द फ्रेन्डशिप एक्सप्रेस असाही नाव या समझोता एक्सप्रेसला देण्यात आले आहे. त्याचे कारणही तितकेच वैशिष्ठ्यपूर्ण आहे. हि ट्रेन आठवड्यातून दोन वेळा  गुरुवार आणि सोमवार या दिवशी चालवली जायची. “समझोता” या शब्दाचा अर्थ  करार किंव्हा तडजोड असाही होतो. भारताने  जुलै २२ १९७६ साली पाकिस्तानशी केलेला करार किंव्हा फाळणी नंतरची तडजोड म्हणून हि ट्रेन चालू करण्यात आली होती. हि ट्रेन पाचशे दोन किलोमीटरचा प्रवास करते. 

समझोता एक्सप्रेसचा इतिहास

सुरुवातीला १९७६ साली  समझोता एक्सप्रेस रोज चालवली जायची. काही वर्षांनी १९९४ साली ह्याची वेळ आठवड्यातून दोन वेळा करण्यात आली. जेव्हा ट्रेनच्या प्रवासाची सुरुवात झाली, तेंव्हा ट्रेन ज्यादिवशी आपल्या गंतव्य स्थानकावर पोहोचायची तेंव्हा तिथून लगेच परतीचा प्रवास करत असे.  कालांतराने म्हणजे साधारणपणे२००० साली ट्रेन शेवटच्या स्थानकावर थांबु लागली होती. २००१ सालच्या दिल्ली राज्यभवनावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर हि ट्रेन तात्पुरती बंद करण्यात आली होती. २००४ साली तिच्या फेऱ्या परत चालू करण्यात आल्या.  बेनझीर भुत्तोंच्या खुनानंतर या ट्रेनची सेवा परत बंद करण्यात आली. ८ ऑक्टोबर २०१२ साली हि ट्रेन दिल्लीला परतीचा प्रवास करताना वाघा बॉर्डरजवळ नेहमीच्या सिक्युरिटी चेक साठी थांबली होती. त्याच ट्रेनमध्ये पोलिसांना १०० किलो हेरॉईन आणि ५०० बंदुकिच्या गोळ्या सापडल्या होत्या. भारत-पाकिस्तानातील काश्मीर मुद्दा पेटल्याने हि ट्रेन भारताने परत बंद केली. नंतर काश्मीरमधील ३७० कलमाला विरोध म्हणुन पाकिस्तानने ट्रेन बंद केली.

सामझोता एक्सप्रेसचा मार्ग

ह्या मार्गाची दोन गंतव्य ठिकाणं म्हणजे भारतातील दिल्ली आणि पाकिस्तानातील लाहोर ही होती. त्यात ही ट्रेन दोन्ही देशांच्या सीमेवरील एक-एक स्टेशन घेत होती. भारतातील वाघा आणि पाकिस्तानातील अत्तारी ह्या ठिकाणी थांबे घेत होती.

समझोता एक्सप्रेसच्या इतिहासातले भीषण दिवस.

१९ फेब्रुवारी,२००७ या दिवशी ट्रेन मध्ये दहशतवादी हल्ला झाला. तेंव्हा ७० माणसे मारली गेली त्यात काही पाकिस्तानी नागरिक होते तर काही भारतीय जवान ही होते. हा हल्ला दिवाणा स्टेशन जवळ म्हणजे भारतातल्या हरियाणाच्या पानिपत जवळ झाला. हा हल्ला स्वामी असीमानंद यांनी केला असा फोल अंदाज लावला गेला. परंतु पुराव्या अभावी त्यांना निर्दोष मुक्तता मिळाली.

१ जुन, २००९ साली अमेरिकेच्या सरकारी अधिकार्यांनी लष्कर-ए-तोयबा च्या आरिफ कासमानीला या बाँम्ब हल्ल्याचा जबाबदार ठरवला. 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel