सखी
एक मैत्रीण असावी सगळं काही समजणारी, न बोलता आपल्या मनातलं ओळखणारी, मी तुमची सखी तुमच्यासाठी घेऊन आलेय स्त्री मनाचा छोटासा कवडसा....!!
भोंडला
Featured

“आयलामा पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडून दे, करीन तुझी सेवा…!” भोंडल्याचा पहिला दिवस, आणि आजूबाजूच्या सर्व तरुण मुली उत्साहाने एकत्र ,येतात उत्सव साजरा करण्यास तयार असतात. एका पाटीवर हत्ती काढला जातो, आणि गायन आणि नृत्य सुरू होते. एक पारंपारिक महाराष्ट्रीयन सण, भोंडला हा विवाहित तरुणींना त्यांच्या सासरपासून काही दिवस विश्रांती घेण्याचा एक मार्ग म्हणून उगम पावल्याचे मानले जाते. पूर्वी जेव्हा वधू सामान्यतः तरुण आणि लहान मुली होत्या, तेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा त्यांच्या पालकांकडे परत जाणे त्यांच्यासाठी महत्त्वाचे होते. यासाठीची गाणी या पुस्तकात दिली आहेत.

मुलांचे संगोपन
Featured

मुलांचे चांगले संगोपन करण्यासाठी इतर अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. अश्या अनेक गोष्टीबद्दल मी माझ्या लेखांमध्ये लिहिणार आहे. मी सखी माझ्या सगळ्या मैत्रिणीसाठी असे अनेक लेख या मालिकेतून प्रकाशित करणार आहे.प्रत्येकजण आपल्या मुलाची प्रशंसा करतो यापेक्षा कोणत्याही आईसाठी दुसरा आनंद असू शकत नाही. पण मुलाला या स्तुतीस पात्र बनवण्यासाठी मोठ्यांना काही कष्ट घ्यावे लागतात. ही काही साधी बाब नाही. वडिलधाऱ्यांच्या तोंडून जे काही बाहेर पडते, जे काही काम त्यांच्या हातून घडते, त्या सगळ्याच मुले अनुकरण करतात. म्हणूनच मुलांच्या चांगल्या वाईटाला वडीलमंडळीच जबाबदार असतात. आपण मुलांशी कसे वागावे याची थोडक्यात माहिती यामध्ये दिली आहे.

मुलांचा खुराक
Featured

मुलांचे चांगले संगोपन करण्यासाठी इतर अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. अश्या अनेक गोष्टीबद्दल मी माझ्या लेखांमध्ये लिहिणार आहे. मी सखी माझ्या सगळ्या मैत्रिणीसाठी असे अनेक लेख या मालिकेतून प्रकाशित करणार आहे.

मुलांचे पोशाख

माणसासाठी जितके महत्वाचे अन्न असते तितकेच कपडे हि असतात. जसे चुकीच्या अन्नग्रहणाने अपचन होऊ शकतं तसच चुकीचे कपडे लहान मुलांना घातले तर त्यांना अंगावर चट्टे उठू शकतात. त्यांना अनेक त्वचा रोगांना लहान वयातच सामोरे जावे लागते. मागच्या वेळी मी मुलांच्या खुराकाबद्दल सांगितले होते. यावेळी त्यांच्या पेहरावाबद्दल लिहित आहे.