ज्ञानेश्वर
संत ज्ञानेश्वर (जन्म : इ.स. १२७५ - समाधी : इ.स. १२९६) हे १३ व्या शतकातील प्रसिद्ध मराठी संत आणि कवी आहेत. संत ज्ञानेश्वरांचा जन्म आळंदी येथे झाला. सामान्य लोकांना भगवद्गीता समजण्यासाठी ज्ञानेश्वरांनी भावार्थदीपिका या नावाने भगवद्गीतेवर निरूपण/भाषांतर केले. ते ज्ञानेश्वरी या नावाने प्रसिद्ध आहे. भावार्थदीपिका हे भाषांतराचे कार्य ज्ञानेश्वरांनी अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथे केले.
श्रीज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ
Featured

श्रीज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठाचे पारायण केल्याने चातुर्मासाचे पुण्य मिळते.

ज्ञानेश्वरी Dnyaneshwari
Featured

शा.श. १२१२, अर्थात इ.स. १२९०, साली प्रवरातीरी असणार्‍या नेवासे या गावातील मंदिरात एक खांबाला टेकून भगवद्गीतेवर ज्ञानेश्वरांनी जे भाष्य केले त्यालाच ज्ञानेश्वरी किंवा भावार्थदीपिका म्हटले जाते. सर्वसामान्यांसाठी असणारा गीतेवरील ज्ञानेश्वरांचा हा टीकाग्रंथ मराठीतील सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे. मराठीतील गोडवा अन्य भाषिकांना कळावा या उद्देशाने संस्कृत(गीर्वाण), हिंदी भाषा, कन्नड, तामिळ, इंग्रजीबरोबरच २१ निरनिराळ्या भाषांमध्ये ज्ञानेश्वरी भाषांतरित झाली असून ते भाषांतरित॰ छापील ग्रंथ उपलब्ध आहेत.

अमृतानुभव

अमृतानुभव हा संत ज्ञानेश्वरांचा स्व-रचित ग्रंथ असून त्यात त्यांनी उपदेशपर तत्वज्ञान सांगितले आहे.या ग्रंथाला चिद्‌विलासानंद असेही नाव आहे. अमृतानुभव संत ज्ञानेश्वर यांची १३व्या शतकातली रचना आहे.ती मराठी साहित्यात; एक मैलाचा दगड ठरते.