‘‘अठराव्या शतकात जेम्स कुक या इंग्रज समन्वेषकाने समुद्रपर्यटनात क्रांतिकारक बदल घडवून आणले... पहिल्या प्रवासात त्याने न्यूझीलंडला वळसा घातला व स्ट्रेलियाच्या पूर्व किना-याची माहिती मिळविली... दुस-या पृथ्वी प्रदक्षिणेचा त्याचा मार्ग ६० अक्षांशाच्या जवळचा होता... दक्षिण धृववृत्तापलीकडे जाणारा तो पहिला प्रवासी होता. त्याने वैज्ञानिक ज्ञान संपादनासाठी मोहीमा काढून दक्षिण पॅसिफिकचे अचूक चार्ट तयार केले, उत्तर अमेरिकेच्या वायव्य किना-याचे तपशीलवार निरीक्षण केले व पॅसिफिकमधील अनेक बेटे नकाशावर प्रथम दर्शविली

 

जेम्स क्लार्क रॉस या स्कॉटिश धृवसमन्वेषकाने आर्क्टिक व अंटार्क्टिककडील मोहिमांत भाग घेतला... तो चार हिवाळे आर्क्टिक प्रदेशात होता व परतताना त्याने तेथील व सागरतळावरील अनेक जीवांचे नमुने आणले... त्याने पृथ्वीच्या चुबंकीय उत्तर धृवाचे स्थान निश्चित केले... दक्षिण धृवाची माहिती मिळविण्यासाठी ब्रिटिश सरकारने रॉसलाएरेबसटेररया जहाजांतून दक्षिणेकडील मोहिमेवर पाठविले, त्यामुळे अंटार्क्टिका खंडाचीही सर्वांना माहिती झाली... त्याचे व्हॉयिज ऑफ डिस्कव्हरी हे पुस्तक महत्वाचे आहे. रॉस समुद्र, रॉस बेट व अंटार्क्टिकातील काही भाग यांची नावे त्याच्यावरुन पडली आहेत... याशिवाय सर जॉन फ्रँल्किन या इंग्रज समन्वेषकाने आर्क्टिक भागात समन्वेषण केलेय तर विल्यम व विल्यम्स स्कोर्झबी या पितापुत्रांनी ग्रीनलंड समुद्राच्या किनारी भागाचे समन्वेषण केले. यांपैकी मुलाने धृवीय समुद्रात अधिक खोलीवरील पाण्याचे तापमान पृष्ठभागावरील पाण्याच्या तापमानापेक्षा अधिक असल्याचे प्रतिपादिले होते

 

एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापासून महासागराचा समग्र अभ्यास होऊ लागला... मॅथ्यू फाँटेन मॉरीने महासागर विज्ञानाच्या संशोधनात मोलाची भर घातली... समुद्राचे पाणी व वारे यांच्यात नित्य परस्परक्रिया चालू असते व त्यामुळे महासागरात कायम अभिसरण चालू असते, असे अनुमान त्याने केले... या संकल्पनेचे महत्त्व एक्मनने १९०५ साली विशद केले... अजुनही ही संकल्पना महत्वाची मानली जाते... वारे व सागरी प्रवाह यांच्यामधील परस्परक्रिया जाणून घेऊन मॉरीने अटलांटिक, पॅसिफिक व हिंदी महासागरांमधील वारे व प्रवाह यांचे चार्ट तयार केले. त्याने लिहिलेले द फिजिकल जिऑग्राफी ऑफ द सी हे आधुनिक महासागरविज्ञानाचे पहिले पाठ्यपुस्तक मानले जाते... त्याने उत्तर अमेरिका व युरोप यांच्यामधील अटलांटिकच्या तळाचेही चार्ट तयार केले... संदेशवहनासाठी सागरतळावरुन केबल टाकता येणे शक्य असल्याचे त्याने दाखवून दिले... त्यातूनच महासागरविज्ञानाच्या अध्ययनात आंतरराष्ट्रीय पातळीवर सहकार्य होण्यास सुरुवात झाली... एडवर्ड फॉर्ब्झने सागरातील जीवांची वाटणी, तसेच सागरी जीव व त्याचे पर्यावरण यांच्यातील परस्परसंबंध यांविषयी संशोधन केले... यामुळे सागरी जीवविज्ञानाला नवीन दिशा मिळाली व सागरी  परिस्थितिविज्ञानाचा पाया घातला गेला... योहान यॉर्ट, झां लुइ आगास्सिझव ए. एच. चार्ल्स यांनी खाजगी यॉट प्रकारच्या होडीमधून उत्तर अटलांटिकचे, तर मायकेलसनने उत्तर समुद्राचे समन्वेषण केले. जेम्स ड्वाइट डेना या अमेरिकन भूवैज्ञानिकाने दक्षिण पॅसिफिकच्या मोहिमेत भाग घेऊन महासागराविषयीची भूवैज्ञानिक व जिववैज्ञानिक माहिती मिळविली... फ्रित्यॉफ नान्सेया नॉर्वेजियन समन्वेषकाने आर्क्टिक आणि अंटार्क्टिक महासागरांच्या मोहिमा काढल्या... त्याने प्लवक जीव पकडण्याच्या जाळ्यात सुधारणा केल्या व समुद्रांतर्गत लाटा सल्याचे सुचविले... एन. ए. ई. नूर्देनशल्द या स्वीडिश भूवैज्ञानिकाने आर्क्टिकमधील अनेक मोहिमांत भाग घेतला आणि ग्रीनलंडमधील बर्फाच्या थरांचा अभ्यास केला... अलेक्झांडर आगास्सिझ या अमेरिकन प्राणिवैज्ञानिकाने परिसराच्या संदर्भात सागरी प्राण्यांचा अभ्यास केला आणि एल. एफ. पूर्तालेसने आगास्सिझसह खोल सागरी जीवाविषयी संशोधन केले... अॅल्बर्ट हेस्टिंग्झ माक्रमने आर्क्टिकचे समन्वेषण केले... तर आडॉल्फस वॉशिंग्टन ग्रीली या अमेरिकन समन्वेषकाने ग्रीनलंडच्या उत्तरेकडील प्रदेशाचा शोध लावला व धृवीय प्रदेशांविषयीची पुस्तकेही लिहिली

 

ओटो क्र्यूमेलया जर्मन भूगोलतज्ञाने १८७९ साली महासागर व काही समुद्र यांच्या सीमा निश्चित करण्याचा प्रयत्न केला... रॉबर्ट एडविन पीअरी हा प्रत्यक्ष उत्तर धृवावर पोहोचला... त्याने लिहलेले द नॉर्थ पोल हे पुस्तक महासागरविज्ञानाच्या दृष्टीने उपयुक्त आहे... रॉबर्ट स्कॉट हा इंग्रज समन्वेषक दक्षिण धृवावर गेला व त्याने अंटार्क्टिकच्या आतील भागाचे सर्वेक्षण केले... त्याने सातवा किंग एडवर्ड लँडचा शोध लावला व रॉस समुद्राची खोली मोजली... रोआल आमुनसेन या दक्षिण धृव संशोधकाचे साऊथ पोल हे पुस्तक म्हत्त्वाचे आहे... ब्यर्न हेल्लान हान्सेन या नॉर्वेजियन महासागरवैज्ञानिकाने उत्तर समुद्राचे  समन्वेषण केले तर जॉर्ज व्यूस्टने सुमारे ४०० मीटर खोलीवरील उंचवट्यांच्या आधारे महासागराचे विभाग पाडावेत असे सुचविले व त्यानुसार ४५ द्रोणींची  यादीही तयार केली, मात्र ही विभागणी केव खोलीवरच आधारलेली असल्याने उपयुक्त ठरली नाही

