हनुमान हे एक विद्वान राजमंत्री होता, श्रीरामाने देखील हनुमानाला वेदशास्त्र, व्याकरण आणि संस्कृत विषयाचे महान विद्वान मानले. सीतेच्या अपहरणानंतर वियोगाने व्यथित होऊन श्री राम लक्ष्मण सुग्रीवाच्या राज्यातून मार्गक्रमण करत जात असताना, सुग्रीवाने या अनोळखी नवोदितांना दुरूनच पाहून हनुमानाला त्यांची माहिती जाणून घेण्यासाठी त्यांच्याकडे पाठवले. हनुमान ब्रह्मचारी रूप धारण करून श्रीरामांकडे गेला आणि त्यांच्याशी बोलून त्यांचा परिचय विचारला तेव्हा श्रीरामाने लक्ष्मणाला सांगितले.

सचिवोऽयं कपीन्द्रस्य सुग्रीवस्य महात्मनः ।

तमेवकांक्षमाणस्य ममान्तिकमिहागतः ॥२६।।

नाऋग्वेद विनीतस्य नायजुर्वेदधारिणः ।

ना सामवेदविदुषः शक्यमेव विभाषितम् ।।२८।।

नूनं व्याकरण कृत्सनमनेन बहुधाश्रुतम् ।

बहुव्याहारतानेन न किञ्चिदपशब्दितम् ॥२६॥

(वाल्मिकी रामायण किष्किन्धा काण्ड सर्ग ३)

अर्थ-

हे लक्ष्मणा ! हा हनुमान सुग्रीवाचा मंत्री असून तो आपल्या इच्छेने माझ्याकडे आला आहे. ज्या व्यक्तीने ऋग्वेद वाचला नाही, ज्याला यजुर्वेद ज्ञात नाही, जो सामवेदाचा अभ्यासक नाही, तो हा जसे बोलतोय तसे बोलू शकत नाही. याने संपूर्ण व्याकरण नक्कीच अभ्यासले आहे कारण त्याने आपल्या संपूर्ण संभाषणात एकही अशुद्ध शब्द उच्चारला नाही.

यावरून हे स्पष्ट होते की हनुमान वेद आणि व्याकरणाचा मोठा पंडित होता. हनुमान शब्दशास्त्र आणि व्याकरणाचे ज्ञान असलेला उत्तम विद्वान होता.

श्रीरामो लक्ष्मणं प्राह पश्यनं बटूरूपिणाम् ।

शब्दशास्त्रमशेषेण श्रुतं नूनमनेकधा ।।१७॥

अनेकभाषितं कृत्सनं न किञ्चिदपशब्दितम् ।

तत: प्राह हनूमन्तं राघवो ज्ञान विग्रहः ॥१८॥

(अध्यात्म रामायण किष्किन्धा काण्ड सर्ग १)

अर्थ-

श्रीराम म्हणाले, "हे लक्ष्मणा! या ब्रह्मचारी व्यक्तीकडे पहा. निश्चितच त्याने संपूर्ण कोश आणि व्याकरण अनेक वेळा वाचले आहे. पाहा! त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या, पण त्यांच्या बोलण्यात एकही चूक नव्हती.

विदिता नौ गुणा विद्वान सुग्रीवस्य महात्मनः ॥३७॥

(वाल्मिकी रामायण किष्किन्धा कान्ड सर्ग ३)

अर्थ-

लक्ष्मणाने हनुमानाला सांगितले की हे विद्वान! महात्मा राजा सुग्रीव यांचे गुण आम्ही जाणतो.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel