नागमणी ही एक काल्पनिक रहस्य कथा आहे. जी वाचकांना एका अद्भूत, अलौकिक व रम्य विश्वात घेऊन जाते. ही कथा फक्त करमणूक या एकमेव उद्देशाने लिहिलेली नसून त्यात जागो-जागी जीवनविषयक तत्वज्ञान मांडण्याचा प्रयत्नही केलेला आहे. ह्या कादंबरीची विशेषता म्हणजे कथेचे रहस्य किंवा ही कथा नेमकी काय आहे हे ती शेवटपर्यंत वाचल्याखेरीज समजत नाही. आजवर ज्यांनी ज्यांनी ती वाचली आहे. त्या सर्वांच्या पसंतीस ती उतरली आहे.
'बहिर्मुखी' हा प्रसाद सुधीर शिर्के यांनी लिहिलेल्या कथांपैकी काही निवडक कथांचा संग्रह असून यात वाचकांना जीवनाकडे बहिर्मुख करण्याकरिता, पुस्तकाच्या नावाप्रमाणेच जीवनाची दुसरी बाजू उलगडून दाखवणाऱ्या कथा त्यात समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत.
महात्मा गांधींचे तथाकथित हिंदू मुस्लिम ऐक्यासाठीचे प्रयत्न असतील, याच ऐक्यासाठी हिंदुस्थानाच्या जनतेवर लादलेली खिलाफत चळवळ असेल, जवाहरलाल नेहरूंची गंगा-जमूनी तहजीब असेल, भारतावर लादलेली फाळणी असेल, डाव्यांनी भारतीय इतिहासाचे केलेले विकृतीकरण असेल, की १९७६ मध्ये भारताच्या राज्यघटनेत टाकलेला 'सेक्युलर' हा शब्द असेल. असे किती प्रयोग मोजून दाखवावे? या विषयावर संशोधन करू तितके कमीच! त्यामुळे त्यात फारसे अडकून न पडता भविष्याचा विचार करून वर्तमानात काय करता येण्यासारखे आहे?