रुखवत उचलताना वराकडील महिलांना उखाणा म्हणावा लागे, ते शुभ समजले जाई. पतीचे नाव घेताना जसे उखाणे घालतात तसेच ते 'रुखवता'चे वेळीहि घालतात. मात्र या प्रकारच्या उखाण्यामध्ये अतिशयोक्तीची भाषा अधिक असते वा विनोदाला भरपूर वाव दिला जातो. म्हणून अशा उखाण्यांना फोडणी अगर लवंगी मिरचीची उपमा दिली जाते. 'रुखवता'साठी वापरल्या जाणार्या उखाण्यांच्यामुळे कित्येकदा लग्नघरातील वातावरण भारी तंग होऊन भांडणे उभी राहतात. परंतु- "आला आला रुखवत, त्यावर ठेवला भोत,वाकडा तिकडा आणा घालू नका दुहीकडच जमलय गोत" असा इषारा देऊन त्याला पायबंद घातला जातो!
लहान लहान पण यमकबद्ध अशा वाक्यरचनेतून स्त्रिया आपल्या पतीचे नाव कुशलतेने गुंफून घेतात, त्या प्रकाराला उखाणा म्हणतात. Ukhane is a traditional form of two line poetry used exclusively between husband and wife. Generally wives are supposed to come up with quick and witty lines using which they can utter husband's name.
फुगडी खेळताना मुली, स्त्रिया उखाण्यांच्या स्पर्धा करून, खेळात रंग भरतात, त्यामुळे अजिबात दमायला होत नाही. फुगडी खेळताना देखील मुलीबाळी असे उखाणे घालीत असतात आणि मोठ्या बायका सहजगत्या बोलताना सुद्धा म्हणींचा वापर करताना दिसून येतात. जी गोष्ट बोलायची ती साधी सरळ अशी न बोलताना काव्यमय रीतीने बोलणे त्यांना अधिक आवडते.