 

एरनबेर्ख हंबोल्ट, हूकर व ओर्स्टेड या १९ व्या शतकातील निसर्गवैज्ञानिकांनी महासागरातील प्लवकांचे महत्त्व तसेच तळावरील गाळ व खडक निर्माण करण्यातील त्यांचा वाटा यांविषयी संशोधन केले... चार्ल्स डार्विनने प्रवाळभित्तींच्या उत्पत्तीविषयी, तर म्यूलरने प्लवक पकडण्याच्या जाळ्यांविषयी अभ्यास  केला

 

बीगलया ब्रिटिश जहाजाची मोहीम ५ वर्षे चालली... या मोहिमेत दक्षिण अमेरिकेच्या किनारपट्टीचा अभ्यास करण्यात आला... चाल्र्स डार्विनला क्रमविकासाचा तसेच सागरी बेटे व प्रवाळव्दीपे यांच्या उत्पत्तीचा सिद्धांत मांडण्यास या मोहिमेचा उपयोग झाला

 

१८६८ मध्येलाईट्निंग व १८६९ मध्ये पॉक्र्युपाइन या जहाजांनी केलेल्या मोहिमांमुळे महासागर विज्ञानातील काही आडाख्यांचा पुनर्विचार करणे व जास्तीत जास्त माहिती मिळविणे आवश्यक वाटू लागले... या मोहिमांमुळे पुढील महत्वाचे निष्कर्ष काढण्यास मदत झाली... एक म्हणजे, पाण्याचे तापमान निरनिराळ्या खोलींवर सर्वसाधारणपणे सारखे आढळते व त्यामुळे महासागरात एकसारखे अभिसरण चालू सते, याची खात्री पटली. अनेक ठिकाणांच्या नमुन्यांचे निरीक्षण केल्यावर २ किमी. खोल पाण्यातही जीवसृष्टी असते, याचा पुरावा मिळाला आणि चॅलेंजर मोहिमेला यामुळे चालना मिळाली

 

पृथ्वीला वळसा घालून सर्व समुद्रांचे संशोधन करणारे चॅलेंजर समन्वेषण १८७२ मध्ये डिसेंबरात सुरू झाले... समुद्रांविषयी सर्व प्रकारची माहिती मिळविण्याकरीता निघालेले हे जहाज १८७६ साली मे महिन्यात इंग्लंडला परतले... या मोहिमेत आर्क्टिकशिवाय इतर महासागरांतील पाण्याच्या खोलीविषयीची माहिती गोळा करण्यात आली, तसेच ३६२ जलालेखन केंद्रे उभारण्यात आली... समुद्रतळाचे मानचित्रण करण्यात आले... समुद्रातील प्राण्यांच्या ४,७१७नव्या जाती शोधून काढून त्यांचे वर्णन करण्यात आले... रॉयल सोसायटी व ब्रिटनने नाविक खाते यांनी पुरस्कारिलेल्या या मोहिमेतून मिळालेल्या माहितीचे सुमारे ५० खंड प्रकाशित झाले

 

या मोहिमेचा नेता स्कॉटिश निसर्गवैज्ञानिक सर चार्ल्स विव्हिल टॉमसन याने विशेषतः खोल  सागरी जीवांचा अभ्यास केला. व्हॉयिज ऑफ द चॅलेंजर हे त्याचे  पुस्तकही महत्त्वाचे आहे... सर जान मरीनेया मोहिमेच्या वैज्ञानिक फलश्रुतीच्या अहवालाचे संपादन व उत्तर अटलांटिकचे समन्वेषण केले. या मोहिमेत गोळा करण्यात आलेल्या पाण्याच्या नमुन्यांच्या विश्लेषणाद्वारे त्यातील घटक ठरवून सी. आर्मडिटमरने  रासायनिक महासागरविज्ञानाचा पाया घातला





आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel