सावध 

 

प्रकरण २०

 

पाणिनी उठला आणि प्रश्न विचारायला तारकरकडे गेला. “ तुला काय माहीत की मी पॅकिंग कंटेनर मधून इमारतीच्या बाहेर पडलो?”

 

“ मी माझा मुद्दा स्पष्ट करतो. मी स्वतः तुला कंटेनर मधे बसताना किंवा त्यातून बाहेर पडताना पाहिलं नाही.मी जे पेपरात वाचलं किंवा मला जे सांगण्यात आलं त्यावरून मी ते उत्तर दिलं.”

 

“ मला कंटेनर मधे बसतांना ज्याने पाहिलं अशा एखाद्याशी तू बोललास का?” पाणिनी म्हणाला.

 

“ नाही.” तारकर म्हणाला.

 

“ मग मी कंटेनर मधून बसून बाहेर पडलो असं वाटायचं तुला काय कारण होतं?”

 

“ कारण तो एकमेव मार्ग होता तुझ्यासमोर, पोलिसांना गुंगारा देऊन बाहेर पडण्याचा.” तारकर म्हणाला.

 

“ वस्तुस्थिती अशी होती तारकर की मी संध्याकाळी उशिरा पर्यंत कनक ओजस च्या ऑफिसात बसून होतो.अगदी तो कंटेनर बाहेर नेला गेला त्यानंतर सुध्दा बराच वेळ. तू आमच्या लिफ्टमन ला विचारलस तर तो ही माझ्या म्हणण्याला समर्थन देईल कारण त्याच्या बरोबरच मी खाली उतरलो.माझ्या बरोबर तेव्हा कनक चा सहाय्यक जयराज राठोड हा होता.तो अत्ता इथे कोर्टात हजर आहे.तू त्याला विचारू शकतोस. ” पाणिनी म्हणाला

 

तारकर गप्प राहिला.

 

“ माझे प्रश्न झालेत.” पाणिनी म्हणाला

 

तारकर आणि खांडेकरांनी एकमेकांकडे बघितलं. “जयराज राठोड आहे इथे ?” खांडेकरांनी विचारलं.

 

जयराज राठोड उठून उभा राहिला. “मी इथे आहे.” हात वर करून खांडेकरांना उद्देशून तो म्हणाला.

 

“ मी इन्स्पे.होळकर ला बोलावतो आणि हे सर्व स्पष्ट करून सांगतो.” खांडेकर म्हणाले.

 

इन्स्पेक्टर होळकर साक्षीदाराच्या पिंजऱ्यात येऊन उभा राहिला त्याने त्याचं नाव पत्ता आपलं पद कामाचं स्वरूप हे सगळं कोर्टासमोर सांगितल्यावर खांडेकरांनी त्याला प्रश्न विचारायला सुरुवात केली

 

"सहा तारखेच्या संध्याकाळी गुरुवारी तू कुठे होतास तुला आठवतंय?"

 

"हो मला पक्का आठवते त्या दिवशी संध्याकाळी मी पाणी मी पटवर्धन याला रिसॉर्टवर शोधून काढलं. रुद्रांश गडकरी नावाचा साक्षीदार मी तिथे माझ्याबरोबर घेऊन गेलो होतो"

 

"तिथे काय घडलं ते जरा सविस्तर सांग आणि तुझ्यासमोर प्रत्यक्ष जे घडलं ते सांग"खांडेकर म्हणाले

 

"पटवर्धन वकील त्या रिसॉर्टवर असल्याची बातमी आम्हाला मिळाल्यानंतर आम्ही त्या रिसॉर्टवर पोहोचलो तिथे वर्तमान पत्राचे बातमीदार आणि फोटोग्राफर आधीच आलेले होते आम्ही गाडीत न उतरता उतरतात त्यांनी आम्हाला गराडा घातला आणि आमचे फोटो घ्यायला सुरुवात केली मिस्टर पाणिनी पटवर्धन जे बंगला नंबर सहा मध्ये आहेत अस आम्हाला कळलं होतं, ते त्या बंगल्यात ना बाहेर येताना दिसले. जेव्हा त्यांना कळलं की पत्रकार आणि फोटोग्राफर्स यांनी त्या ठिकाणी गराडा घातला आहे त्यांनी त्याच्या डोक्यावरची टोपी आपल्या चेहऱ्यावर ओढून घेतली आणि फोटोग्राफर पासून लपवायचा प्रयत्न केला पण तरीसुद्धा काही फोटोग्राफरनी त्याचे फोटो काढलेत जेव्हा आपण त्याच्यात पकडले गेलो असे त्याच्या लक्षात आलं तेव्हा पटवर्धन पुन्हा वळले आणि आपल्या बंगला नंबर सहा मध्ये जायला लागले."

 

"बंगला नंबर सहा पर्यंत जाऊन तू त्यांचा पाठलाग केलास?"

 

"नाही केलं तसं काही कारण त्याची काही गरज नव्हती माझ्याबरोबर साक्षीदार रुद्रांश गडकरी तिथे होता. पटवर्धन जेव्हा त्या बंगल्यातून बाहेर पडले तेव्हा गोष्टींनी त्यांना बघितलं होतं त्याला चालताना उभे राहिलेले अवस्थेत त्यांना पाहिलं होतं आणि अगदी नि: संधीग्धपणे त्यांना त्यांनी ओळखलं म्हणजे मायरा गॅरेजच्या बाहेर दिसलेला तोच माणूस आहे असं त्यांनी ओळखलं." इन्स्पेक्टर होळकर म्हणाला

 

"हे चुकीच आहे .पुरावा आहे. साक्षीदाराने जी ओळख पटवली आहे ती स्वतः साक्षीदार यांना येऊन इथे सांगितली पाहिजे" न्यायाधीश म्हणाले

 

"ऐकीव पुरावा नाही साक्षीदार आणि ओळख पटवताना तो काय म्हणाला ते मी स्वतः ऐकलं आहे."होळकर म्हणाला

 

"अहो इन्स्पेक्टर यालाच ऐकीव पुरावा म्हणतात तुम्हाला रिसॉर्टच्या दारात दिसलेला माणूस म्हणजे पाणिनीपटवर्धन होता की नाही हे तुम्हा स्वतःला माहित नाहीये साक्षीदार काय म्हणाला ते तुम्ही सांगताय ते उपयोगाचे नाही ते संबंधित साक्षीदारांना सांगितलं पाहिजे."न्यायाधीश म्हणाले

 

"सांगेल सांगेल साक्षीदार ही स्वतः तसंच सांगेल माझा पुढचा साक्षीदार तोच आहे मिस्टर रुद्रांश गडकरी "घाई घाईने खांडेकर उद्गारले.

 

"मग आवर्ती घ्या या साक्षीदाराची साक्ष आणि रुद्रांश गडकरी यांना बोलवा"न्यायाधीश म्हणाले.

 

आपली साक्ष संपली म्हणून इन्स्पेक्टर होळकर पिंजऱ्यातून बाहेर जायला निघाला.

 

"एक मिनिट एक मिनिट" पाणिनी म्हणाला. "मला होळकर ना दोन-तीन प्रश्न विचारायचे आहेत" पाणिनी म्हणाला

 

"होळकर तुम्हाला गेली अनेक वर्ष ओळखतो आहेस मला तुला असं विचारायचं मी त्या रिसॉर्ट मधल्या बंगला नंबर सहा मधून बाहेर पडलो तेव्हा तू रुद्रांश गडकरी ला असं म्हणालास का हा बघा पाणिनी पटवर्धन किंवा तशा आशयाचं काहीतरी?" 

 

"मला असं काही बोलण्याची गरज पडली नाही कारण त्यांनी तुम्हाला बंगल्यातून बाहेर पडताना बघितल्याच ओळखलं."

 

"जो माणूस रिसॉर्ट मधल्या बंगल्यातून बाहेर पडला त्याच्या डोक्यावर टोपी होती आणि ती चेहऱ्यावर ओढली होती?" पाणिनी म्हणाला.

 

"तुमच्या चेहऱ्यावर टोपी होती आणि फोटोग्राफर ना स्वतःचा चेहरा दिसू नये म्हणून तुम्ही चेहरा झाकला होता."

 

"त्यानंतर त्या माणसाने तुमच्याकडे पाठ फिरवली आणि परत तो बंगल्याच्या दिशेने जायला लागला?"

 

"तुम्ही नेमकं तसंच केलं बरोबर." होळकर म्हणाला

 

"फोटोग्राफर दिसल्यावर त्यांच्याकडे पाठ फिरवून पुन्हा तो माणूस जेव्हा आपल्या बंगल्याकडे जायला लागला तेव्हा तो बंगल्यापासून किती अंतर आला होता?" पाणिनी म्हणाला.

 

"साधारण 30 ते 40 फूट असेल"

 

"खूप फोटोग्राफर होते त्या ठिकाणी?" पाणिनी म्हणाला.

 

"हो खूप होते"

 

"तुला हे काय माहिती की ते प्रेस चे फोटोग्राफर होते?"

 

"जेव्हा मला वर्तमानपत्र वाल्यांकडूनच टीप मिळते की पाणिनी पटवर्धन त्या बंगल्यात उतरला आहे आणि मी तिथे गाडी घेऊन जातो आणि गाडीतून उतरताना जेव्हा फोटोग्राफर माझ्या भोवती गराडा घालून माझे फोटो काढायला सुरुवात करतात,तेव्हा मी अजून वेगळे काय समजायचं?"होळकरने प्रतिप्रश्न केला

 

"तिथे जे फोटोग्राफर जमले होते त्यांना तू पुन्हा बघितलास तर ओळखू शकशील?"

 

"तसं मी वैयक्तिक नावाने कोणाला ओळखत नव्हतो पण चेहऱ्याने ओळखू शकेन"होळकर म्हणाला

 

"त्या प्रत्येकाचा चेहरा तू व्यवस्थित बघितला होतास? या कोर्टात त्याच्यातला एखादा फोटोग्राफर आता हजर असेल तर त्याला तू ओळखशील?" पाणिनी म्हणाला.

 

"नाही म्हणजे तसे मला सगळ्यांचे चेहरे नीट दिसले नाहीत कारण माझ्यासमोर सगळे फोटोग्राफर इतके पटापट फोटो काढत होते की त्या दिव्यांनी माझे डोळे दिपले होते."

 

"हो म्हणजे तुझे डोळे दिपले होते!"

 

"पण एवढे नव्हते की मी तुम्हालाही ओळखू शकणार नाही."सावध होऊन होळकर न उत्तर दिलं

 

"बर, इतर माणसांचं काय त्यांचं वर्णन करू शकतोस तू?" पाणिनी म्हणाला.

 

"माझ्या अगदी जवळ एक फोटोग्राफर होता जो पुढे आला आणि सगळ्यात पहिल्यांदा माझा फोटो त्यांना घेतला त्याच्या अंगात काळा शर्ट होता."

 

"काय वय असेल त्याचं अंदाजे?"

 

"मी माझ्या डोळ्याच्या कडेने त्याच्याकडे बघितलं. असा तरुणच होता. नेमकं वय नाही सांगता येणार" होळकर म्हणाला

 

"किती उंच होता?"

 

"साधारण तुमच्या एवढा उंच असेल, मिस्टर पटवर्धन."

 

"त्याची देहयष्टि कशी होती?"

 

"तुमच्यासारखाच होता."

 

"त्याचं आणि तुझं बोलणं झालं?"

 

"नाही बोलणं नाही झालं प्रत्यक्षात, तो माझ्या शेजारी उभा होता तरीपण माझे लक्ष तुमच्याकडे होतं म्हणजे तुम्ही तुमच्या बंगल्यातून बाहेर पडला त्याकडे."होळकर ने उत्तर दिलं

 

"तुझ्या शेजारी उभ्या असणाऱ्या आणि माझ्या सारख्याच दिसणाऱ्या माणसाने तुझा फोटो घेतला असं तू म्हणालास त्यावेळेला तू काय करत होतास आठवतय तुला?" पाणिनी म्हणाला.

 

"माझी गाडी तिथे थांबल्या थांबल्या तो माणूस तिथे आला होता मी गाडीचं इंजिन आणि लाईट बंद करत होतो तेवढ्यात त्याने माझा फोटो घेतला."

 

"होळकर मी तुला एक फोटो दाखवतो आणि मला सांग तुझ्या शेजारी उभ्या असणाऱ्या माणसाने घेतलेला हा फोटो आहे ना. या फोटोत रुद्रांश गडकरी सुद्धा दिसतो आहे" पाणिनी म्हणाला

 

"हाच फोटो आहे तो त्या माणसाने घेतलेला."

 

"हा फोटो घेत असताना त्याच्या कॅमेऱ्याचा फ्लॅश लाईट तुझ्या डोळ्यावर पडला आणि डोळे दिपले नाहीत त्यामुळे तुझे?" पाणिनी म्हणाला.

