व्यंकटेश दिगंबर माडगूळकर (जन्म : माडगूळ, ५ एप्रिल १९२७; मृत्यू : २७ ऑगस्ट २००१) हे मराठी लेखक आणि चित्रकार होते. त्यांनी कथा, कादंबऱ्या, प्रवासवर्णनांसह चित्रपटांसाठी पटकथाही लिहिल्या. व्यंकटेश माडगूळकर यांना शिकारीचा छंद होता.त्यांनी काही पुस्तके त्यांच्या जंगल भ्रमंतीच्या अनुभवांवर लिहिली आहेत.
व्यंकटेश माडगूळकर यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील माडगूळचा. औपचारिक शिक्षण मॅट्रिकपर्यंतही झाले नाही. तथापि त्यांनी स्वप्रयत्नाने वाङ्मयाचा व्यासंग केला. इंग्रजी शिकून पाश्चात्त्य साहित्याचेही वाचन केले. मराठी कवी, गीतकार ग.दि. माडगूळकर यांचे हे धाकटे बंधू होत.
गांवाकडच्या गोष्टी
Featured
व्यंकटेश माडगूळकर ह्यांचे हे लेखन आम्हाला गावांतील कथांत घेऊन जातात. ग्रामीण जीवन, तेथील लोकांचा साधेभोळे पणा तसेच विक्षितपणा ह्यातून जो विनोद निर्माण होतो तो इथे तुम्हाला वाचायला मिळेल.