सावध
प्रकरण १०
पियुष चा निरोप घेऊन पाणिनी पटवर्धन आपल्या ऑफिसमध्ये आला तेव्हा सौम्या काम करत होती
“पोलिसांकडून काही कळलं का सौम्या म्हणजे त्यांचा फोन आला होता का ?किंवा ते येऊन गेले का?”
“काहीही नाही. त्यांच्याकडून काहीच नाही”
पाणिनीच्या कपाळाला आठ्या पडल्या “हे मला समजत नाहीसे झाले की अजून पर्यंत पोलीस आपल्यापर्यंत कसे पोहोचले नाहीत. खरं म्हणजे तास दोन तासापूर्वीच ते इकडे यायला हवे होते.”
“सर, तुम्हालाही त्यांच्याकडून फोन वगैरे काही आला नाही?”
“नाही ना मी पियुष ला भेटायला हॉस्पिटलमध्ये गेलो होतो”
“पियुष ची तब्येत कशी आहे आता?”
“ठीक आहे सुधारतोय तो त्याची तब्येत सुधारण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रसंग घडला आहे” पाणिनी म्हणाला
“काय घडलंय?” सौंम्या ने विचारलं
“तुला माहितीये ना सौम्या चांगल्या विमा कंपन्या ज्या असतात त्या क्लेम सेटल करताना वकिलांशी तडजोड करून सेटलमेंट करायला त्यांना आवडतं पण काही विमा कंपन्या अशा असतात की त्यांना वकिलांना मध्ये न घालता थेट आपल्या क्लायंटशी संपर्क करून त्याच्याशी डील करायला आवडतं.”
सौम्याने संमतीदर्शक मान हलवली
“कारण त्यांच्याशी समजूत असते की वकिलांशी बोलून तडजोड करण्यापेक्षा आपण आपल्या क्लायंटशी थेट बोललं तर सौदा स्वस्ता त करता येतो. फार तर ते त्यांच्या क्लाइंटला सांगू शकतात की तुझ्या वकिलाशी बोलण्यापेक्षा तुझ्या वकिलाची फी आम्ही परस्पर देऊ म्हणजे त्याचा तुला ताण येणार नाही आणि मग त्यांचा क्लायंट या गोष्टीला तयार होतो पण त्या क्लायंटच्या हे लक्षात येत नाही की विमा कंपनी वकिलाना पुरेशी फी देतच नाही ती त्यांना नाममात्र फी देते आणि उर्वरित फीच्या वसुलीसाठी वकिलांना कोर्टात झगडायला लावते.”
“बर मग नक्की काय झालंय? त्या पियुषच्या केस मध्ये सांगा ना मला सर.”
“सकृतदर्शनी असं दिसतंय की या महिन्याच्या तीन तारखेला कीर्तीकरचा ड्रायव्हर,परब,गाडी बाहेर घेऊन गेला असावा आणि त्यांनी कोणाला तरी धडक दिली असावी. नंतर तो कीर्तीकर कडे गेला असावा आणि फार खोलात तपशील न सांगता त्यांनी त्याला एवढंच सांगितलं असावं की मी अडचणीत सापडलोय. कीर्तीकर ने मग आपण किती हुशार आहोत हे दाखवण्यासाठी आपली गाडी तो बाहेर घेऊन गेला असावा अग्निशमनाच्या खांबासमोर यांनी ती गाडी लावली असावी आणि ती चोरीला गेल्याची तक्रार नोंदवली असावी आपल्या या हकीकतिला दुजोरा मेळावा म्हणून त्यांना क्लबच्या वॉचमनला लाच दिली असावी आणि सांगायला सांगितलं असावं की संपूर्ण दुपार भरतो क्लब मध्येच होता बाहेर कुठेही गेला नव्हता.”
“म्हणजे सर, कीर्तीकरचा ड्रायव्हरनेच गाडी बाहेर घेऊन गेला तेव्हा पियुषच्या गाडीला धडक दिली?”
“नाही. सौम्या वेडेपणा करू नको पियुषच्या गाडीला धडक दिली तो तोंडवळकर होता पण कीर्तीकर ची समजूत अशी झाली की त्याच्या ड्रायव्हरने धडक दिली” पाणिनी म्हणाला
“अरे बापरे ! गंमतच आहे सगळी. बर पुढे काय झालं?”
“कीर्तीकर ने त्याच्या विमा कंपनीशी संपर्क केला. विमा कंपनीचा जो प्रतिनिधी कीर्तीकरला भेटला तो एकदम तरुण आणि नव्याने नोकरीला लागलेला आणि मी काहीतरी करून दाखवणार आहे माझ्या वरिष्ठांना अशी इच्छा असणारा माणूस असणार. त्यांने नुकत्याच घडलेल्या अपघाताची माहिती पोलिसांकडून मिळवली आणि त्याच्यात जखमी झालेल्या माणसाला कुठल्या हॉस्पिटलमध्ये ठेवले याची माहिती त्याने काढली आणि तिथे त्याला भेटायला गेला.”
“पण सर ती माहिती विमा कंपनीच्या माणसाने कशाला मिळवायला पाहिजे होती? कीर्तीकर ला,....”
सौम्या काहीतरी बोलणार होती, पण तिलाच स्वतःच्या प्रश्नाचे उत्तर सुचलं आणि ती गप्प बसली.
“ बरोबर आहे सर कीर्तीकरच्या ड्रायव्हरने त्याला अपघाताची पूर्ण माहिती दिली नव्हती ना त्यामुळे विमा कंपनीच्या माणसाला तो माहिती पुरवू शकला नाही म्हणून विमा कंपनीच्या माणसाने त्याच्या स्त्रोतातून अपघाताची आणि कुठल्या हॉस्पिटलमध्ये पियुष ला ठेवले त्याची माहिती काढली आणि त्याला भेटायला तो तिथे गेला. बरोबर आहे ना सर?”