 

"माझे डोळे उत्तम आहेत अशा उजेडामुळे अजिबात दिपले नाहीत आणि तुम्ही मला तुमच्या खोली मधून बाहेर आलेले आणि परत आत गेलेले व्यवस्थित दिसत होतात" होळकर म्हणाला प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देताना तो खूपच सावध होता असं दिसत होतं.

 

"तुझ्या शेजारी उभ्या असणाऱ्या माणसांना तुझा फोटो काढत असतानाच तुझ्या गाडीच्या अगदी समोर आणखीन एक फोटोग्राफर उभा होता बरोबर आहे की नाही?"

 

"हो.होता. पण तुम्ही आता असं सिद्ध करायचा प्रयत्न करू नका की गाडीच्या समोर असलेल्या त्या फोटोग्राफरच्या कॅमेऱ्याच्या फ्लॅश लाईट मुळे मला पुन्हा दिसलं नाही."होळकर म्हणाला.

 

"नाही नाही मी असलं काही सिद्ध करायचं प्रयत्न करत नाहीये मी एवढंच जाणून घ्यायचा प्रयत्न करतोय की कुठल्या क्रमाने फोटो घेतले गेले तुझे."

 

"हां मग ठीक आहे" होळकर म्हणाला

 

"आता तुला मी आणखीन फोटो दाखवतो जो फोटो गाडीच्या समोरच्या बाजूंनी घेतला गेलाय त्याच्यामध्ये तू ही दिसतो आहेस,तुझा साक्षीदार रुद्रांश गडकरी दिसतो आहे आणि तुझ्या शेजारी उभा असणारा एक फोटोग्राफर ज्याने तुझा सगळ्यात पहिला फोटो घेतला तोही दिसतो आहे."

 

"बरोबर आहे. हाच फोटो आहे तो."

 

"ठीक तर मग हे दोन्ही फोटोग्राफ आपण बचाव पक्षाचा पुरावा क्रमांक एक आणि पुरावा क्रमांक दोन म्हणून नोंदवून घेऊ" पाणिनी म्हणाला

 

कोर्टाच्या क्लार्कने आपल्याकडे तशी नोंद करून घेतली.

 

"तर मग साधारण त्याच वेळेला इतर फोटोग्राफर सुद्धा तिथे होते, की जे, खोलीतून बाहेर येणाऱ्या माणसाचे फोटो काढत होते?" पाणिनी म्हणाला.

 

"माझा गोंधळ घालण्याचा प्रयत्न करू नका पटवर्धन आम्ही ज्या वेळेला तिथे पोहोचलो, त्यावेळेला सर्व फोटोग्राफर आमच्या भोवती जमा झाले आणि त्यांनी आमचे फोटो काढले ते आमचे फोटो काढत होते त्यावेळेला तुम्ही तुमच्या खोलीतून बाहेर आलेला नव्हता. तुम्ही त्यानंतर काही मिनिटांनी बाहेर आलात आणि ज्या वेळेला तुम्हाला दिसलं की सगळे फोटोग्राफर आता आपले फोटो काढणार त्यावेळेला घाबरून तुम्ही परत आपल्या खोली मध्ये निघून जायला निघालात. पण त्याच वेळी माझ्या साक्षीदाराने तुम्हाला बरोबर ओळखलं होतं तुम्हाला बघायची पुरेशी संधी त्याला मिळालेली होती."होळकर सावधपणे म्हणाला

 

"आणि तिथे जमलेल्या फोटोग्राफरने त्या बाहेर पडणाऱ्या माणसाचे पण फोटो घेतले?". पाणिनी म्हणाला.

 

"हो. म्हणजेच तुमचे फोटो घेतले."

 

"होळकर, मी तुला आणखीन एक फोटो दाखवतो आणि तो फोटो तू ओळखलास की तो बचाव पक्षाचा पुरावा नंबर तीन म्हणून आपण नोंदवून घेऊ हा पहा फोटो या फोटोमध्ये एक माणूस खोली मधून बाहेर पडताना दिसतो आहे. त्याच्या डोक्यावर टोपी आहे आणि ती त्यांनी खूप खाली ओढून घेतल्ये,त्याचा चेहरा त्याच्यात बराचसा झाकला गेलाय."

 

"बरोबर हाच फोटो आहे हा तुम्ही तुमच्या खोलीतून बाहेर येत असताना हा फोटो घेतला गेला आहे." होळकर म्हणाला.

 

"तर मग हा फोटोग्राफ बचाव पक्षाचा पुरावा नंबर तीन म्हणून आपण नोंदवून घेऊ. आता तुला चौथा फोटो दाखवतो तो बंगल्याच्या खोलीतून बाहेर येणाऱ्या माणसाचाच आहे पण तो एक एका वेगळ्या कोनातून घेतला गेलाय. त्यामुळे या फोटोत बंगल्यातून बाहेर येणारा माणूस तर दिसतोच आहे त्याशिवाय फोटोग्राफ क्रमांक तीन ज्या फोटोग्राफरने घेतलाय तो फोटोग्राफर सुद्धा या फोटो दिसतो आहे."

 

होळकर ने हा चौथा फोटो नीट निरखून पाहिला. पाणिनी पटवर्धन जे म्हणतो आहे ते त्याला पटलेलं दिसलं 

 

"बरोबर आहे तुम्ही म्हणता तसाच हा फोटो घेतला आहे."

 

"हा फोटो क्रमांक चार बघताना तुझ्या एक लक्षात आलं का होळकर, की फोटो क्रमांक तीन पेक्षा या फोटो क्रमांक चार मध्ये पळणाऱ्या माणसाची देहयष्टी अधिक स्पष्ट दिसते आहे?" पाणिनी म्हणाला.

 

"बरोबर आहे तुम्ही म्हणता आहात ते."

 

"आता आपण फोटोग्राफ क्रमांक पाच बघू, यामध्ये बंगल्यातून बाहेर येणारा आणि डोक्यात टोपी असलेला माणूस तर दिसतो आहेच याशिवाय फोटो क्रमांक तीन आणि चार ज्या फोटोग्राफरने घेतले ते दोन फोटोग्राफर सुद्धा या फोटो दिसत आहेत." पाणिनी म्हणाला

 

"बरोबर आहे." फोटो नीट बघत होळकर म्हणाला.

 

"परत एकदा नीट बघ ते फोटो होळकर. त्या फोटोतल्या माणसाची शरीर यष्टी ही अधिक स्पष्ट दिसते आहे तुला असं वाटतंय की तो फोटो माझा आहे? म्हणजे त्या फोटोतील व्यक्ती म्हणजे मी आहे?" पाणिनी म्हणाला.

 

होळकर अचानक सावध झाला त्याने तो फोटो पुन्हा हातात घेतला " थांबा मला जरा चष्मा लावून बघू दे." असं म्हणून त्याने डोळ्याला चष्मा लावला

 

"अहो पटवर्धन काय गडबड आहे काहीतरी तुम्ही दगाबाजी केल्ये या फोटोत.हा फोटो तुमचा नाहीये." होळकर ओरडून म्हणाला.

 

"म्हणजे तुला असं म्हणायचं आहे की या शेवटच्या फोटोग्राफ मध्ये बंगल्याच्या खोलीतून बाहेर येताना दिसत असलेला माणूस म्हणजे मी नाहीये?" पाणिनी म्हणाला

 

"मला हेच म्हणायचंय की हे फोटो ओरिजनल नाहीये तुम्ही काहीतरी छेडछाड केली त्यात"

 

"तुझ्या गाडीच्या अगदी जवळ उभा असणारा माणूस ज्याने फोटो क्रमांक एक घेतला जो आपण पुरावा म्हणून नमूद केला आहे त्या माणसाचा फोटो पुरावा नंबर दोन मध्ये आला आहे आता मला नीट बघून सांग की तो माणूस माझ्यासारखा दिसतो की नाही !" पाणिनी म्हणाला

 

"थांबा ही काय गडबड आहे सगळी मला ते सगळे फोटो बघायचे आहेत."खांडेकर ओरडले

 

"ही सगळी खोटी आणि बनावट फोटोग्राफी आहे" होळकर ओरडला

 

"तू इथे जे विधान करतो आहेस ते शपथ घेऊन करतो आहेस होळकर शिवाय माझ्याकडे सहा साक्षीदार आहेत ते तिथे काय काय घडलं आणि कुठल्या क्रमाने घडले ते सांगायला तयार आहेत उलट पक्षी तूच मला सांग या फोटो तुला असं नेमकं काय आढळलं की ज्याच्यावरूनही फोटोग्राफी बनावट आहे असं तुझं म्हणणं आहे?" पाणिनी म्हणाला.

 

"तंत्रज्ञानाच्या दृष्टीने मला फोटोग्राफी मधलं फारसं काही कळत नाही पण मलाही माहिती आहे की ती खोटी फोटोग्राफी आहे कारण त्या क्रमाने सर्व गोष्टी घडलेल्या नाहीत."

 

"वस्तुस्थिती अशी आहे होळकर की तू जेव्हा गाडीतला उतरलास तेव्हा तिथे जमलेल्या फोटोग्राफरनी त्यांचे कॅमेरे सरसावून तुझे इतके फटाफट फोटो काढले की त्या कॅमेराच्या फ्लॅश लाईट मुळे तुझे डोळे दिपले आणि थोड्याशा अंधारात तुझ्या गाडीच्या बाजूला तुझ्या जवळच कोण उभं होतं हे तुला नीट दिसू शकले नाही. याचा आणखीन एक कारण म्हणजे तुझं लक्ष त्या बंगल्याच्या दारातून पळत बाहेर येणाऱ्या डोक्यात टोपी घातलेल्या माणसाकडे होतं ”.

 

“त्या टोपी मुळे आणि तुझे डोळे दिपल्यामुळे त्या माणसाचा चेहरा सुद्धा तुला नीट दिसला नाही बरोबर आहे की नाही मी म्हणतो ते? नीट आठवून सांग त्या माणसाचा चेहरा तुला दिसला होता की फक्त त्याच्या देहयष्टीवरून तू अंदाज केलास?" पाणिनी म्हणाला.

 

साक्षीदाराला काय बोलावं ते सुचेना. तो गप्प बसून राहिला.

 

"नुसता गप्प बसून तुमची मूक संमती आहे असं कोर्ट गृहीत धरणार नाही प्रश्नाचे उत्तर द्या" न्यायाधीश म्हणाले

 

साक्षीदाराचा नाईलाज झाला

 

"हो मान्य आहे मला की बंगल्याच्या खोलीतून बाहेर पडणाऱ्या माणसाचा चेहरा मला नीट दिसला नाही पण ज्या पद्धतीने तो माणूस चालत होता त्यावरून आणि आम्हाला जे सांगण्यात आलं होतं त्यावरून ते पाणिनी पटवर्धनच होते." 

 

"मला अगदी तेच म्हणायचं आहे तुझी अशी अपेक्षा होती की त्या बंगल्याच्या खोलीत ना बाहेर पडणारा माणूस म्हणजे मी म्हणजे पाणीनी पटवर्धन असणार त्यामुळे ही गोष्ट मनात ठेवूनच तू चाललास."

 

"हे सगळे फोटोग्राफ पुरेसे बोलके आहेत असं माझं मत आहे"न्यायाधीश म्हणाले.

 

"हा पवार मोठा बनाव रचला गेला आहे साक्षीदाराचा गोंधळ उडवण्यासाठी"खांडेकर चिडून म्हणाले.

 

"हो मी युक्ती वापरली हे मी कबूल करतो पण ती युक्ती साक्षीदाराला फसवण्यासाठी नव्हती. प्रामाणिक साक्षीदार या युक्तीला फसला नसता. वस्तुस्थिती अशी झाली होती की होळकर चे डोळे सतत उडणाऱ्या कॅमेऱ्याच्या फ्लॅश मुळे दिपले गेले होते पण हे तो प्रामाणिकपणे कबूल करायला तयार नाही. बंगल्यातून बाहेर पडणारा माणूस त्याला मी वाटलो पण प्रत्यक्षात तो माणूस मी नव्हतो तो राठोड होता आणि फोटो क्रमांक एक मधला फोटो ज्या फोटोग्राफरने काढला तो फोटोग्राफर म्हणजे मीच होतो. मीच होळकर च्या गाडीच्या बाजूला थोड्याशा अंधाऱ्या जागेत उभा होतो." पाणिनी म्हणाला

 

होळकर सा चेहरा रागाने लालबुंद झाला आपला झालेला पराभव त्याला मनातलं सहन झाला नाही. त्याला सावरून घेण्यासाठी खांडेकर आक्षेप घ्यायला लागले परंतु न्यायाधीशांनी त्याला गप्प बसवलं

 

"आता माझ्या प्रश्नाचे उत्तर दे होळकर." पाणिनी म्हणाला

 

"माझं उत्तर हे आहे की मला सांगता येणार नाही की बंगल्याच्या खोलीतून बाहेर पडलेला माणूस म्हणजे पटवर्धन होते किंवा नाही."

 

"होळकर यांची उलट तपासणी घेऊन झाली माझी. मला आणखीन काही विचारायचं नाही. 

 

( प्रकरण २० समाप्त.)

 

 

 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel