केदारेश्वर मंदिर हे महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील धर्मापुरी गावाजवळ असलेले मध्ययुगीन शिवमंदिर आहे. याचे स्थापत्य चालुक्य शैलीत केले आहे.
मराठवाडा परिसर प्राचीन शिल्प स्थापत्य अवशेषांनी समृध्द आहे. प्राचीन ऐतिहासिक पुराव्यांचा विचार करत असताना मराठवाड्याला वगळून चालतच नाही. आजही अशा अनेक ऐतिहासिक खाणाखुणा जागोजागी सर्व मराठवाडाभर उभ्या आहेत. सातवाहनांपासून यादव काळापर्यंत येथे अनेक शिल्पस्थापत्य रचना उदयास आल्या.
मराठवाड्यावर सर्वप्रथम राज्य सातवाहनांनी केले.प्रतिष्ठाननगरी ही त्यांची राजधानी होती. वेरुळच्या कातळातून अखंड काव्य निर्माण करणारा सर्वश्रेष्ठ कलाकार कोकस हा या प्रतिष्ठानचाच. तर या प्रतिष्ठानवर इ.स.पूर्व २३५ पासून ते इ.स. २२५ असे सुमारे साडेचारशे वर्ष सातवाहनोनी राज्य केले. त्यानंतर या मराठवाड्यात इ.स. २२५ ते ५५० असे सुमारे तीनशे वर्ष वाकाटकांनी राज्य केले. त्यानंतर इथे बदामीच्या चालुक्यांची सत्ता निर्माण झाली. ती सुमारे दोनशे वर्ष म्हणजे इ.स. ५५० ते ७५० अशी टिकली. ह्युएन-त्सांग याच काळात मराठवाड्यात आला होता. त्यानंतर इथे राष्ट्रकुटांची सत्ता निर्माण झाली. राष्ट्रकुटांच्या प्रभावी राजवटीनंतर इथे आले कल्याणीचे चालुक्य कल्याणी. हे सरधारणत: १० वे ११ वे शतक नंतर इथे अल्पकाळ सत्ता टिकली ती कलचुरींची.
सर्व राजवंशात सातवाहनांपासून ते यादवांपर्यंत मराठवाड्यात धार्मिक,सामाजिक,सांस्कृतिक असंख्य घडामोडी घडल्या. प्राचीन कलावैभवाची साक्ष देणारी अनेक देवालये व गुहाशिल्पे निर्माण झाली. या सर्व देवालयात धर्मापुरीचे केदारेश्वर देवालय वास्तुशिल्पाचा उत्कृष्ट नमुना आहे.काळाच्या ओघात मूळ मंदिराचा जवळजवळ निम्माच भाग आज कसाबसा तग धरुन उभा आहे.
चालुक्य राजवटीतील विक्रमादित्य सहावा याचा पुत्र सोमेश्वर तृतीय याने धर्मापुरी नगरी निर्माण केली. या राजाला साहित्याची आवड होती. त्याने 'अभिलषितार्थ चिंतामणी' (राजमानसोल्लास) या ग्रंथाची निर्मिती केली होती. या धर्मापुरीत सर्व सोयी होत्या. भव्य राजप्रासाद,नृत्यशाळा,तलाव,मनोहारी उद्याने,सुंदर वनराइ,उत्तुंग देवालये आणि भव्य बाजारपेठ यांनी ही नगरी सजलेली व गजबजलेली होती.
धर्मापुरीत आजपावेतो तीन कानडी आणि एक नागरी शिलालेख उपलब्ध आहे. नागरी शिलालेखाचे वाचन पुरातत्व खात्याच्या वतीने डॉ.वि.भी.कोलते यांनी केले.हा शिलालेख संस्कृत भाषेत कोरलेला असून लेखनाचा काळ 'शके संवत १०५६ आनंदसंवत्सांतर्गत आषाढ वदी १५ सोमे' हा दिलेला आहे. इसवीसनाप्रमाणे त्यादिवशी तारीख होती २३ जुलै ११३४ वार सोमवार.
हे मंदीर गावापासून सुमारे १ कि.मी. अंतरावर असून ही पूर्ण वास्तू ५७×४८ फूट लांबी रुंदीची असून महीमंडप अत्यंत विस्तीर्ण आणि भव्य आहे. या मंडपातील १६ खांब अत्यंत कल्पकतेने उभारलेले आहेत. महामंडपातील ९×९×६ च्या चौथर्यावरील एक रंगशिळा मन वेधून घेते. त्याच्या चारही कोपर्यांवर चार प्रचंड शिल्पांकीत खांब आहेत. रंगशिळेच्या छतावरही कीर्तीमुख,सप्तमातृका,वराह इत्यादिंची मोहक शिल्पकारीता आहे. रंगशिळेवरील छताच्या मध्यभागी पूर्ण विकसित कमळ आहे. या छताचा इंचन इंच भाग भौमितिक आकृत्या व लतापल्लवींच्या गुंफणीने शिल्पित केलेला आहे.
मुखमंडप,महामंडप,अंतराळ व गर्भगृह हे या देवालयाचे प्रमुख भाग आहेत. देवालयाच्या अर्धभिंतीवर गजथर व नरथराची रचना आढळते. गर्भगृहाच्या द्वारपट्टीकेवर पाच शिल्पपट्टीका वेगवेगळ्या भौमितिक आकारांनी शिल्पित केलेल्या आहेत. उंबरठ्यावर विशाल किर्तीमुख आहे. गर्भगृह १०×१० चे असून विशिष्ट पध्दतीच्या भौमितीक आकृतीच्या आधारे गर्भगृहाचे सपाट छत उभारलेले आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.