भूतांच्या असंख्य जाती आहेत. यांचे अधिपतीही असंख्य आहेत. त्यांचे आकार-लक्षणे नाना प्रकारांची असतात; पण त्यांच्या स्वभावावरून उन्मादकर भूतांचे प्रकार आठ होतात :
(१) देव
(२) दैत्य
(३) गंधर्व,
(४) यक्ष
(५) पितृ
(६) भुजंग
(७) राक्षस
(८) पिशाच.
इंद्रसभेत गायनवादन करणारा अतिमानवी योनीतील एक वर्ग. गंधर्व हे ब्रह्मदेवाच्या शिंकेतून निर्माण झाले, असे हरिवंशात म्हटले आहे, तर कश्यप व अरिष्टा यांपासून ते उत्पन्न झाल्याचे मत्स्यपुराणात सांगितले आहे. चित्ररथ हा गंधर्वांचा अधिपती आणि इंद्र हा सर्व गंधर्वांचा स्वामी असल्याचे महाभारतात म्हटले आहे. गंधर्व हे सर्वांगसुंदर असून त्यांची वेशभूषाही आकर्षक असते. त्यांची शस्त्रे तेजस्वी व घोडे वाऱ्याहूनही वेगवान असतात. ते पाण्यात राहू शकतात व प्रसंगी शेवाळही खातात. त्यांना फुलांचे, विशेषतः कुंदफुलांचे, वेड आहे.अप्सरा त्यांच्या स्त्रिया असल्या, तरी भूलोकीच्या लावण्यवतींचेही त्यांना फार आकर्षण आहे. त्यांना हस्तगत करण्यासाठी ते तऱ्हेतऱ्हेचे इंद्रजाल व कपट अवलंबितात. ते विमानातून अप्सरांसहित संचार करतात. मानवांना भुरळ पाडून फसविण्याची व संकटात पाडण्याची त्यांना खोड आहे. तशी भुरळ पडू नये म्हणून लोकांनी अजशृंगी नावाची वनस्पती, अथर्ववेदातील एका मंत्राने सिद्ध करून स्वतःजवळ बाळगावी असे म्हणतात.
पितृपूजा न केल्यामुळे रागावलेले पितर वंशजांच्या अग्नीत ढकलून, पाण्यात बुडवून वा विजेच्या तडाख्याने मारतात किंवा आत्मतत्व पळवून नेऊन आजारी पाडतात, असे मानले जाई. एकाकीपणाची भावना, जिवंत व्यक्तीचा मत्सर, वंशजांकडून सेवा करून घेण्याची इच्छा, नवीन वंशज मरेपर्यंत कराव्या लागणार्या पहार्यातून सुटका करून घेण्याची इच्छा इत्यादींमुळेही ते बळी घेतात, अशी समजूत असते.
यांखेरीज ओजोशन भूते चरकांनी सांगितली आहेत. यांना वरील आठांना जसे रक्तमांसादि शारीर धातू प्रिय आहेत, तसे यांना शारीर धातू प्रिय नाहीत. वरील दैत्य व भुजंग भूते चरकांनी सांगितलेली नाहीत. गुरू, वृद्ध, सिद्ध आणि महर्षी ही चार उन्मादकर भूते सांगितली आहेत. वाग्भटांनी अठरा सांगितली आहेत.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.