अमोल सोनवणे
अमोल सोनवणे
बायको म्हणजे

बायको म्हणजे, बायको म्हणजे खरतर बायकोच असते.... तुमची काय ,नी माझी काय, स्वभावाने अगदी सेमच असते. आपल्या मित्रांची, तिला म्हणजे खरतर आलर्जीच असते.... सवयीची आपल्या, तिच्याकडे जणू, वहिभरून अख्खी यादीच असते. बायको म्हणजे, बायको म्हणजे खरतर बायकोच असते.... शेजारणीच्या नवऱ्याच्या स्वभावाचे, तिच्याकडे जणू सर्टिफिकेटच असते. कपाटापुढे उभे राहिल्यावर तिच्याकडे तिच्या आवडीची तिला साडीच नसते... गळा भरून दागिने असले तरी सुद्धा, हिच्याकडे नेमकं काहीतरी कमीच असते. बायको म्हणजे, बायको म्हणजे खरतर बायकोच असते.... मुलांच्या, आणि संसाराच्या भविष्याची, खरंतर तिलाच खूप खूप चिंता असते. आपल्याला सांभाळून सावरणारी तिची साथ लाखमोलाची असते..... आपला अभिमान गाजवणारी, तीच एकमेव आपली साथीदार असते. तुमच्या असंख्य चुकांवर पांघरून, घालणारी तीच खरी न्यायदेवता असते..... सगळ्या घरादाराला बांधून ठेवणारी, ती एकमेव प्रेमाचा अतूट धागा असते. बायको म्हणजे, बायको म्हणजे खरतर बायकोच असते.... तुमची काय ,नी माझी काय स्वभावाने अगदी सेमच असते

नात्यांचा गोतावळा

सुंदर जीवन जगण्यासाठी,आपली नाती आपणच जपायला हवी