महाकाल
अनादी मी.... अनंत मी... अथांग...अपार....अलौकिक मी दगडात काय शोधिसी मजला ? शब्दात... अक्षरात... केवळ मीच! वाच, मन:चक्षु उघडून कळेल तुजला मी म्हणजे मी आणि तू म्हणजे सुद्धा मीच!!!
संताच्या जीवनातील प्रेरक प्रसंग -भाग पहिला
Featured

जीवनाचा मार्ग सुकर करणाऱ्या प्रेरक लघुकथा

संतांच्या जीवनातील प्रेरक प्रसंग -भाग दुसरा
Featured

जीवनाचा मार्ग सुकर करणाऱ्या प्रेरक लघुकथा

ठकास महाठक
Featured

हुशारीने वागलो तर कोणत्याही संकटावर मात करता येते.

खडका कोथिंबिरीची गोष्ट
Featured

खडका कोथिंबिरी जळामध्ये मासा आंब्यावरी कीर देवादारी मोर राजाघरी थोर भाई माझा

खलील जिब्रानच्या निवडक कथा
Featured

आर्मीनिया देशातील लेबेनॉन या गावी जन्मलेला एक अरबी वेडा खालिल जिब्रान इजिप्त, फ्रान्स, अमेरिका वगैरे देशात गेला. तेथे उत्तम शिकला पण मोठ्या प्रयत्नांनी वेडाचा वेडाच राहिला आणि त्याने अरबीप्रमाणे इंग्रजी भाषेच्या द्वारेदेखील पुष्कळाना वेड लावले. अरब जगतात जिब्रानला साहित्यिक व राजकीय बंडखोर मानले जाते. परंपरागत संप्रदायापासून फारकत घेणारी त्याची रोमांचक लेखन शैली, विशेषतः त्याच्या गद्यात्मक कविता आधुनिक अरब साहित्यातील प्रबोधनाच्या केंद्रस्थानी होत्या. लेबनॉनमध्ये आजही त्याला साहित्यिक हिरो मानले जाते.शेक्सपिअर आणि लाओ-त्झूनंतर खलील जिब्रान हा सार्वकालिक बेस्टसेलर असणारा तिसरा कवी आहे. या पुस्तकात आपण त्यांच्या काही प्रसिद्ध कथांचा स्वैर मराठी अनुवाद वाचू शकता.

एका ऊ ची गोष्ट
Featured

आपण आपल्या कळत नकळत कशी नकारत्मक उर्जा पसरवतो हे या लोककथेमध्ये माध्यमातून व्यंगात्मक पद्धतीने मांडले आहे

लोकभ्रमाच्या दंतकथा
Featured

या लोकभ्रमाच्या खूपच चमत्कारिक, हास्यास्पद, विनोदी अशा दंतकथा आहेत. या लोकांमध्ये पूर्वी प्रचलित होत्या पण त्या केवळ मिथक आहेत. फक्त एक गम्मत म्हणून वाचाव्यात यातील एकही अक्षर खरे नाही.

भूते पकडणारा तात्या नाव्ही
Featured

कोणे एके काळी कोकणात एक तरुण नाव्ही एका छोट्या खेडेगावात राहत होता. त्याचे नाव होते तात्या. त्याला त्याचे केस कापणे आणि दाढी करणे हे काम खूप आवडत असे. लोकांचे केस कापताना आणि दाढी करताना तो त्यांच्याकडून अनेक मनोरंजक कथा ऐकायचा

शिव-परिवार प्रतिमेचे रहस्य
Featured

या चित्रात दाखवलेल्या कुटुंबात वडील, आई आणि दोन मुलगे आहेत पण हे काही सामान्य कुटुंबाचे चित्र नाही. हे देवाधिदेव भगवान शिवाचे कौटुंबिक चित्र आहे. तो डोंगरावर त्याची पत्नी म्हणजे हिमालयाची कन्या पार्वती आणि त्याची दोन मुले गणेश अर्थात गजानन आणि भालाधारक कार्तिकेय यांच्यासोबत बसला आहे.

देवीची विविध रूपे आणि त्यांमागचे रहस्य
Featured

देवीची विविध रूपे आणि त्यांमागचे रहस्य

छोट्याशा लव्ह स्टोरीज
Featured

" छोट्याशा लव्ह स्टोरीज " हे पुस्तक माझ्या कॉलेजच्या दिवसांपासूनच्या छोट्या परंतु गुपित असलेल्या प्रेमकथांचा संग्रह आहे. मला खात्री आहे की या कथा तुम्हाला तुमच्या कॉलेजच्या दिवसांपासूनच्या प्रेमाची आठवण करून देतीलया कथा तुम्हाला हसवतील, रडवतील आणि कधी विचार करायला लावतील. आजच्या 5G च्या जमान्यात मोठमोठ्या कथा वाचायला कोणाकडेच वेळ नाही. म्हणूनच मी लघु प्रेमकथांचा संग्रह लिहिला आहे. हा माझा नवीन प्रयत्न आहे. कृपया हे पुस्तक एकदा वाचा आणि तुमची प्रामाणिक प्रतिक्रिया द्या. टीप: येथे "मी" ही केवळ काल्पनिक भूमिका आहे. जर तुम्हाला ह्या प्रेमकथा आवडल्या असतील तर माझ्या कमेंट करा. कृपया या पुस्तकासाठी तुमची प्रतिक्रिया देऊन या पुस्तकाला भरभरून प्रेम द्या. धन्यवाद...

हनुमान-माकड होता की मानव?
Featured

या पुस्तकात अनेक पुरावे दिले आहेत, ज्यावरून असे सिद्ध होईल की श्री हनुमान एक महान विद्वान, ब्रह्मचारी, शक्तिशाली पुरुष होता, परंतु आपल्याच बांधवांनी त्याला माकड घोषित केले आहे. ज्या धर्माचा किंवा देशाचा इतिहास नष्ट झाला किंवा बिघडला, तो देश किंवा धर्म टिकू शकत नाही, ते निश्चितच विनाशाच्या उंबरठ्यावर उभे आहेत, हे लक्षात घ्या.

संपूर्ण वास्तुशास्त्र-भाग पहिला
Featured

प्रत्येकाला सुख, समृद्धी आणि निरोगी आयुष्य हवं असतं आणि हे सुख प्रत्येकाच्या नशिबात असतच असं नाही. असं का बरे असू शकेल? याचं कारण एकच आपण वास करत असलेली वास्तू! वास्तुशास्त्र दिशांच्या योग्य संतुलनामुळे उत्पन्न होणाऱ्या सकारात्मक उर्जेच्या स्पंदनांवर आधारीत शास्त्र आहे.

राशीफल २०२२
Featured

राशीफल २०२२

तिसरे महायुद्ध आणि नॉस्ट्रॅडॅमस
Featured

जगातील महान भविष्यवेत्ता नॉस्ट्रॅडॅमस यांनी ५०० वर्षांपूर्वी २०२२ या वर्षीची एक मोठी भविष्यवाणी करून ठेवली आहे. नॉस्ट्राडेमस याने केलेली भविष्यवाणी या आधी कधीच चुकीची ठरलेली नाही. हिटलरची राजवट, दुसरे महायुद्ध, ९/११ चा दहशतवादी हल्ला आणि फ्रेंच राज्यक्रांती याविषयी नॉस्ट्रॅडॅमसने केलेले अचूक भाकीत खरे ठरले आहे.

जपानी मांजर
Featured

खूप वर्षांपूर्वी जपान मधील समुद्रा जवळच्या एका गावात घडलेली गोष्ट आहे. त्या गावात योहेई नावाचा गरीब मुलगा त्याच्या वडिलांसोबत राहत होता. एकदा योहेईला चिखलात माखलेली एक पांढरी मांजर आपल्या दारात दिसली. त्याने त्या बेवारस मांजरीचे स्वागत केले आणि मांजर पसार होण्यापूर्वी त्याने त्याचे जेवण त्याच्याबरोबर वाटून घेतले. मग ती मांजर त्यांच्याकडेच राहू लागली. पुढे योहेईचे वडील आजारी पडले तेव्हा तो खूप उदास झाला. बापाची काळजी घेण्यासाठी तो घरीच राहिला असता तर हाता तोंडाची गाठ कशी पडणार होती? अशा वेळी त्या लहानशा पांढऱ्या मांजरीला योहेईचे औदार्य आठवले आणि ती प्रत्येक वेळी आपले पंजे हलवत हलवत काही न काही मदत घेऊन परत येत असे.

मलाला
Featured

संकटांपासून वाचवण्यासाठी देवाकडे प्रार्थना करू नका. त्यापेक्षा त्यांचा निर्भयपणे सामना करा -रविंद्रनाथ टैगोर एक दिवस मलाला शाळेच्या व्हॅनमध्ये जात होती तेव्हा एका तालिबानी सैनिकाने मलालावर गोळीबार केला. गोळी तिच्या डोक्याला आणि मानेला चाटून खांद्यात घुसली. त्यानंतर मलालावर अनेक हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले होते. अखेरीस इंग्लंडमधील क्वीन एलिझाबेथ हॉस्पिटल बर्मिंगहॅममध्ये ती बरी झाली. आता मलाला तिच्या कुटुंबासह तिथेच राहते. तिची कहाणी जितकी प्रेरणादायी आहे तितकीच चित्तथरारक आहे.

शिव प्रतिमेचे रहस्य
Featured

कर्पूरगौरं करुणावतारं, संसारसारं भुजगेन्द्रहारम् । सदावसन्तं हृदयारविन्दे, भवं भवानीसहितं नमामि ॥1॥ मन्दारमालाकुलितालकायै कपालमालांकितकन्धराय। दिव्याम्बरायै च दिगम्बराय नम: शिवायै च नम: शिवाय॥2॥ श्री अखण्डानन्दबोधाय शोकसन्तापहारिणे। सच्चिदानन्दस्वरूपाय शंकराय नमो नम:॥3॥

शून्य-एक सुरुवात
Featured

जवळजवळ प्रत्येक माणसाला मनात क्वचित का होईना एक प्रश्न नेहमी पडतो कि आपली उत्पत्ती कशी झाली? जर आपण आपल्या पुस्तकांचे शास्त्रीय विश्लेषण केले तर आपल्याला नक्कीच त्याचे उत्तर मिळेल. हिंदू धर्माची सुरुवात शिवापासून होते. पण मग शिव कोण आहे? तो देव आहे का? आणि जर आहे तर शिवाची उत्पत्ती कशी झाली? आपले धर्मग्रंथ आपल्याला त्याचे उत्तरही देतात.

जलपरी-सत्य कि कल्पना?
Featured

जलपरी हा एक जलचर प्राणी आहे ज्याचा वरचा भाग स्त्रीच्या शरीरासारखा आणि खालचा भाग माशासारखा असतो. पण त्यांचे अस्तित्व सत्य आहे कि हा एक निव्वळ मानवी कल्पनाविलासाचा भाग आहे?

द कल्प विग्रह
Featured

कल्प विग्रह हि भगवान विष्णूची द्वापार युगात तयार केली गेलेली सर्वात प्राचीन मानवी कलाकृती आहे. आज हि मूर्ती गहाळ झालेली असून तिच्यावर मोठ्या रकमेचे बक्षीस अमेरिकेतील एका संस्थेने जाहीर केले आहे.