“अगदी बरोबर आहे सौम्या. आता गंमत बघ कशी झाली मी कीर्तीकरशी बोलल्यानंतर लगेचच तो त्याच्या गाडीत बसून इथे आपल्या ऑफिसमध्ये आला आणि माझी वाट बघत बसला. म्हणजे तू इथे आलीस तेव्हा तो ऑफिसमध्ये वाटच बघत बसला होता. तुझ्याशी बोलल्यानंतर तो खाली गेला आणि त्याने त्याच्या ड्रायव्हरला,परबला, जायला सांगितलं तो नंतर निघून गेला. आणि आता त्या ड्रायव्हरचा खून झालाय.”
“बरोबर आहे सर घटनाक्रम असाच आहे” सौंम्या म्हणाली

“त्या विमा कंपनीच्या विषयात मी एवढा गुंतलो की ह्या खुनाच्या विषयाचा सुद्धा मला विसर पडला सौम्या. पोलीस कसे काय अजून आले नाहीत आपल्यापर्यंत मला समजत नाहीये” स्वतःशी पुटपुटल्यासारखा पाणिनी म्हणाला
“आपण एक काम करू सौम्या, आपण दोघे बाहेर पडू आणि घटनास्थळी जाऊ आणि जरा बघू की तिथे आसपास पोलिसांच्या गाड्या दिसतायेत का. एकंदरीत काय चाललय तिथे. अजूनही आपल्याला तिथे पोलिसांच्या गाड्या दिसल्या तर मग आपण अंदाज बांधू शकतो की अजूनही ते मायरा कपाडियाची चौकशी करत आहेत. जर तिथे पोलिसांच्या गाड्या नसतील तर आपल्याला तिथे जवळपास बघे लोक भेटतीलच आपण अशा लोकांशी बोलून काय घडलं याचा जरा अंदाज घेऊ. चल सौम्या निघू.”
बोलता बोलता पाणिनीने सौंम्याचा हात धरून तिला बाहेर काढलं. कॉरिडॉर मधनं जाताना वाटेत कनक च्या ऑफिसमध्ये पाणिनी डोकावला.
“कनक, आम्ही निघतोय जरा बाहेर. नवीन काही माहिती मिळाली?”
“हाय पाणिनी! अचानक परत बाहेर चालला आहेस? आत्ताच आला होतास ना तू बर ते असू दे मला तुझा ड्रायव्हर मित्र जयद्रथ परब याच्याबद्दल माहिती मिळाली आहे.”
“काय माहिती मिळाली?”
“की तो ब्लॅकमेलर आहे माझ्या एका माणसाने परब च्या मित्राशी संपर्क केला. म्हणजे त्याचा तो खास मित्र वगैरे नाहीये पण एक ओळखीचा म्हणू आपण त्या माणसाने माझ्या हेराला सांगितलं की परब जरी ड्रायव्हर म्हणून नोकरी करत असला तरी ती समाजाला दाखवण्यासाठी म्हणजे त्याच्यावर कोणाचा संशय येऊ नये यासाठी प्रत्यक्षात त्याच्या उत्पन्नाचे साधन म्हणजे ब्लॅकमेलिंग हेच आहे हे कळल्यावर माझ्या माणसानं थोडा आणखीन तपास केला तेव्हा त्याला सांगण्यात आलं की आता एवढ्यात परब कोणालातरी जबरदस्त ब्लॅकमेलिंग करत होता”.
पाणिनीने सौम्याकडे सहेतुक बघितलं आणि कनकला विचारलं,
“ एखाद्या बाईला?”
“ते अजून मला समजलं नाहीये पण ती बाई असेल तर ती बऱ्यापैकी पैसे वाली बाई असणार कारण मला समजल्यानुसार परब कडे सध्या बऱ्यापैकी रोख रक्कम खिशात खुळखुळत होती.”
“चांगली माहिती काढलीस कनक. अजून जेवढी माहिती मिळेल तेवढं काम चालू ठेव.”
“त्या कीर्तीकरचं काय? त्याच्यावर पण माणसं लावलेत मी ती तशीच ठेवू?” कनक न विचारलं
“नको माझं मत बदललय जरा. त्याच्यावर नेमलेली माणसं काढून घे. त्याला जे काय करायचे ते मोकळेपणांनी करू दे. पुढच्या एक-दोन दिवसात मी त्याला भेटणारच आहे. माझी भेट झाल्यावर त्याच्या लक्षात येईल की स्वतः ला फार मोठा धक्का बसलाय.”
“आणखीन काय सेवा करू तुझ्यासाठी पाणिनी?”
“त्या रिव्हॉल्व्हरची माहिती तुला काही मिळाली का? आज रात्रीपर्यंत मला ती माहिती मिळेल अशी अपेक्षा आहे तुझ्याकडून.”
“पाणिनी त्या उदक प्रपात कंपनीकडे मी माझा दुसरा माणूस पाठवतोय रिव्हॉल्व्हरची माहिती काढायला. मिळाली की तुला देतो.” कनक म्हणाला आणि पाणिनीने त्याचा निरोप घेतला.
सौम्याला घेऊन पाणिनी खाली उतरला आणि आपल्या गाडीच्या दिशेने निघाला.
“मी चालवू का गाडी सर?”
“नको. मी चालवतो” पाणिनी म्हणाला आणि सौम्या शेजारी बसल्यानंतर त्यांन गाडी सुरू केली.
“ सौंम्या, मी हळूहळू गाडी चालवतोय तिथे किती पोलिसांच्या गाड्या आहेत? काय चाललंय त्याच्याकडे जरा लक्ष ठेव.” पाणिनी तिला म्हणाला. थोड्याच वेळात ते घटनास्थळी पोचले.

 

“साध्या खाजगी गाड्या दिसतात मला पण पोलिसांची एकही गाडी दिसत नाहीये तिथे.” सौम्या म्हणाली “पोलिसांची गाडी असेल तर लाल दिव्याची असेल का सर?”
“हो लाल दिव्याची असेल. अरे खरंच की ! सौम्या, एकही गाडी दिसत नाहीये पोलिसांची मला पण. आश्चर्य आहे तिथल्या आसपासचे लोक एवढ्या लवकर शांत झाले असतील असं वाटत नाही” पाणिनी म्हणाला. आणि त्यांनी आपली गाडी अगदी सावकाश चालवत थोडी पुढे नेऊन बंद केली. रांगेमध्ये पसरलेली गॅरेज एकदम शांत आणि अंधारी होती रस्त्यावरच्या दिव्यांचा जेवढा उजेड येत होता तेवढाच गॅरेजमध्ये दिसत होता
“ए सौंम्या थांब काहीतरी गडबड आहे इथे” पाणिनी म्हणाला.
“काय झालं सर?”
“काय आहे कळत नाही पण काहीतरी प्रचंड गोंधळ आहे इथे” पाणिनी म्हणाला आणि बोलता बोलता त्याने आपली गाडी वळवली आणि गाडीचे हेडलाईट चा उजेड गॅरेज मध्ये पडेल अशा पद्धतीने गाडी लावली. गाडी मधली टॉर्च घेऊन पाणिनी खाली उतरला त्याने बघितलं तर गॅरेजदार बंद होतं पण त्याला कुलूप नव्हतं गॅरेज दार ढकलून त्याने आपल्या हातातील टॉर्च उजेड गॅरेजच्या आतल्या भागात टाकला. अचानक पळत येऊन तो आपल्या गाडीत बसला आणि हातात टॉर्च मागच्या सीटवर फेकली गाडी पटकन वळवली 
“काय झालंय सर?” सौम्यान घाबरून विचारलं
“जे जे वाईटात वाईट घडू शकते ते झालंय आपण अडकलोय.”


प्रकरण १० समाप्त

 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel