धर्मानंद कोसंबी
आचार्य धर्मानंद दामोदर कोसंबी (ऑक्टोबर ९, १८७६ - जून २४, १९४७; सेवाग्राम, ब्रिटिश भारत) हे एक बौद्ध धर्माचे व पाली भाषेचे अभ्यासक व मराठी लेखक होते. यांनी श्रीलंकेत जाऊन तेथील विद्योदय विद्यापीठात बौद्ध धर्माचा व तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला. तसेच म्यानमारात (ब्रम्हदेशात) जाऊन त्‍यांनी बर्मी भाषेतील बौद्ध साहित्याचा तौलनिक अभ्यास केला. मराठी गणितज्ञ व इतिहासकार दामोदर धर्मानंद कोसंबी हे त्‍यांचे पुत्र, आणि डॉ. मीरा कोसंबी या त्यांच्या नात होत.
जातक कथासंग्रह

ज्ञानदेवांनी सातशे वर्षांपू्र्वी भागवत धर्माचा पाया रचला, त्याप्रमाणे बौद्ध धर्माचा पाया आचार्य धर्मानंद कोसंबी यांनी रचला आहे. बौद्ध धर्म दोन हजार वर्षांपेक्षा अधिक कालपर्यंत निम्म्या मानवी जगात प्रचलित असूनही त्याला पुन्हा नवा पाया देण्याचे आवश्यक कार्य धर्मानंदांनी केले आहे.

बुद्ध व बुद्धधर्म

धर्मानंद कोसंबी यांनी लिहिलेले बुद्ध व बुद्धधर्माचे विवेचन

लघुपाठ

धर्मानंद कोसंबी लिखित बुद्ध साहित्य

भगवान बुद्ध

गौतम बुद्धांचे चरित्र

पार्श्वनाथाचा चातुर्याम धर्म

पार्श्वनाथाचा चातुर्याम धर्म

भगवान बुद्ध (उत्तरार्ध)

गौतम बुद्धांचे चरित्र

भगवान बुद्ध (पूर्वार्ध)

गौतम बुद्धांचे चरित्र

सुत्तनिपात

धर्मानंद कोसंबी ह्यांनी सुत्तनिपात ह्या ग्रंथाचें मराठी भाषांतर विविधज्ञानविस्ताराच्या ६८ व्या वर्षाच्या (१९३७ च्या) अंकांत क्रमश: छापून काढलें

हिन्दी संस्कृति आणि अहिंसा

धर्मानंद कोसंबी लिखित हिन्दी संस्कृति आणि अहिंसा याचे विवरण

बौद्धसंघाचा परिचय

धर्मानंद कोसंबी यांनी लिहिलेला बौद्धसंघाचा परिचय

समाधिमार्ग

समाधिमार्ग फार प्राचीन आहे. आळार कालाम आणि उद्दक रामपुत्त हे दोघे समाधिमार्गाचे पुरस्कर्ते होते, व त्यांचा पंथ कोसल देशात बुद्धसमकाली अस्तित्वात होता.

बुद्धलीला सारसंगह

बुद्धचरित्राच्या रूपाने पालिवाङमयाचे दिग्दर्शन. या ग्रंथाच्या योगे बौद्धांच्या मूळ ग्रंथासंबंधाने आमच्या सुशिक्षित वर्गातदेखील आढळून येणार्‍या कित्येक भ्रामक समजुती अंशत: तरी नष्ट होतील, अशी आशा बाळगणे अप्रस्तुत होणार नाही.

बुद्ध, धर्म आणि संघ

बुद्ध व बौद्धधर्म यावर धर्मानंद कोसंबी यांचा निबंध

गौतम बुद्ध

गौतम बुद्ध हे भारतीय तत्त्वज्ञ व बौद्ध धर्माचे संस्थापक होते. शाक्य गणराज्याचा राजा शुद्धोधन व त्यांची पत्‍नी महाराणी महामाया (मायादेवी) यांच्या पोटी इ.स.पू. ५६३ मध्ये लुंबिनी येथे राजकुमाराचा जन्म झाला. या राजकुमाराचे नाव 'सिद्धार्थ' असे ठेवण्यात आले. सिद्धार्थाच्या जन्मानंतर अवघ्या सातव्या दिवशीच त्यांची आई महामायाचे निधन झाले. आईचे छत्र हरवलेल्या सिद्धार्थाचा सांभाळ त्यांची मावशी व सावत्र आई महाप्रजापती गौतमीने केला. त्यामुळे राजकुमार सिद्धार्थाला 'गौतम' या नावानेही ओळखले जाते. राजकुमार सिद्धार्थ गौतमास आवश्यक असे सर्व शिक्षण देण्यात आले. यशोधरा या सुंदर राजकुमारीशी सिद्धार्थ गौतमाचा इ.स.पू. ५४७ मध्ये विवाह झाला व पुढे त्यांना राहुल नावाचा एक पुत्र झाला.

बामियानचे बुद्ध

बामियानचे बुद्ध हे चौथ्या आणि पाचव्या शतकात बनवलेल्या बुद्धांच्या दोन उभ्या मूर्त्या होत्या ज्या अफगाणिस्तान मधील बामियान शहरा जवळ स्थित होत्या. या काबुलच्या २३० किलोमीटर (१४० मैल) वायव्य दिशेवर आणि २५०० मीटर (८२०० फुट) उंचीवर होत्या. यातील, लहान मूर्ती इ. स. ५०७ मध्ये बांधली होती आणि मोठ्या आकाराची मूर्ती इ. स. ५५४ मधील होती. ह्या अनुक्रमे ३५ मीटर (११५ फूट) आणि ५३ मीटर (१७४ फूट) उंचीच्या होत्या. ह्या मूर्त्यांची गणना जगातील भव्य बुद्ध मूर्त्यां मध्ये होत असे.

बोधिसत्व

बोधिसत्व (बोधिसत्त्व) म्हणजे जगाच्या शांतीकरीता वा आनंदाकरीता कार्य करणारे व्यक्ती होय. ही बौद्ध धर्मातील एक संकल्पना आहे. 'बोधिसत्त्व' ह्या शब्दाचा मूळ अर्थ "ज्याला पुढे केव्हा तरी 'बोधी' म्हणजे ज्ञान प्राप्त होणार आहे असा" असाही होतो.

बौद्ध भिक्खू

बौद्ध भिक्खू

त्रिपिटक

त्रिपिटक हा बौद्ध धर्मीयांचा प्रमुख व महत्त्वाचा धर्मग्रंथ आहे. इ.स.पू. १०० ते इ.स.पू. ५०० या दरम्यान, मौर्य राजवंशाच्या कार्यकाळात या ग्रंथांची निर्मिती झाली. त्रिपिटक हा ग्रंथ पाली भाषेत लिहिला गेलेला एक ग्रंथसमूह असून तो तीन पेट्यांत किंवा हिश्श्यांत विभागला गेला आहे. त्रिपिटकाचे तीन विभाग — विनयपिटक, सुत्तपिटक व अभिधम्मपिटक. या तीन पिटकांमुळे या ग्रंथाला 'त्रिपिटक' हे नाव पडले.

बुद्ध वंदना

हंत सम्यक सम्बुद्ध भगवान अशा बुद्ध भगवंतास मी अभिवादन करतो. त्या बुद्ध भगवंतांनी उपदेशिलेल्या धम्मास मी नमस्कार करतो. सन्मार्गावर आरुढ झालेल्या भगवंतांच्या श्रावक संघास मी नमस्कार करतो. त्या भगवान अरहंत सम्यक सम्बुद्धास माझा नमस्कार असो. त्या भगवान अरहंत सम्यक सम्बुद्धास माझा नमस्कार असो. त्या भगवान अरहंत सम्यक सम्बुद्धास माझा नमस्कार असो.

जयमंगल अष्टगाथा
Featured

जयमंगल अष्टगाथा अर्थात भगवान बुद्धांचे आठ मोठे विजय ज्यांना Stanzas of Victory असेही म्हणतात. या जयमंगल अष्टगाथांचे बौद्ध तत्वज्ञानात खुप महत्व आहे. जयमंगल अष्टगाथा व त्यांच्या कथा या लेखमालिकेत आपण त्या आठ विजयांबद्दल सविस्तर माहीती, त्यांच्या गाथांमागे असलेल्या कथा काय आहेत ते पाहुया... त्या कथांमधुन तुम्ही योग्य तो बोध घ्यावा.....

बुद्ध जयंती

बुद्ध जयंती किंवा बुद्ध पौर्णिमा हा बौद्ध धर्मीयांचा सर्वात महत्त्वाचा सण व उत्सव आहे. हा सण जगभरात विशेषत: भारतात वैशाख पोर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी तथागत गौतम बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्‍ती व महापरिनिर्वाण या तीनही घटना झाल्या आहेत. आपल्या मानवतावादी आणि विज्ञानवादी बौद्ध धम्म सिद्धांतावरून तथागत बुद्धांना जगातील महान महापुरुष व गुरू मानले जाते. बौद्ध धर्मीयांची मोठ्या प्रमाणावर संख्या असणाऱ्या चीन, जपान,व्हियेतनाम, थायलंड, भारत, म्यानमार,श्रीलंका, सिंगापूर, अमेरिका, कंबोडिया, मलेशिया, नेपाळ, इंडोनेशिया या देशांसह सुमारे १८० देशांतील बौद्ध लोक हा सण उत्साहात साजरा करतात. यातील अनेक देशात बुद्ध जयंतीची सार्वजनिक सुट्टी असते. भारतात देखील बुद्ध पौर्णिमेनिमित्त सार्वजनिक सुट्टी असते.

विपश्यना

विपस्सना (पाली) किंवा विपश्यना (संस्कृत) ही गौतम बुद्ध यांनी सांगितलेली बौद्ध धर्माची ध्यान पद्धती आहे. प्रचलित अर्थाने विपश्यना या नावाने ही ध्यानपद्धती जगभरात प्रसिद्ध पावलेली आहे. बुद्धाने सांगितलेल्या तत्त्वज्ञानाचा महत्त्वाचा विषय म्हणजे हे ध्यान होय. पाली भाषेत "विपस्सना' शब्दाचा अर्थ "स्वतःच्या आत डोकावणे" असा होतो. गौतम बुद्धाने स्वतः या ध्यानपद्धतीचा अभ्यास करून; तिच्या आचरणाचे महत्त्व अनुभवून अंतर्ज्ञान प्राप्त केले आहे अशी धारणा आहे.

बोधिवृक्ष

बोधिवृक्ष किंवा महाबोधी वृक्ष म्हणजेच 'ज्ञानाचा वृक्ष' (Knowledge Tree) होय. बोधगया येथील महाबोधी विहाराच्या पश्चिमेला जो पिंपळ आहे, तोच महाबोधी वृक्ष या नावाने प्रसिद्ध आहे. या पिंपळाच्या वृक्षाखाली सिद्धार्थाला इ.स.पू. ५२८ मध्ये वयाच्या ३५ व्या वर्षी संबोधी (ज्ञान/बुद्धत्व) प्राप्ती होऊन ते बुद्ध बनले, तेव्हापासून पिंपळांच्या झाडाला बोधिवृक्ष संबोधिण्यात येते.

महाबोधी विहार

महाबोधी विहार हे बिहार राज्यातील बोधगया (बुद्ध गया) मधील एक महा बौद्ध विहार आहे. यास जागतिक वारसा स्थान म्हणून मान्यता मिळालेली आहे. शाक्य वंशाचे राजकुमार सिद्धार्थ गौतमांना या ठिकाणी पूर्णज्ञान (संबोधी/बुद्धत्व) प्राप्ती होऊन ते सम्यक संबुद्ध' बनले, व 'बुद्ध' म्हणून सर्वत्र ओळखले जाऊ लागले. बोधगया ही बिहार राज्यातल्या पाटना शहरापासून ९६ कि.मी. अंतरावर आहे. महाबोधी विहाराच्या पुढे, पश्चिम दिशेला पवित्र असा बोधीवृक्ष आहे. पाली भाषेत या ठिकाणाला 'बोधीमांद' असे म्हणतात आणि तीथे असलेल्या मठाला 'बोधीमांद–विहार' असे म्हणतात. इथल्या सर्वात उंच गोपुराची उंची ५५ मीटर म्हणजे १८० फूट आहे.

अष्टांगिक मार्ग

अष्टांगिक मार्ग (पाली: अरियो अठ्ठ्ंगिको मग्ग) हा गौतम बुद्धांनी सांगितलेला काम, क्रोध, द्वेष, इ. दोष दूर करून जीवन निर्मळ करण्याचा सदाचाराचा मार्ग आहे. यासं मध्यम मार्ग सुद्धा म्हणतात.

गौतम बुद्धांच्या १० हस्त मुद्रा

बुद्धांच्या विविध मुद्रा, हस्त संकेत या सर्वांतून गौतम बुद्धांनी जीवनातील विविध घटकांना दर्शविले आहे. बुद्धांच्या १० हस्त मुद्रा आणि त्या मुद्रांचा अर्थ पुढील प्रमाणे आहेत — १) धम्मचक्र मुद्रा, २) ध्यान मुद्रा, ३) भूमीस्पर्श मुद्रा, ४) वरद मुद्रा, ५) करण मुद्रा, ६) वज्र मुद्रा, ७) वितर्क मुद्रा, ८) अभय मुद्रा, ९) उत्तरबोधी मुद्रा आणि १०) अंजली मुद्रा.