समझोता एक्सप्रेसच्या अपयशानंतर भारताने पाकिस्तानकडे एक मैत्रीचे पाउल उचलायचे म्हणून थार एकसप्रेस चालू केली. ही ट्रेन भारत आणि पाकिस्तान यांच्या सीमांना जोडून जोधपुर ते कराची हे अंतर पार पडते. ही ट्रेन थारच्या वाल्वातातून वाट काढत जाते म्हणून हिला थार एक्सप्रेस असे नाव देण्यात आले. थार वाळवंट हे ७७००० स्वेअर मीटरचे आहे. सं १९७१च्य बांगलादेश युद्धानंतर भारत आणि पाकिस्तान यांची आमध्ये शिमला येथे १९७२ साली एक करार झाला. या करारनंतर हैदराबाद ते जोधपुर जाणारी रेल्वेलाईन बंद करण्यात आली होती. २००६ साली ह्या रेल्वेलाईनची दुरुस्ती करून पुनश्चः चालू करण्यात आली. या निर्णयाला तब्बल एक्केचाळीस वर्षे वाट पहावी लागली.
थार एक्सप्रेसचा इतिहास
ब्रिटीशांच्या कालखंडात साधारण १८९२ साली जोधपूर ते हैदराबाद अशी रेल्वेलाईन तयार केली गेली होती. परंतु १९०१ मध्ये सिंध मेल धावायला लागली होती. ही ट्रेन बॉम्बे म्हणजे आत्ताची मुंबई-कराची अशी चालू झाली होती. ही ट्रेन अहमदाबाद- पालनपुर- मारवाड- पाली- लुनी- मुनबाव- खोख्रापूर- मिरपूर खास- हैद्राबाद अशी जात असे. त्यामुळे जोधपुर हैद्राबाद ट्रेनचे महत्व कमी झाले. ही ट्रेन १९४७ पर्यंत कार्यरत होती. भारताच्या फाळणीनंतर जी ट्रेन जोधपूरचा उत्तरीय भाग आणि मुंबईच्या बेटांना जोडायची ती लाही काळासाठी बंद झाली. यातला जोधपूरचा उत्तरीय प्रदेश पाकिस्तानातल्या सिंध प्रांतात गेला तर मुंबई ही भारतात राहिली त्यामुळे साहजिकच ह्या ट्रेनची सेवा बंद करणे अनिवार्य होते. यामुळे जोधपुर-मुनबाव हया भारताच्या तर, खोख्रापूर-हैद्राबाद हया पाकिस्तानच्या महत्वाच्या शहरांना जोडणारी व्यवस्था खंडित झाली. भारत पाकिस्तानच्या आपसातल्या वादाने पाकिस्तानी हवाई दलाने त्या रेल्वेलाईनवर बॉम्बने हल्ला केला आणि ही सेवा कायमची बंद झाली. १९७६ साली भारत पाकिस्तान यांनी ती रेल्वे परत चालू करण्यासाठी म्हणून शिमल्याचा करार केला. त्यावेळी समझोता एक्सप्रेस, दिल्ली- लाहोर बस सेवा, श्रीनगर-मुज्जाफाराबाद बस सेवा चालू केली. दोनही देशातील रेल्वेलाईन दुरुस्तीनंतर १८ फेब्रुवारी,२००६ साली सुरळीत चालू झाली होती. पाकिस्तान काही आपल्या वाईट गुण दाखवण्यापासून दूर राहू शकला नाही. त्यामुळे ही ट्रेन ९ ऑगस्ट २०१९ साली कायमस्वरूपी बंद करण्यात आली. पाकिस्तानला ताकिद देण्यात आली.