं सूर्यस्त्वं चंद्रमास्त्वं 

ब्रह्मभूर्भुव:स्वरोम्।।6।। 

(तू जसा त्रिगुणां-पार, त्रिदेहांच्याहि पार तू। तू अवस्था-त्रयां-पार, त्रिकालांच्याहि पार तू। तू मूलधार चक्रात, देहाच्या नित्य राहसी। इच्छा-ज्ञान-क्रिया रूपी, शक्ती त्या तूचि तीनही। ध्याती नित्य तुला योगी, तू ब्रह्मा तूचि विष्णुही। तू रुद्र, इंद्र, तू अग्नी, तू वायू, सूर्य ,चन्द्रही तू ब्रह्म, तूचि भू, तूची अन्तरिक्ष, नि स्वर्गही। तूचि ॐ कार हे बीज, वर्णिती ज्यास वेदही॥ ६॥)

गणादि पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनंतरं। 

अनुस्वार: परतर:। अर्धेन्दुलसितं। 

तारेण ऋद्धं। एतत्तव मनुस्वरूपं। 

गकार: पूर्वरूपं। अकारो मध्यमरूपं। 

अनुस्वारश्चान्त्यरूपं। बिन्दुरूत्तररूपं। 

नाद: संधानं। सँ हितासंधि: 

सैषा गणेश विद्या। गणकऋषि:

निचृद्गायत्रीच्छंद:। गणपतिर्देवता। 

ॐ गं गणपतये नम:।।7।। 

(आधी ‘ग’ कार उच्चार, ‘अ’ कार तदनन्तर। त्यानंतर अनुस्वार, अर्धचन्द्रे सुशोभित। ॐ कार-युक्त हे बीज, मन्त्ररूपचि हे तव । ‘ग’ कार रूप हे पूर्व, असे मध्यम रूप ‘अ’। अन्त्य रूप अनुस्वार, बिन्दू उत्तर रूपसा। नाद सांधतसे यांना, सन्धीचे नाम संहिता। गणेश विद्या ती हीच, आहे गणक हा ऋषी। छन्द हा निचृद्-गायत्री, देवता श्रीगणेश ही । ॐ गं रूपी गणेशाला, नमस्कार सदा असो ॥७॥)

एकदंताय विद्महे। 

वक्रतुण्डाय धीमहि। 

तन्नो दंती प्रचोदयात।।8।। 

(एकदन्तास त्या आम्ही, देवाधीशास जाणतो। आणि त्या वक्रतुण्डाते, आम्ही ध्याने उपासतो। त्यासाठी सर्वदा आम्हा, तो दन्ती प्रेरणा करो ॥ ८॥)

एकदंतं चतुर्हस्तं पाशमंकुशधारिणम्। 

रदं च वरदं हस्तैर्विभ्राणं मूषकध्वजम्। 

रक्तं लंबोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससम्।

रक्तगंधाऽनुलिप्तांगं रक्तपुष्पै: सुपुजितम्।। 

भक्तानुकंपिनं देवं जगत्कारणमच्युतम्। 

आविर्भूतं च सृष्टयादौ प्रकृते पुरुषात्परम्।

एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वर:।।9।। 

(एकदन्ता चतुर्हस्ता, पाश - अंकुश धारका । द्न्त नी वरदा मुद्रा, धारका मूषक - ध्वजा। लम्बोदरा रक्तवर्णा , शूर्प-कर्णा गजानना । रक्त - वस्त्रा विघ्न-हर्त्या, गिरिजानन्दन-वर्धना। रक्त-चन्दन-लिप्तांगा, रक्त-पुष्पा-सुपूजिता । भक्तावरी दया कर्त्या ,अच्युता जग-कारणा। सृष्टिपूर्वी प्रकटल्या, प्रकृती पुरूषा परा । या ध्यातो नित्य तो योगी, योग्यांमध्ये वरिष्ठसा ॥ ९॥)

नमो व्रातपतये। नमो गणपतये। 

नम: प्रमथपतये। 

नमस्तेऽस्तु लंबोदरायैकदंताय। 

विघ्ननाशिने शिवसुताय।

 श्रीवरदमूर्तये नमो नम:।।10।। 

(वन्दन व्रातपतिला, गणाधेशास वन्दन । वन्दन प्रमथेशाला, एकदन्तास वन्दन। लम्बोदरा शिवसुता, विघ्नहर्त्यास वन्दन। वांछिला वर देणाऱ्या अय, तव मूर्तिस वन्दन ॥१०॥)

३ फलश्रुती

एतदथर्वशीर्ष योऽधीते। 

स ब्रह्मभूयाय कल्पते। 

स सर्व विघ्नैर्नबाध्यते। 

स सर्वत: सुखमेधते। 

स पञ्चमहापापात्प्रमुच्यते।।11।। 

सायमधीयानो दिवसकृतं पापं नाशयति। 

प्रातरधीयानो रात्रिकृतं पापं नाशयति। 

सायंप्रात: प्रयुंजानोऽपापो भवति। 

सर्वत्राधीयानोऽपविघ्नो भवति। 

धर्मार्थकाममोक्षं च विंदति।।12।। 

इदमथर्वशीर्षमशिष्याय न देयम्। 

यो यदि मोहाद्दास्यति स पापीयान् भवति। 

सहस्रावर्तनात् यं यं काममधीते तं तमनेन साधयेत्।13।। 

अनेन गणपतिमभिषिंचति 

स वाग्मी भवति 

चतुर्थ्यामनश्र्नन जपति 

स विद्यावान भवति। 

इत्यथर्वणवाक्यं। 

ब्रह्माद्यावरणं विद्यात् 

न बिभेति कदाचनेति।।14।। 

यो दूर्वांकुरैंर्यजति 

स वैश्रवणोपमो भवति। 

यो लाजैर्यजति स यशोवान भवति 

स मेधावान भवति। 

यो मोदकसहस्रेण यजति 

स वाञ्छित फलमवाप्रोति। 

य: साज्यसमिद्भिर्यजति 

स सर्वं लभते स सर्वं लभते।।15।। 

अष्टौ ब्राह्मणान् सम्यग्ग्राहयित्वा 

सूर्यवर्चस्वी भवति। 

सूर्यग्रहे महानद्यां प्रतिमासंनिधौ 

वा जप्त्वा सिद्धमंत्रों भवति। 

महाविघ्नात्प्रमुच्यते। 

महादोषात्प्रमुच्यते। 

महापापात् प्रमुच्यते। 

स सर्वविद्भवति से सर्वविद्भवति। 

य एवं वेद इत्युपनिषद्।।16।।

आज घरोघरी मुलांना परवाचा म्हणून घेणे यात या अथ्रवशीर्षाची संथा देणे गरजेचे  गणपतीच्या मूर्तीकडे किंवा ॐ कडे पाहून म्हणावयास शिकवावे यामुळे मुलांमधे  एकाग्रता होते.गणेश बुद्धी ची देवता पूजनात अग्रमानांकन असलेली देवता आपले पाल्य असेच स्थिर हुशार बुद्धी चे व्हावे यासाठी गणपती अथर्वशीर्ष आजच्या पिढीला मग तो कोणत्याही माध्यमाचा बोर्डाचा पाल्य असू देत ही एक  सवय लावून घ्यायला हवीच. एक सुरुवात आत्मविश्वास वाढीसाठी प्रगतीसाठी हे गणपती अथर्वशीर्ष...

गणपती अथर्वशीर्ष  सुफळ संपूर्ण

माहिती असलेल्या गोष्टी  माहिती मांडण्याचा केवळ प्रयत्न ..!!

©मधुरा धायगुडे

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel