स्वीकार हा विश्वास हवा ....

आपल्या आयुष्यात घडून गेलेली प्रत्येक गोष्ट मग ती वाईट असली, नुकसान करणारी असली तरीही ती तशी घडणे आवश्यक होते... अशा दृष्टिकोनातून ती गोष्ट स्विकारणे. ती गोष्ट आवडली नाही तरीही ती स्विकारणे... शांततेने, प्रसन्नतेने स्विकारणे.

उदाहरणच द्यायचे झाले तर ....

*थॉमस  एडिसन* जेवत होता. तेवढ्यात एक माणूस धावत आला.  त्याने वाईट बातमी आणली होती. एडिसनच्या प्रयोग शाळेला आग लागली होती.

एडिसनने त्याला कसा प्रतिसाद दिला असेल असे वाटते?

"अरे देवा, काय हे... माझं नशिबच फुटकं... माझी सगळी मेहनत वाया गेली... " अशी?

की त्याने खूप चिडून, बिथरून, आरडाओरड केली असेल?

पण यापैकी काहीच घडलं नाही. एडिसनने आपल्या मुलाला हाक मारली आणि म्हणाला "अरे तुझ्या आईला आधी बोलाव, तिला अशी आग परत पहायला मिळणार नाही"

स्वाभाविकपणे मुलाला हेच वाटले की आपल्या बापाचे डोके फिरले, वेडा झाला बाबा. आजवर केलेली सर्व मेहनत आगीत भस्मसात होत होती आणि एडिसन शांत होता. तो शांतपणे म्हणाला "आग लागली हे बरं झालं माझ्या सगळ्या चुका आणि इतर अनावश्यक गोष्टी जळून गेल्या."

 

आपल्या आयुष्यात घडून गेलेल्या गोष्टी खऱ्या स्वरुपात आनंदाने स्विकारणे.

एडिसन विमनस्क, हताश, उदास काहीच न होता नव्या उत्साहाने कामाला लागला. आगीत भस्मसात झालेली संपत्ती त्याने दसपटीने परत मिळवली.

जेव्हा आपल्याला हरल्यासारखं वाटेल तेव्हा ते शांत रहाणंच जोमाने प्रवास करण्यासाठी नविन उर्जा देणारं असतं

सगळं विपरित घडत असतांना ते शांत रहाणं

निराशेतही शांत रहाणं तुमच्या चेहऱ्यावर हसू उमटवणारं ठरतं.

तुमचा जॉब  गेला असेल, .....आर्थिक विवंचना असतील.

आयुष्यभराची कमाई कोणी लुबाडली असेल,

सर्वात प्रिय व्यक्तिला असाध्य रोग झाला असेल,

तुम्हाला कोणी अत्यंत वाईट वागणुक दिली असेल,

आयुष्याने तुमच्यासमोर असे आव्हान उभे केले असेल ज्यातून तुमची सुटका नाही,

तुमच्या विषयी इतरांनी करुन दिलेले गैरसमज त्यातून तुमचे होणारे अपमान ..

असे कितीतरी प्रसंग..आपण रोजच्या दैनंदिनेत स्वीकारत असतो.सध्याची ही स्थिती अशा गोष्टी ना पूरकच ....मग यातून बाहेर पडण्यासाठी ...acceptance हवाच

तुम्ही हे सगळं हसत स्विकारले तर त्यातूनच नव्या उर्जेने पुढे जाता...जर वाईट घडलं तर ते घडणारच होतं हे स्वीकारता यायला हवं

कुणासाठी किती केलं हे लक्षात ठेवण्यापेक्षा,आपल्यासाठी कुणी किती केलं हे लक्षात ठेवल की जगणं अगदी सोप्प होतं.....नवीन उर्जा मिळते..

कोणत्याही संकटात शांत राहणं शक्य नसलं तरी शांत राहता येत जर तुमच्या कडे स्विकारहार्ता असेल तर ....माझ्या नशीबातच हे होते म्हणत बसण्यापेक्षा मी माझ्या नशीबाचा स्वीकार करते ...हे सकारात्मक विधान नकारात्मकतेला दूर करते...स्वीकार करता यायला हवंच ..प्रत्येकाचे प्रारब्ध वेगळे त्यानुसार नशीब मग प्रार्थनेबरोबरच अशी

सकारात्मकता ...स्वीकारण्याची कला अंगी बाणवली तर ....हाही काळ जाईल असाच विश्वास निर्माण करते ...

स्वीकार्यता विश्वासार्हता वाढवते स्वतः स्वतः ला समृद्ध करते.

सहजच सुचलेले मनातले ..स्वीकार्यता होईल हा विश्वास

©मधुरा धायगुडे

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel