१९१९ साली जन्मलेल्या नौशाद अली ह्या संगीतकाराने आपल्या आयुष्यांत शेकडो चित्रपटांना संगीत दिले. शास्त्रीय संगीताचा वापर चित्रपट संगीतात करणारे ते एक पहिले संगीतकार होते. प्रेम नगर ह्या चित्रपटाला त्यांनी १९४० साली संगीत देऊन आपल्या कारकिर्दीची सुरवात केली होती.
उत्तर प्रदेश मधील लखनौ मध्ये त्यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच संगीताची आवड असल्याने नौशाद बारामनकी येथील कव्वाली ऐकायला जायचे आणि तेथेच त्यांनी उस्ताद घुरबत अली, उस्ताद युसूफ अली, उस्ताद बब्बन साहेब इत्यादी कडून संगीताचे प्राथमिक धडे घेतले. फावल्या वेळांत त्यांनी हार्मोनियम ठीक करण्याचे काम सुद्धा केले.
त्या काली चित्रपटांना आवाज नसल्याने मूक चित्रपट यायचे. संगीतात लोक गावागावात मूक चित्रपट पाहून त्यातील सिन ला संगीतबद्ध करण्याचा आपल्या परीने प्रयत्न करायचे आणि लोक चित्रपट पाहत असताना लाईव्ह संगीत वाजवायचे. नौशाद ह्यांचा ह्याच प्रकारचे संगीत देण्याची नोकरी मिळाली. हे काम करता करता चित्रपटांना संगीत द्यायची कला त्यांना चांगली अवगत झाली.
त्यांनी स्वतःची नाटक आणि संगीत कंपनी काढली आणि उत्तर प्रदेश मधून त्यांनी आपला पहिला प्रवास सुरु केला. गुआजरात मध्ये पोचेपर्यंत त्यांची कंपनी पूर्णपणे देशोधडीला लागली होती. सर्व काही विकून शेवटी मित्राकडून पैसे उधार घेऊन ते परत लखनौला पोचले.
१९३१ मध्ये भारतीय सिनेमाला आवाज सुद्धा आला आणि नौशादला ह्या गोष्टिजे फार कुतूहल वाटले. १९३७ वडिलांच्या संगीतविरोधाला कंटाळून तें मुंबईला पळून आले. ते दादर आणि कुलाबा इथे राहत असत. उस्ताद झंडे खान त्या काळाचे मोठे संगीतकार होते आणि त्यांनी रुपये ४० वर नौशाद ह्यांना कमला ठेवले. कंपनी रशियन होती व स्टुडिओ कुलाबा इथे होता.
उस्ताद मुश्ताक हुसेन ह्यांच्या ऑर्केस्ट्रा मध्ये त्यांनी पियानो वाजवायचे काम केले आणि काही चाली दुरुस्त करता करता त्यांना लोक मुश्ताक हुसेन ह्यांचे असिस्टं मनू लागले.
संगीतकार खेमचंद ह्यांनी नौशाद ना रुपये ६० प्रतिमहिना देऊन आपले असिस्टंट ठेवले. नौशाद ह्याना हा फार मोठा उपकार वाटला आणि ते त्यांना गुरु मानू लागले.
ह्या नंतर त्यांनी प्रेम नगर चित्रपटाला संगीत दिले. करदार कंपनी ने त्यांना आपल्या अनेक चित्रपटांचे संगीत देण्यासाठी करारबद्द केले. १९४२ मध्ये शारदा ह्या चित्रपटांत १३ वर्षीय सुरय्या ने पदार्पण केले आणि नौशाद ह्यांचे पंची जा हे संगीत फार लोकप्रिय झाले. पण रत्तन ह्या चित्रपटाच्या संगीताने त्यांना उच्च स्थानावर नेले आणि त्या काळी ते एका चित्रपटासाठी २५,००० मानधन घेऊ लागले. रत्तन चित्रपटावर करदार कंपनीने ७०,००० खर्च केले होते पण त्यांची ग्रामोफोन रेकॉर्ड ची रॉयल्टीचा ३ लाख रुपये आली.
मजेशीर गोष्ट म्हणजे नौशाद ह्यांच्या घरी ते काय करतात ह्याचा पत्ता नव्हता. नौशाद ह्यांचे लग्न झाले तेंव्हा बँड वाले त्यांचीच गाणी वाजवत होते जी त्यांचे वडील आणि भावना अजिबात पसंद नव्हती. संगीत विरोधी अश्या त्यांच्या घरांत त्यांनी आपण नक्की काय करतो हे सांगितले नव्हते.
१९४२ ते १९६० पर्यंत ते सहज पणे नंबर एकचे संगीतकार राहिले. त्यांनी २६ सिल्वर, ८ गोल्डन आणि ४ डायमंड जुबली झालेले चित्रपट दिले. १९५७ मध्ये त्यांचे संगीत असलेल्या मदर इंडिया ह्या चित्रपटाला ऑस्कर नामांकन मिळाले.
वयाच्या ८६ साली त्यांनी ताज महाल ह्या चित्रपटाला संगीत दिले. हा कदाचित त्यांचा शेवटचा चित्रपट होता.
मे २००५ मध्ये त्यांचे जुहू येथील निवासस्थानी निधन झाले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.